Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

क्रीडा

आज ‘रॉयल’ झुंज
प्रिटोरिया, ६ मे/ पीटीआय

गेल्या सामन्यात २११ धावा फटकावून विक्रम रचणारा शेन वॉर्नचा राजस्थान रॉयल संघ चांगल्या फॉर्मात आलेला दिसत असून उद्याच्या बंगलोरविरूद्धच्या सामन्यात त्यांना विजय मिळवून त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल. तर एकेकाळी पराभवाच्या गर्तेत अडकलेला मल्ल्यांचा बंगलोर रॉयल चॅलेंजर्स विजयाच्या मार्गावर परतला असून त्यांनी रॉयलला पराभूत केल्यास पहिल्या चार संघांमध्ये त्यांचे स्थान निश्चित होऊ शकते.

रोहित ठरला हिरो; डेक्कनची मुंबईवर ९ विकेट्सनी मात
सेन्चुरियन, ६ मे / पीटीआय

रोहित शर्माचे मैदानावर झालेले आगमन आणि त्याने एकापाठोपाठ एक फलंदाज टिपत घेतलेली हॅट्ट्रिक मुंबई इंडियन्सला भोवली. रोहितने घेतलेल्या या हॅट्ट्रिकमुळे मुंबईच्या संघाला डेक्कन चार्जर्सकडून १९ धावांनी पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावरच कायम राहिला आहे. तर डेक्कनचा संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेपावला आहे. या सामन्यातला हिरो ठरला. त्याने फलंदाजीतही सर्वाधिक ३८धावा काढून आपल्या संघाला १४५ धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली आणि नंतर गोलंदाजीतही अनपेक्षित धक्के दिले. डेक्कन चार्जर्सने ठेवलेले १४६ धावांचे आव्हान तसे अतिशय कठीण नव्हते, पण मुंबईचे सलामीवीर जयसूर्या (५) व तेंडुलकर (२) यांचा अडथळा आर. पी. सिंगने दूर केल्यानंतर मुंबईच्या घसरगुंडीस प्रारंभ झाला.

‘विजय पंचमी’साठी चेन्नई-पंजाबमध्ये शर्यत
प्रिटोरिया, ६ मे/ पीटीआय

डेक्कन चार्जर्सवर मिळविलेल्या विजयामुळे चेन्नईचे ‘दुख भरे दिन बिते रे भैया’ असे म्हणायला हरकत नाही. या दोन संघांमधले एक साम्य म्हणजे दोन्हीही संघांनी चार विजय साकारले असून उद्या ‘विजय पंचमी’ साजरी करण्यासाठीच ते मैदानात उतरतील.

बंगलोरचा नेम लागेल?
प्रिटोरिया, ६ मे/ पीटीआय

गेल्या सामन्यात २११ धावा फटकावून विक्रम रचणारा शेन वॉर्नचा राजस्थान रॉयल संघ चांगल्या फॉर्मात आलेला दिसत असून उद्याच्या बंगलोरविरूद्धच्या सामन्यात त्यांना विजय मिळवून त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल. तर एकेकाळी पराभवाच्या गर्तेत अडकलेला मल्ल्यांचा बंगलोर रॉयल चॅलेंजर्स विजयाच्या मार्गावर परतला असून त्यांनी रॉयलला पराभूत केल्यास पहिल्या चार संघांमध्ये त्यांचे स्थान निश्चित होऊ शकते. दोन्हीही संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानला फक्त ५८ धावांमध्ये गुंडाळत सहज विजय साकारला होता.

टे्वन्टी- २० विश्वचषकाचे आम्हीच दावेदार - युनूस खान
दुबई, ६ मे / पीटीआय

दोन वर्षांपूर्वीची निर्णायक लढत. भारत-पाकिस्तान आमने सामने. पहिला वाहिल्या टे्वन्टी- २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना. अटीतटीच्या त्या सामन्यात धोनीच्या शिलेदारांनी पाकिस्तानला नमवत टे्वन्टी- २० विश्वचषक जिंकला होता. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना जिव्हारी लागलेल्या या पराभवाची आठवण आजही आहे. पण हा पराभव विसरून पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टे्वन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत आम्हीच अजिंक्य ठरू असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याला वाटतो.

