Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मतदारांमध्ये औदासीन्य का आले?
लोकशाहीच्या भवितव्यासाठी ‘मतदान करणे’ हा उपाय मतदाराला योग्य वाटत नाही. कारण मतदारयाद्या नेहमीच सदोष असतात असे महापौर म्हणतात, तेव्हा त्या ढिसाळ प्रशासनाचे समर्थन करतात. मतदार याद्या सदोष आपोआप किंवा नजरचुकीने होत नाहीत. राजकीय पक्ष प्रशासनामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या सोयीप्रमाणे याद्या करवून घेतात. मतदाराला जेव्हा कळते की नोंदणी प्रक्रियेमधे त्याचा काहीही दोष नसताना त्याचे नाव गायब होते, तेव्हा तो

 

दु:खी व हतबल होतो. तेव्हा मध्यमवर्ग उदासीन होतो.
लाचारी पत्करण्यापेक्षा त्याच्यापाशी मतदानावर बहिष्कार (negative thinking) हाच एकमेव मार्ग असतो. प्रत्येक मतदाराला त्याच्या सर्वात जवळचा राजकीय माणूस म्हणजे नगरसेवक. तोच कशा पद्धतीने निवडून येतो ते दिसते. मी ज्या वार्डमध्ये राहते त्या वार्डची नगरसेविका आमच्या वार्डमधे राहत नाही व तिला १३५० मते मिळाली ते मतदारही आमच्या वार्डमधले नाहीत कारण शेजारच्या वार्डमधली १५०० मतदारांची नावे माझ्या वार्डमधल्या मतदार यादीमधे आहेत. मी ‘‘राज्य निवडणूक आयोग’’ मधून फ३्र मार्फत ४०० पानी Document मिळवले त्याची Xerox प्रत सोबत जोडत आहे. त्यातील शेवटची ओळ मतदार मतदारसंघातील रहिवासी असण्याची गरज नाही. या नियमाप्रमाणे आम्हाला कोर्टात जाता येत नाही. संबंध वॉर्ड दहशतीमधे राहतो.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळी यंत्रे करून ती वापरण्यासाठी नियमावली तयार केली नाही. इथेच लोकशाहीचा गळा घोटला आहे. याबाबत मतदार काय करेल?
एक महिला मतदार, पुणे