Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ग्रॅण्डमास्टर एरेशचेन्को विजेता
मुंबई महापौर बुद्धिबळ
मुंबई, ९ मे (क्री. प्र.)

अपेक्षेप्रमाणे दुसरा मानांकित युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर एरेशेचेन्को अ‍ॅलेक्झांडर (एलो गुण

 

२६५७) याने दुसऱ्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्याने शेवटच्या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन उझबेकिस्तानचा ग्रॅण्डमास्टर इल्हाचेव्हा सईदअली (एलो २४९७) याजबरोबर सिसिलियन बचावमधील नॅजडॉर्क प्रकारामध्ये झटपट १० चालींमध्ये बरोबरी मान्य केली. त्याचे ११ पैकी९ गुण झाले.
एकूण १२ लाख रुपये बक्षिसांची ही स्पर्धा मालाड येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आज संपन्न झाली. या स्पर्धेला बृहन्मुंबई महानगरपालिका, ओ. एन. जी. सी. आणि एल. आय. सी. यांनी पुरस्कृत केले होते. स्पर्धा व्हीनस बुद्धिबळ अ‍ॅकेडेमीने आयोजित केली होती, तर मुंबई बुद्धिबळ संघटना तिचे संचलन करीत होती.
ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीनेसुद्धा आज चमकदार विजय संपादन करून आपली गुणसंख्या नऊ पर्यंत नेली; परंतु बुचॉलझ टाय ब्रेकमध्ये हंपीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ग्रॅण्डमास्टर कोस्टेन्को पेट्रल (कझगस्तान) हरविणाऱ्या अग्रमानांकित युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर व अग्रमानांकित मिरोशनेचेन्को इव्हीजिनिज यानेही नऊ गुण बनविले, तसेच रशियाच्या ग्रॅण्डमास्टर बेलोव्ह लॅडिमिरला नमवून भारताच्या ग्रॅण्डमास्टर मंगेश चंद्रननेसुद्धा आपली गुणसंख्या नऊपर्यंत नेली. बुचॉलझ टायब्रेकप्रमाणे अलेक्झांडर ८६.५, दुसरा क्रमांक कोनेरू हंम्बी (८५), तिसरा क्रमांक मिरोशनोचेन्को (८३.५) चौथा मंगेश चंद्रन (७८) कोनेरू हम्पीने पांढऱ्या मोहऱ्या घेऊन झिनचेन्कोविरुद्ध वजिराच्या प्यादाने सुरुवात केली होती. काळ्याने गुनफेल्ड बचाव वापरला. डावाच्या मध्यावर तिने एक प्यादे मिळवून आपले डी प्यादे बढत करण्याच्या तयारीत ठेवले होते. ३२ व्या चालीला तिने उंटाच्या बदल्यात काळा हत्ती मिळविला. आपले डी प्यादे ७ व्या घरात नेऊन बाजूला एक हत्ती ८ व्या घरात नेला होता. आणखी काही चालींमध्ये डाव कोसळल्यानंतर झिनचेन्कोने ४१ चालींना पराभव मान्य केला.
ग्रॅण्डमास्टर दीपन चअवथीने रशियाच्या ग्रॅण्डमास्टर डेव्हीटकिन अ‍ॅन्ड्रेईबरोबर बरोबरी केली. ग्रॅण्डमास्टर रिमोशेन्को (युक्रेन) व आ. मा. शामसुंदर यांनी पांढऱ्या मोहऱ्या घेऊन अनुक्रमे रामकृष्णन (एहो २३१०) व आकाश यांना पराभूत करून आपले गुण ८.५ बनविले. ग्रॅण्डमास्टर शुखास्तने काळ्या मोहऱ्या घेऊन सुवरमित सहाला पराभूत करून ८.५ गुण बनविले.
प्रत्येकी ८-५ गुणांवर ५ वा क्रमांक डेव्हीटकन अ‍ॅन्ड्रेई (रशिया) ६ वा दीपन चक्रवर्थी (भारत) ७ वा टिमोशेन्को जॉर्जी (युक्रेन), ८ वा सफीन शुखारत (उझबेकिस्तान) असे क्रमांक आले.