महापौर चषक बुद्धिबळ: अलेक्झांडरची आघाडी कायम
मुंबई, ६ मे/क्री.प्र.

गोरेगाव स्पोर्टस् क्लब, मालाड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीअंती युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर आणि या स्पर्धेचा दुसरा मानांकित अेरेशचेन्को अ‍ॅलेक्झांडर (एलो २६५७) याने आठवा डाव जिंकून आपली अध्र्या गुणाची आघाडी कायम ठेवली आहे. त्याने आठव्या डावांत युक्रेनचाच ग्रॅण्डमास्टर झिनचेन्को यारोस्लॅव्ह याचा पराभव करून आपला चमकदार खेळ चालू ठेवला. त्याचे आठपैकी साडेसात गुण झाले आहेत.

इंग्लंडमध्येही चांगली कामगिरी करण्याचा जाडेजाला विश्वास
दरबान, ६ मे/पी.टी.आय.

आयपीएल स्पर्धेत चांगल्या धावा झाल्यास इंग्लंडमध्ये होणाऱ्या आय.सी.सी. ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल असे भारतीय संघात निवड झालेल्या रविंद्र जाडेजाने म्हटले आहे.

विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्याने पीसीबी नाराज
कराची, ६ मे / पीटीआय

२०११ मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सदस्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेविषयी तीव्र नाराजी आहे. त्याचे पडसाद जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
या बैठकीत आयसीसीच्या निर्णयावर मंडळाचे सदस्य तीव्र नाराजी व्यक्त करतील, असे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

ज्युनियर विश्व बॉक्सिंगसाठी भारताचे सात खेळाडू
नवी दिल्ली, ६ मे / पीटीआय

अर्मेनियातील येरेवान येथे २३ ते ३० मे या कालावधीत होत असलेल्या ज्युनियर विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने सात खेळाडूंची निवड केली आहे. या स्पर्धेत ४७ देशांतून २८३ बॉक्सर्स सहभागी होत आहेत. दोन वर्षांपूर्वी भारताने या स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला होता. काही सुवर्णपदके व एक रौप्यपदक पटकावून भारताने आपल्या अस्तित्वाची चमक दाखवून दिली होती. त्यावेळी विपिन कुमारने उत्कृष्ट बॉक्सरचा किताब जिंकला होता. विकास यादवने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते तर उमेश यादवने ४६ किलोगटात रौप्यपदक पटकाविले होते.

टेबल टेनिसमधील चीनचे वर्चस्व खेळाला मारक
योकोहामा (जपान), ६ मे / एएफपी

विश्व टेबल टेनिस स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे चीनचे एकीकडे कौतुक होत असतानाच सलग तिसऱ्या वेळेस मिळविलेल्या या विजेतेपदामुळे या खेळातून एक चुकीचा संदेश मिळत असल्याचे चीनच्याच एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

भाटिया, रेड्डी यांचा सनसनाटी विजय
मानांकन टेनिस स्पर्धा
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या रोहन भाटिया व स्नेहदेवी रेड्डी यांनी सनसनाटी विजयासह कुमारांच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे १४ वर्षांखालील मुले व मुली गटात उपांत्य फेरी गाठली. शिवछत्रपती क्रीडानगरीत महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत भाटिया याने द्वितीय मानांकित खेळाडू अन्वित बेंद्रे (गुजरात) याच्यावर ६-१, ६-० असा दणदणीत विजय नोंदविला. त्याने या लढतीत पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला तसेच अचूक सव्‍‌र्हिस केल्या.

आयपीएलमध्ये एअर इंडियाचा ‘संघ’
नवी दिल्ली, ६ मे / पीटीआय

एअर इंडियाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला स्वत:चा संघ वगैरे उतरविला नसला तरी एका वेगळ्या अंगाने विचार केला तर त्यांचाही एक ‘संघ’ या स्पर्धेत खेळतो आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह एअर इंडियाचे एकूण १५ खेळाडू विविध संघांतून आयपीएलमध्ये कामगिरी बजावत आहेत.

