Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

महेश विचारे
मारणाऱ्यापेक्षा तारणारा खूप मोठा असतो, अशी एक म्हण आपण ऐकत आलो आहोत. एखाद्या थरारक क्षणी किंवा समरप्रसंगात अशा म्हणीचा आपण अनुभव घेत असलो तरी केवळ रणांगणात नव्हे तर क्रीडांगणातही ही म्हण तंतोतंत लागू पडते. समोर मोठं आव्हान असताना, त्या सामन्यातील भवितव्याची खात्री नसताना असे तारणहार प्रकट होतात आणि प्रतिस्पध्र्याच्या स्वप्नांचा चुथडा करून टाकतात. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या क्रीडांगणावरील रणधुमाळीत असेच अनेक तारणहार विविध संघांचे आधारस्तंभ ठरले आहेत. अर्थात, अशा तारणहारांच्या शोधात याच आयपीएलमधील काही संघही आहेत, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अशा खेळाडूंचा आधार मिळू शकलेला नाही.

विनायक दळवी
काळानुरूप सगळ्याच गोष्टी बदलत जातात. तत्त्व, नीतिमूल्ये, संकेत गुंडाळून नव्याच्या ध्यासाने पछाडलेल्यांनी प्रत्येक क्षेत्रात असे बदल केले. क्रिकेटही याला अपवाद ठरले नाही. क्रिकेटच्या व्यावसायिक लाभाचा फायदा उठवून आयपीएल क्रिकेट साखळी सुरू करण्यात आली. भारतीयांचे प्रचंड पाठबळ आणि त्यामुळे जाहिरातदारांच्या पडलेल्या उडय़ांमुळे क्रिकेटचा हा ‘बोन्साय’ अवतार खेळाडू आणि क्रिकेट संघटकांमध्ये सर्वाधिक आवडीचा ठरला. प्रेक्षकांनीही या तीन तासांच्या करमणुकीला डोक्यावर घेतले. पहिल्या आवृत्तीत फटक्यांची आतषबाजी, फलंदाजांनी शोधून काढलेले काही नवे फटके पाहायला मिळाले.

प्रसाद लाड
युवा हे देशाचे भविष्य आहेत. या युवांमधल्या सुप्त गुणांना वाव दिल्यास, योग्य मार्गदर्शन केल्यास, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल ठरू शकते. यासाठी त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जा, सर्जकता, नावीन्य यांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा. हिरा प्राथमिक घडीला अगदी कवडीमोलाचा वाटतो, पण त्याला योग्य तो आकार दिल्यानंतर त्याची किंमत लाखमोलाची होते, असंच काहीसं युवांबद्दल असतं. मग ते युवा कोणत्याही क्षेत्रातील असो. राजकारण, अर्थकारण, कला किंवा अगदी क्रिकेटचेच उदाहरण घ्या ना. आयपीएल हे युवा खेळाडूंना मिळालेले फार मोठे व्यासपीठ आहे, जिथून त्यांना राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात.

बिनधास्त नि बिलंदर.. बोक्या!
गोटय़ा, चिंगी, फास्टर फेणे.. पुस्तकांतून भेटणाऱ्या या व्यक्तिचित्रांमधून जिथे कुमारवयीन पिढय़ान्पिढय़ांचं पोषण झालं, त्यात अलीकडे ‘बोक्या सातबंडे’ या दिलीप प्रभावळकरांच्या श्रुतिकेतून साकारलेल्या खटय़ाळ व्यक्तिरेखेचाही समावेश झाला होता. ऐकलेल्या - वाचलेल्या गोष्टीमुळे आपल्या मनात कळत-नकळत त्या व्यक्तिरेखेचा एक आकृतीबंध निर्माण झालेला असतो. ती व्यक्तिरेखा कशी असेल वा असावी, याचा एक आराखडाही तयार झालेला असतो. ‘बोक्या सातबंडे’ ही अशी एक व्यक्तिरेखा आहे, जी आजच्या ‘जनेरेशनेक्स्ट’लाही समकालीन वाटावी.. अशा वेळी पुस्तकातून भेटलेली ही अवखळ, चपळ, करामती व्यक्तिरेखा जर त्यांना जवळच्या वाटणाऱ्या दृक-श्राव्य माध्यमाद्वारे भेटली, तर या लहानग्यांना कोण आनंद होईल?

