Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

आपणच आपले हक्क आणि कर्तव्ये विसरतो
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची कमी टक्केवारी. ही चिंता वाटावी अशी स्थिती निश्चितच आहे. याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. असे

 

स्पष्ट व प्रामाणिक मत आहे. त्याची कारणेखालील प्रमाणे- १) कर्तव्यात कसूर- लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक बाब, २) महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी कमी त्याला महत्त्वाचे म्हणजे कमालीचा उष्मा. हा मतदारांना बाहेर पडण्यापासून परावृत्त करीत होता. ३) खासगी क्षेत्रातील अनेक आस्थापन्न मतदानाच्या दिवशी सुट्टी नव्हती. ४) सगळ्याच नाही पण काही अंशी शासकीय कर्मचाऱ्यांनी सुट्टी मौजमाप म्हणून घालविला. ५) मतदार याद्यातील चुकाही मतदान कमी करण्यास कारणीभूत ठरल्या. ६) मतदार याद्यात पत्ता बदल्याचे नावही नाहीत. ७) जुन्या पत्याच्या केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा उत्साह दाखविला नाही. ८) मतदानाच्या स्लिपा या घरोघरी पोचविल्या नाहीत. या बाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ९) गेल्या काही दिवसात महागाईने तर कळस गाठला आहे. उदा. अन्नधान्ये, गूळ, साखर, कांदा-लसूण यांचे भाव दुपटीने वाढले आहे? १०) अनेक पुढाऱ्याच्या इस्टेटी या कोटीच्या कोटी उड्डाणे प्रमाणे वाढते आहे?
आपण मत दिले काय अन्.. हे दुष्टचक्र महागाईचे कधीच संपणार नाहीत. ही खरी जनतेची भावना होत आहे. वैफल्यग्रस्त मतदाराच्या भावना या आज दडपलेल्या आहेत तरी भविष्यात त्याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही. महत्त्वाचे - जेव्हा मतदार फॉर्म भरून देतात तेव्हा त्यांना खात्रीशीरपणे तुमचे नाव येईलच अशी ग्वाही देण्यात येईल का? नाहीतर बिचारे मतदार आपले नाव येईल या आशेवर असतात अन् शेवटी निराशा पदरी पडते तेव्हा माणूस म्हणतो. जाऊ दे.. कशाला मत द्यायचे.
सुहास मुंगळे (मास्तर), पुणे