Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

बंडखोरीमुळे भाजप हैराण
अनिल वासनिक

विधानसभेत काठावर बहुमत असलेला भारतीय जनता पक्ष उत्तराखंड राज्यात अस्तित्वाची लढाई लढत आहे. उत्तराखंड क्रांतिदलाने वेगळी चूल मांडली असून मुन्नासिंह चौहान यांनी बंडखोरी करत पक्ष सदस्यत्व व आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने भाजपच्या समस्या वाढल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’मुळे हा पक्ष पुरता बेजार झाला आहे. मागील निवडणुकीत मिळवलेले यश या छोटय़ा राज्यात कायम राखण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षापुढे आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १३ मे रोजी या राज्यात मतदान होणार आहे.

पश्चिमी उत्तर प्रदेशात मुस्लीम बसपाच्या बाजूने
समर खडस, बिजनौर, ९ मे

येत्या १३ मे रोजी उत्तर प्रदेशातील १४ जागांवर मतदान होणार आहे. यातील बहुतांश जागा या पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत. बहुसंख्येने मुस्लीम, जाट आणि गुज्जर समाजाचा प्रभाव असलेल्या या प्रख्यात मुस्लिमांनी बहेन मायावतींकडेच कल दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या १४ जागांपैकी ८ ते ९ जागा बसपाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून, मुरादाबादची जागा महंमद अझरुद्दीनमुळे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.

१८०० कोटींच्या कर्जमाफीवरून आता काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच !
मुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कितपत फायदा झाला हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईलच पण त्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली होती. आता राज्य शासनाच्या विविध महामंडळांकडे असलेले १८०० कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय होण्यापूर्वीच त्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच समाजातील विविध दुर्बल घटकांना राज्य शासनाच्या महामंडळांनी दिलेले कर्जमाफ व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आर. आर. पाटील यांनी या वर्षांच्या सुरुवातीला केली होती. वित्त खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने कर्जमाफ करण्याचे सुतोवाच वित्त खात्याचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले होते.