थंडगार कृष्णधवल प्रतिमा!
रंगांची उधळण आणि तंत्राचा बडेजाव पाहण्याची आपल्याला सवय झालेली आहे. खरेतर अजीर्ण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक शिवाजी चंद्रभूषण यांचा ‘फ्रोझन’ हा चित्रपट एक ‘कृष्णधवल’ दिलासा आहे. लडाखमधील बोचरी थंडी आणि बर्फाळलेले वातावरण कृष्णधवल छटांमधून अधिक प्रत्ययकारी झालेले आहे. परंतु रंगांचा किंवा रंग नसल्याचा हा परिणाम सोडला तर एक चित्रपट म्हणून ‘फ्रोझन’ निराशच करतो. माहितीपट आणि कथापट यांच्यामध्ये कुठेतरी भरकटत हा चित्रपट संपतो तेव्हा लक्षात राहतात केवळ काळ्या पांढऱ्या, थंडगार प्रतिमा! लडाखमधील डोंगराळ, हिमाच्छादित भागात राहणाऱ्या एका कष्टाळू, निर्धन कुटुंबाची ही कथा आहे. कर्मा (डॅनी) हा कुटुंबप्रमुख. जुनाट यंत्रावर जर्दाळूचा जॅम तयार करतो. जवळच्या बाजारात तो विकून कशीतरी गुजराण करतो.

अखेर १६ मे उजाडला. दिवसभरात लोकसभा निवडणुकांचे निकाल जसजसे जाहीर होऊ लागले, कोण कुठे आघाडीवर वा पिछाडीवर आहेत हे कळू लागले, तसतसे सर्वत्र औत्सुक्याचे वातावण अधिकच गडद होऊ लागले. सर्व चॅनेलवाल्यांना तर ऊतच येऊ लागला. तीच एक-दोन दृश्ये काही सेकंदांच्या अंतराने पुन:पुन्हा दाखविली जाऊ लागली. जिंकलेल्यांच्या मिरवणुका, पराभुतांचे रडवे चेहरे, आरोप, प्रत्यारोप, समर्थन याशिवाय दुसऱ्या कुठल्याही बातम्या नाहीत. मतदारांनी नेहमीप्रमाणे कुणालाच स्पष्ट कौल न दिल्याने सर्वत्र कोलाहल व संभ्रमावस्था. रात्रीपर्यंत अनेक कोष्टके व त्रराशिके मांडूनही काही निष्पन्न होत नाहीसे ध्यानी आल्यावर प्रणव रॉय आणि दुवा यांची अवस्था निद्रानाशाने पीडित मनुष्याप्रमाणे भकास वाटणारी दिसत होती.

