Leading International Marathi News Daily
गुरुवार । ७ मे २००९
  प्लान्टेशन टुरिझम
  ओपन फोरम - चिअर गर्ल्स
  थर्ड आय -
बाप ! बाप !! बाप !!!
शब्दभ्रमाच्या तीन पिढय़ा
  कट्टा - घरजावई व्हावं की नाही?
  क्रेझी कॉर्नर -
बाथ सोप म्हणाला ‘डिर्टजट’ला!
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी -
जाहिरातींचा झुझुत्कार..
  ग्रूमिंग कॉर्नर -
अपयशाकडून यशाकडे..
  यंग अचिव्हर- अश्विनी यार्दी
‘कलर्स’ नंबर १
  आयुर्वेदिक रेस्तराँ -
स्वाद शक्ती
  इव्हेंटस कॉर्नर

निर्णय
रमेश : कोणाचा फोन होता ग!
रेखा: शालिनीचा. अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता.
रमेश : अभिनंदन आणि ते कशासाठी?
रेखा : अहो, मैत्रेय अमेरिकेला चाललाय ही बातमी पोचलीही तिच्यापर्यंत. बातम्या कशा वाऱ्याच्या वेगाने पसरतात नाही?
रमेश : काही विचारू नकोस. बातम्याही पसरतात आणि त्याचबरोबर

 

