Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मतदारांचा निरुत्साह धक्कादायक
विद्येचे माहेरघर, सुशिक्षितांचे शहर असलेल्या पुण्यात गेल्या महिन्यापासून मतदान करावे याबाबत विविध बुद्धिवंतांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेले लेख व वाचकांची पत्रे यामुळे पुणे शहरात ६० टक्के पेक्षा जास्त मतदान होईल असे वाटले होते. परंतु मतदार

 

निरुत्साही राहिला हे धक्कादायक आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजप संपूर्ण देशात निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे करू शकला नाही. यावरून हे पक्ष कमकुवत झाले आहेत व विकासाच्या बाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, हे सिद्ध होते. यामुळे संपूर्ण देशभरात या पक्षांना जनाधार राहिला नाही, हे स्पष्ट होते. संपूर्ण देशातील आजची परिस्थिती पाहिल्यास वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पक्ष उदयाला आले असून जनमत कॉंग्रेस व भाजप यांच्या विरोधात आहे.
शरद पवार, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद, मायावती, राम विलास पासवान, बिजू पटनाइक, प्रकाश कारत, रामदास आठवले इ. नेत्यांनी एकत्र येऊन सध्याचे स्वत:चे पक्ष विसíजत करून विकास कामाच्या मुद्यावर भर देऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नवीन पक्ष स्थापन करावा व नेतृत्वाचा मुद्दा सोडवताना महत्त्वाच्या नेत्याने एक वर्ष पंतप्रधान व्हावे, एक चांगला पक्ष तयार होऊन त्यास जनाधार मिळेल व लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढेल. मतदान वाया जाते ही भावना कमी होऊन लोक उत्साहाने मतदान करतील. यामधूनच देशाची प्रगती होऊ शकेल अन्यथा ही सद्य परिस्ेिथती गंभीर असून स्थिर सरकार देणे अशक्य होईल, तसेच लोकसभेत कुठलेही विधेयक मंजूर करणे अशक्य होईल, या सर्व नेत्यांना जनाधार असून त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रामाणिकपणे वाटते.
अॅड. प्रकाश सोळंकी, पुणे