निसर्गसंपन्न कोस्टारिका
ब्रॉलीओ कॉरिलो हे नॅशनल पार्क रेन फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. टीव्हीवर डिस्कव्हरी, नॅटजिओ चॅनेलवर पाहून थोडेफार माहिती असलेल्या रेन फॉरेस्टची सफर एरियल ट्राममध्ये बसून करण्याची गंमत काही औरच. जमिनीपासून सुरू होणाऱ्या ट्राममध्ये बसून आपण अगदी उंचउंच झाडांच्या शेंडय़ांपर्यंत म्हणजे रेन फॉरेस्टच्या कॅनोपीपर्यंत पोहोचतो. या झाडांची खोडे खडबडीत असून पर्णरहित असतात, पण शेंडे मात्र हिरवेगार असतात. त्यांना ‘ब्रोकोली ऑफ दि रेन फॉरेस्ट’ म्हणतात. ट्राम जरी संथपणे जात असली तरीही झाडे, फुले, पक्षी, प्राणी यांच्याबद्दल गाईड देत असलेल्या माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी नजर व मान यांना भरपूर कसरत करावी लागते. पण एवढय़ा गडबडीतसुद्धा ‘लिपस्टिक प्लांट’ अगदी डोक्यात घर करून राहते. नावाप्रमाणेच पाने म्हणजे अगदी लालचुटुक रेखीव ओठच. शिवाय भरपूर ऑर्किडस्, ब्रोमेलिया, होडेडेंड्रॉन आणि अगदी आपला तेरडासुद्धा. सूर्यप्रकाशात चमकणारी कोळ्यांची जाळी मध्ये मध्ये फांद्यांवरून लटकत होती. सरडे, रॉबिन, मकाव, शेपटीवर पट्टे असलेला झाडाआडून आमच्याकडे हळूच पाहणारा लेमर हजेरी लावून गेले. अशा रेन फॉरेस्टमध्ये स्वच्छ हवामानात ‘झीपलाइन’ ही थरारक अॅक्टिव्हिटी चालू असते. आपल्याला झाडांच्या कॅनोपीच्या उंचीपर्यंत वर नेण्यात येते. तिथपासून थेट जमिनीपर्यंत येण्यासाठी मजबूत दोरखंडासारखी लोखंडी वायर दोन-तीन ठिकाणी खांबांच्या आधारे बांधलेली असते. वेगवेगळ्या उंचीवर दृश्य पाहण्यासाठी दोन-तीन ठिकाणी प्लॅटफॉर्म असतात. झोपाळ्यासारख्या सीटवर बसून आपण अक्षरश: तीन ते चार मिनिटांत जमिनीवर पोहोचतो. ही बाब जरा खर्चिकच, प्रकृती आणि खिशाला परवडत असल्यास जरूर अनुभव घ्यावा. तॉर्तुगेरो नॅशनल पार्कचा प्रवास परिसमीना व कॅलिफोर्निया नदीच्या प्रवाहातून करावा लागतो. अगदी थोडेच सामान घेऊन लहान स्पीडबोट साधारण २० ते २५ प्रवासी घेऊन लिमोन येथून निघते. कॅलिफोर्निया नदी पुढे कॅरेबियन समुद्राला मिळत असल्याने भरती-ओहोटीप्रमाणे नदीचे पात्र खोल किंवा उथळ होते. कधी कधी उथळ पाण्यात उतरून बोट ढकलत पुढे नेण्यासाठी कॅप्टनला मदत करावी लागते. नदीचा प्रवाह वेगवेगळ्या दिशेने गेल्यामुळे जंगलात असणाऱ्या पायवाटांप्रमाणे दिसतो. पण ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक असल्याने एकटय़ाने कायास घेऊन फिरणाऱ्यांना चुकण्याचे भय अजिबात नाही. तॉर्तुगेरो लगूनमध्ये काठावरच नॅशनल पार्कची छोटी छोटी टुमदार लाकडी लॉजेस आहेत. रूममध्ये मोजक्याच सोयी, पण अद्ययावत बार, रेस्टॉरंट, लायब्ररी, पुल यांनी लॉजेस सुसज्ज आहेतच. भरपूर झाडे यामुळे फूटभर लांब चोचीचे रंगीत मकाव, टय़ूकान, रॉबिन्स यांचा नेहमीच कलकलाट चालूच असतो. नेहमीप्रमाणेच खारुताईची लगबग असते. हाऊलिंग मंकीचा धुमाकूळ विचारूच नका. केव्हा रूमच्या छपरावर धाडकन उडी मारतील याचा नेम नसतोच. बोटीतून नॅशनल पार्कची सफर करताना रेनफॉरेस्टसारखी उंच उंच झाडे नाहीत, पण वेगवेगळे पाम्स मात्र भरपूर दिसतात. त्यात आपल्या बहुपयोगी माडासारख्या राफिया पाम्सची संख्या जास्तच. याचा घराचे छप्पर शाकारण्यासाठी तसेच फॅन्सी बॅगस, हॅट्स बनवण्यासाठी उपयोग होतो.
