Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

‘स्वान फिवर’मुळे इंग्लंडचा शानदार विजय
रामदीन-नॅश यांची झुंजार भागीदारी
इंग्लंडचा मालिकेत वरचष्मा
लंडन, ८ मे / एएफपी

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या ब्रेन्डन नॅशच्या ८१ धावांच्या जिगरबाज खेळीनंतरही

 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला आपला पराभव टाळता आला नाही. इंग्लंडने ही कसोटी १० विकेट्स आणि दोन दिवस राखून जिंकली.
नॅशने दिनेश रामदिनसह (६१) केलेल्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजला डावाने पराभव मात्र टाळता आला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. या सामन्यातली ही एकमेव शतकी भागीदारी ठरली. नॅश बाद झाला तेव्हा विंडीजची एकूण धावसंख्या २५६ झाली होती आणि इंग्लंडला विजयासाठी ३२ धावांची गरज होती. अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस (१४ नाबाद) व अ‍ॅलिस्टर कूक (नाबाद १४) यांनी ही धावसंख्या सहज ओलांडली आणि इंग्लंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली.
या सामन्यात इंग्लंडच्या अनेक खेळाडूंचे योगदान होते. बोपाराने इंग्लंडमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात १४३ धावांची आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी केली. तर ग्रॅमी स्वाननेही नाबाद ६३ धावांची खेळी करून आपल्या अष्टपैलुत्वाची ओळख करून दिली. त्याने गोलंदाजीतही दोन्ही डावांत मिळून सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पराभव निश्चित झाला. स्वानबरोबरच ग्रॅहम ओनियन्सनेही वेस्ट इंडिज फलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणले. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतानाच दुसऱ्या डावात दोन फलंदाजांना टिपण्याची करामत केली. या दोघांच्या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव इंग्लंडच्या ३७७ धावांना प्रत्युत्तर देताना अवघ्या १५२ धावांत आटोपला. फॉलोऑननंतरही वेस्ट इंडिजला सूर गवसलाच नाही. तरीही नॅश व रामदिन यांनी संयमी खेळ केल्यामुळे तसेच सलामीवीर स्मिथची ४१ धावांची साथ लाभल्यामुळे पाहुण्यांना २५६ धावांपर्यंत मजल मारता आली.
इंग्लंड (पहिला डाव) : ३७७
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : १५२
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ख्रिस गेल झे. स्वान गो. अँडरसन ०, ड्वेन स्मिथ त्रि. गो. ओनियन ४१, रामनरेश सरवान त्रि. गो. अँडरसन १, लेंडल सिमन्स झे. कूक गो. ओनियन्स २१, शिवनारायण चंदरपॉल झे. बोपारा गो. स्वान ४, ब्रँडन नॅश झे. कूक गो. ब्रॉड ८१, दिनेश रामदीन त्रि. गो. ब्रॉड ६१, जेरॉम टेलर पायचीत गो. स्वान १५, सुलेमान बेन त्रि. गो. स्वान ०, फिडेल एडवर्डस् झे. ब्रेसनन गो. ब्रॉड २, लिओनेल बेकर नाबाद २, अवांतर (बाइज ८, लेगबाइज १८, वाइड २) २८, एकूण ७२.२ षटकांत सर्वबाद २५६
बाद क्रम : १-१४, २-२२, ३-७०, ४-७५, ५-७९, ६-२२२, ७-२४३, ८-२४६, ९-२४९, १०-२५६
गोलंदाजी : अँडरसन १५-६-३८-२, ब्रॉड १९.२-२-६४-३, ब्रेसनन ७-३-१७-०, स्वान १७-४-३९-३, ओनियन १२-२-६४-२, बोपारा २-०-८-०
इंग्लंड (दुसरा डाव) : अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस नाबाद १४, अ‍ॅलिस्टर कूक नाबाद १४, अवांतर (नोबॉल ४) ४, एकूण ६.१ षटकांत बिनबाद ३२
गोलंदाजी : एडवर्डस् ३.१-०-१२-०, टेलर ३-०-
२०-०