बोपाराच्या शतकाने इंग्लंडला सावरले
इंग्लंड ७ बाद २८९
एडवर्ड्सचे चार बळी
लॉर्डस्, ६ मे, वृत्तसंस्था
इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतत असताना आयपीएलमधला फॉर्म कायम राखत रवी बोपाराने कारकिर्दीतले दुसरे शतक झळकावित वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाला सावरले. बोपाराच्या शतकाच्या जोरावर इंग्लडने पहिल्या दिवसाअखेर ९ बाद २८९ धावा केल्या असून त्याचासह फिरकीपटू गॅ्रमी स्वान खेळत आहेत.

विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्याने पीसीबी नाराज
कराची, ६ मे / पीटीआय

२०११ मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सदस्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेविषयी तीव्र नाराजी आहे. त्याचे पडसाद जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये उमटण्याची शक्यता आहे.

प्रकाशची एकेरीत तर बोपण्णाची दुहेरीत आगेकूच
नवी दिल्ली, ६ मे/ पीटीआय

भारताचा चौथा मानांकित रोहन बोपण्णा आणि त्याचा अमेरिकेचा सहकारी ट्रेव्हिस पॅरोट यांनी निकोलस अलमार्गो आणि सेबास्टिन प्रिएटो यांचा म्युनिख येथील बी. एम. डब्यू. खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत ६-४, ५-७, १०-८ असा पराभव केला. त्यांचा पुढील सामना अमेरिकेच्या जेम्स कॅरेटोनी आणि फ्रान्सच्या जेरमी चार्डीविरूद्ध होणार आहे.
एकेरीमध्ये प्रकाश अमृतराजने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमीत्रोव्हावर ७-६ (३), ६-१ असा विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताच्या हर्ष मंकडनेही केस व्ॉनच्या साथीने पॉल बिशप आणि मिक इरडोजा जोडीचा ७-६, ६-४ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली आहे.

श्रीलंका क्रिकेट संघासाठी सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती
कोलंबो, ६ मे / पीटीआय

श्रीलंका क्रिकेट संघासाठी मेजर जनरल (निवृत्त) लॉरेन्स फर्नान्डो यांची सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंवर मार्च महिन्यात लाहोर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात वाचले होते. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून श्रीलंका क्रिकेट मंडळाने १ मेपासून फर्नान्डो यांची सुरक्षा सल्लागार पदावर नेमणूक केली आहे असे मंडळाकडून येथे सांगण्यात आले. फर्नान्डो हे अतिशय कडक अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत श्रीलंकेतील दहशतवादी कारवायांवर अंकुश आणण्यात यश मिळविले होते. त्यांनी सेनाप्रमुख म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. त्यामुळेच संघासाठी तेच योग्य सुरक्षा सल्लागार आहेत असे मंडळाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा ९ मे पासून
मुंबई, ६ मे/ क्री. प्र.

२६ व्या लकडावाला युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा ९ ते १६ मे पर्यंत खेळाची नर्सरी समजल्या जाणाऱ्या नागपाडा येथील मस्तान वाय. एम. सी. ए. मिनी स्टेडियमवर होणार असून पहिल्यांदाच तब्बल ४६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी २४ राज्यांमधून १२०० खेळाडू आणि अधिकारी सहभागी होणार असून तब्बल ४६ वर्षांनंतर ही स्पर्धा दक्षिण मुंबईत भरविण्यात येणार आहे. १६ वर्षांखालील मुलां-मुलींसाठी भरविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पहिल्यांदाच तीन लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन्हीही गटातील विजेत्या संघास ७५ हजार रुपये देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संघालाही २५ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. तसेच पहिल्यांदाच युवा स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक आकडेवारीही ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेतील दोन्हीही गटांमध्ये सहा विभाग करण्यात आलेले असून एकाचवेळी तीन ठिकाणी स्पर्धेचा आनंद लुटता येऊ शकतो. त्याचबरोबर स्पर्धेतील खेळडूंचे वय जास्त असू नये यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणीसुद्धा घेण्यात येणार आहे.