तॉर्तूगेरी पार्क आणि रिओ फीओ नदीतून फिरताना आपल्याला हाऊलिंग मंकी, पांढऱ्या तोंडाचे कापुचीन मंकी, ब्राऊन किंगफिशर, मकाव टय़ूकॉन्स शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे हेरॉन भरपूर पहायला मिळतात. पक्ष्यांच्या पिसांवर जरा तेलकटपणा असल्याने पाण्यातून वर आल्यावर पंख झटकल्यावर लगेच उडू शकतात. पण अनाहिंगाचे मात्र तसे नसते. कारण त्याच्या पिसांवर तेलाचा अभाव असल्याने पंख पूर्णपणे सुकल्याशिवाय त्याला उडता येत नाही. पसरवून सुकवण्यासाठी पसरलेले असताना त्यावरील काळ्या-पांढऱ्या पिसांमुळे ते पियानोच्या की प्रमाणे दिसतात, म्हणून त्याला पियानो बर्ड असेही म्हणतात. शिवाय ऑटर्स, मगरी, पाण्यावर धावणारा सरडा, अत्यंत धीम्या हालचालीचा सदैव झाडांवर राहणारा स्लॉथ, वुडपेकर, टकलू, ईगल, गिधाडे असे भरपूर प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. मॉटेवर्डे क्लाऊड फॉरेस्टमध्ये पाऊस तसा कमीच, पण हवेत आद्र्रता भरपूर असल्याने ओलसरपणा असतोच. पानांवरूनही लहान लहान थेंब पडतात. इथली झाडेदेखील चांगलीच उंच आहेत. पण रेनफॉरेस्टएवढी नाहीत. मूळ झाडावर वाढणारी बांडगुळे बरीच दिसली. त्यांच्या पारंब्यासुद्धा इतक्या मजबूत की खरे झाड कोणते हे ओळखणेदेखील कठीण. काही ठिकाणी झाडांचा गाभा इतका पोकळ केला होता की आपण त्यात चक्क उभे राहू शकतो. काही पारंब्या पायऱ्यांप्रमाणे त्यांना मंकी व्हाईन म्हणतात. वेगवेगळी ऑर्किड्स, फर्न, मुळे झाडांवर पाणी व सूर्यप्रकाशासाठी वाढणारी एपीफाइट्स, शिवाय मोहक जंगली फुले पाहायला मिळतात. या नॅशनल पार्कमधला थोडा भाग जगभरातल्या मुलांनी देणगी देऊन राखून ठेवलेला आहे. इथे आवर्जून पाहण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे बनाना प्लांटेशन फील्ड. अमेरिका, इंग्लंड येथे कोस्टारिकल केळ्यांना खूप मागणी आहे. हिरव्या सालीची तसेच राजाळी केळ्यांची लागवड बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर केली जाते. घड तयार होताना पक्षी, कीडे किंवा बुरशीपासून दूर राहण्यासाठी त्यांना कव्हर घालून ठेवतात. तयार घड वर्कशॉपमध्ये आणण्यासाठी पुली व ट्रॉलीचा उपयोग केला जातो. त्यावेळी अक्षरश: मालगाडी धावल्यासारखा धडधडाट ऐकू येतो. प्रतवारीप्रमाणे केळ्यांचे विभाजन होते. केळी शॉवरने स्वच्छ धुतली जातात. हवा सोडून सुकवलेले घड बॉक्समध्ये पॅक होतात. उत्तम प्रतीची केळी निर्यातीसाठी, थोडी कमी प्रतीची कोस्टारिकल मार्केटमध्ये आणि काही पदार्थ बनवण्यास वापरली जातात. राजाळी केळी नुसती तुपात तळून खाण्याची पद्धत आहे. आपल्याप्रमाणे इथेदेखील पाने, केळफूल, कच्च्या केळ्यांचे वेफर्स, खोड यांचा उपयोग केला जातो. अशा निसर्गसंपन्न कोस्टारिकात पुरुषाला टिको आणि स्त्रीला टिका म्हणतात. युद्धाचे भय नसलेल्या लोकांना ‘बोनोसदियास’ म्हणजे स्पॅनिशमध्ये काय, कसं काय? असे विचारले असता ‘पुराविदा, किंवा तुवानिस’ म्हणजे अगदी मजेत. नो टेंशन, नो गडबड अशा आशयाचेच उत्तर येते. मला तरी वाटते की इथे भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
(समाप्त)
गौरी बोरकर

gauri@borkar.net