Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

रिझवी महाविद्यालय अजिंक्य
मुंबई, ९ मे / क्री. प्र.

कर्णधार प्रफुल्ल वाघेला व डावखुऱ्या बिपीन वाघेला यांनी झळकाविलेली अर्धशतके

 

त्यांना अमीर बोरानिया (१९ धावांत ३ बळी), जेफ परेरा (१८ धावांत २ बळी) व भवेश पटेल (२० धावांत २ बळी) या फिरकी त्रिकुटाने दिलेली उत्तम साथ या जोरावरच रिझवी महाविद्यालयाने एस. पी. ग्रुप क्रिकेट अ‍ॅकेडमी व अलाइड डिजिटल स्पोर्ट्स फाऊंडेशन पुरस्कृत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या (४० षटके) अंतिम सामन्यात बंगाल क्लब, शिवाजी पार्क येथील खेळपट्टीवर खालसा महाविद्यालयाचा १० धावांनी पराभव करून विजेतेपदाचा चषक व रोख २०,०००/- रुपयांचे इनाम मिळविले. खालसा महाविद्यालयाने उपविजेत्यापदाचा चषक व ११,०००/- रुपये, तसेच उपान्त्य फेरीत हरणाऱ्या झुनझुनवाला व लाला लजपतराय संघांनी प्रत्येकी ७,०००/- रुपये पटकाविले.
संक्षिप्त धावफलक
रिझवी महाविद्यालय- सर्व बाद २१० धावा (चिंतन शहा ३५, स्वप्नील भोईर ३७, प्रफुल वाघेला ५१, बिपीन वाघेला ५०, विनित धुळप १७ धावांत ३ बळी, शार्दुल ठाकूर २४ धावांत ३ बळी, हर्षल नंदू ३४ धावांत २ बळी) विजयी विरुद्ध खालसा महाविद्यालय- सर्व बाद २०० धावा (स्वप्नील साळवी ४१, प्रतीक अमिन ३०, अमिर बोरानिया १९ धावांत ३ बळी, जेफ परेरा १८ धावांत २ बळी, भवेश पटेल २० धावांत २ बळी) सामनावीर-प्रफुल्ल वाघेला