लोकांच्या कल्पनाही धावतात.
रेखा : का? तुम्हाला कोण काय म्हणालं?
रमेश : अग, वामन्या भेटला होता. म्हणाला, जावई जातोच आहे. त्याला म्हणावं राहुलचंही जमवून टाक तिकडे..
रेखा : आता शालिनीही असंच म्हणत होती की आता रश्मीला म्हणावं लवकर चान्स घेऊन टाक म्हणजे तुलाही तिकडे जायला मिळेल..
रमेश : एक मिनिट..एक मिनिट.. कसला चान्स आणि त्याच्याशी तुझा काय संबंध?
रेखा : अहो, असं काय करताय? हल्ली ही मुलं तिकडे जातात आणि पहिल्या बाळंतपणाला आईला नाही तर सासूला बोलावून घेतात ना, म्हणून ती म्हणत होती.
माधुरी : रेखा, तू पहिल्या बाळंतपणाला जा, पण दुसऱ्या बाळंतपणाला मात्र मी जाणार हं..
रश्मी : कोण कोणाच्या बाळंतपणाला चाललय?
राहुल : सांगतो. ये. बैस अशी इथे. हे जे बाळंतपणाला जायचे प्लॅन्स चाललेत ना ते तुझ्या..
रश्मी : माझ्या बाळंतपणाला? बरे आहात ना सगळे? अजून हळद नाही निघाली आणि तुम्ही बाळंतपणापर्यंत जाऊन पोचलात? कमाल आहे हं!
राहुल : शांत हो..शांत हो.. बहिणाबाई, मैत्रेयच्या अमेरिकेला जाण्याची ब्रेकींग न्यूज अच्छी तरहसे फैल चुकी है और तमाम जनता मनके मांडे भी खाने लगी है की..
रश्मी : ओके, ओके आलं लक्षात. पण आई, बाबा, मी मैत्रेयबरोबर अमेरिकेला जाणार नाहीये.
रमेश : म्हणजे काय?
रेखा : जाणार नाही म्हणजे?
माधुरी : अग, असं कसं करून चालेल?
राहुल : मैत्रेयला माहीत आहे हे?
रश्मी : मला माहीत होतं की माझा हा निर्णय ऐकून तुम्ही सगळे खूप डिस्टर्ब होणार. तुमच्या पुढच्या सगळ्या बेतांवर पाणी पडणार..
रेखा : आमचे बेत कसले ग? इतरांचे बेत ते! आमच्यासाठी ठरवलेले! ते जाऊ दे. तू काय हे न जाण्याचं खूळ डोक्यात घेतलं आहेस?
रश्मी : खूळ वगैरे नाही. मी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे.
राहुल : you are mad or what?
रश्मी : का काय झालं?
राहुल : काय झालं काय? तू चक्क अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेते आहेस.
रश्मी : हो.
राहुल : अग पण का? i can’t even think of it.
रश्मी : राहुल, तुझ्या लक्षात येत नाहीये, पण मी वर्षभर अमेरिकेला जाणं म्हणजे माझ्या करियरमध्ये एक खूप मोठा ब्रेक घेणं आहे. जो मला आता तरी परवडणारा नाही.
राहुल : कम ऑन रश्मी, तू तुझ्या करियरचा, नोकरीचा जास्तच इश्यू करते आहेस हं! अरे, आपण नोकरीसाठी का आपल्यासाठी नोकरी? नोकरीसाठी अमेरिकेला न जाणं, आलेली संधी हातची घालवणं, म्हणजे शुध्द मूर्खपणा आहे. नोकरी नोकरी काय..शिर सलामत तो नोकरी पचास..
रश्मी : तुझं आणि मैत्रेयचं बोलणं झालं वाटतं?
राहुल : नाही बाबा, का?
रश्मी : नाही, तोही परवा अगदी असंच म्हणाला होता..
राहुल : big people think alike, you know!
माधुरी : रश्मी, तुला नोकरी सोडायची नाहीये ना, मग तू रजा का घेत नाहीस?
रश्मी : एक वर्षांची रजा? शक्य आहे का ते?
माधुरी : का? ती कुलकण्र्याची प्राची नाही गेलीये का रजा घेऊन?
रश्मी : माई, अग तिची गोष्ट वेगळी आहे. तिला मिळाली रजा. पण माझं तसं नाही ना! वर्षांची रजा मागितली तर नारळच देतील.
राहुल : मला वाटतं रश्मी, तू तुझ्या नोकरीला वाजवीपेक्षा जास्तच महत्व देते आहेस.
रश्मी : असं कसं म्हणतोस तू राहुल? अरे, आज दर दिवशी तंत्रज्ञान बदलतं, पुढे जातं. वर्षभर मी माझ्या फील्डच्या टचमध्ये राहिले नाही तर पुढे किती जड जाईल, याचा विचार कर ना!
राहुल : फील्डशी टचमध्ये राहण्याचाच प्रश्न आहे ना तुला? ते तर तू पुस्तकं वाचून, नेटच्या माध्यमातूनही करू शकतेस.
रश्मी : नाही राहुल, पाण्यात पोहणं आणि काठावरुन चालणं, किंवा कल्पनेत पोहणं यात खूप फरक आहे.
राहुल : पण तू अमेरिकेला गेलीस आणि तुझ्या फील्डमधलं नवीन काही शिकलीस तर तुलाच फायदा होईल ना?
रश्मी : या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. मी तिथे जाणार, शोधाशोधी करणार, तोपर्यंत कदाचित आमची परतायची वेळ येणार. म्हणजे मग परत ते अर्धवट सोडायचं आणि परतायचं.
राहुल : आई, बाबा, तुम्ही अगदी गप्प आहात. तुम्हाला पटतोय रश्मीचा हा निर्णय?
रेखा : राहुल, लग्न झाल्यानंतर काही निर्णय हे फक्त नवरा-बायकोनं घ्यायचे असतात. त्यावर इतरांनी काही बोलू नये. रश्मी आणि मैत्रेय आता गृहस्थाश्रमात शिरले आहेत. निर्णय घेण्याचे अनेक प्रसंग त्यांच्यावर येतील. अशा वेळेला, निर्णय त्यांचे त्यांनाच घ्यावे लागतील, नव्हे, त्यांचे त्यांनीच निर्णय घ्यावेत.
रश्मी : हीच तर सवय लहानपणापासून आई-बाबांनी आपल्याला लावली आहे राहुल! या बाबतीत आई-बाबांचं एक अत्यंत आवडतं वाक्यही आहे..
राहुल : निर्णय तुमचे तुम्ही घ्या पण त्याचबरोबर त्यांची जबाबदारीही घ्यायला शिका.
रश्मी / राहुल : निर्णय तुमचे आणि जबाबदारी आमची, असं नको..
रश्मी : असं असलं ना माई, तरी आई बाबा आमच्या निर्णयात सहभागी असतात हं!
राहुल : म्हणूनच तर निर्णय निर्धास्तपणे , शांतपणे घेता येतात आणि शांतपणे घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत.
रश्मी : म्हणूनच मला खात्री आहे की, माझाही निर्णय चुकीचा नाही.
राहुल : मियाँ-बीबी राजी तो क्या करंेगे हम? ऑल द बेस्ट..
shubhadey@gmail.com