Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या ‘माझी भूमिका’ या २६ एप्रिलच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्या सर्वच प्रकाशित करणे जागेअभावी शक्य नाही. त्यातील तीन निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत. पहिली मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांची, दुसरी प्रकाशक सुनील मेहता यांची तर तिसरी लेखक प्रवीण दवणे यांची..

अखेर ८२वे संमेलन महाबळेश्वर येथे घेण्याचे निश्चित झाले. त्याआधी रत्नागिरीची जागा पाहून येण्याची तांत्रिक गरजही पार पाडण्यात आली. या सर्व प्रकारात मी अमेरिकेतल्या संमेलनाला अनुकूल नव्हतो. संमेलन हे मराठी ज्येष्ठ साहित्यिक, रसिक प्रकाशक, ग्रंथविक्रेते, तरुण होतकरू साहित्यिक यांची मांदियाळी असते. त्यासाठी शासन अनुदान देते. विश्वसंमेलनासाठीदेखील ठाले-पाटील यांनी शासनाचे पंचवीस लाख मिळवले. नंतर महाबळेश्वरचा प्रस्ताव आला त्या वेळी देखील मी प्रश्न विचारला होता. महाबळेश्वरला एखादी साहित्यसंस्था आहे का? एकदम कुणाला सांगता येईल. नंतर अध्यक्षांची निवड झाली. डॉ. आनंद यादव निवडून आले. मतदान अल्प झाले असे कानी आले. नंतर संघर्षांला तोंड फुटले. वारकरी संतापले. संतसूर्य तुकारामांनी डॉ. यादवांनी बेअब्रू केली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा असा वारकऱ्यांनी महागजर आरंभला. डॉ. यादवांनी अनेक प्रकारची मानहानी पत्करून अध्यक्षपद शाबूत ठेवले. अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागला. तो म. सा. प.कडे दिला. म.सा.प.ने तो स्वीकारू नये असे जाहीर केले.

विस्कटलेल्या साहित्य संमेलनामागील दमछाक व्यक्त करणारा आणखी एक लेख, कौतिकरावांच्या प्रदीर्घ लेखाच्या रूपाने प्रसिद्ध झाला आहे. भरतकामाचे उलटे धागे किती गुंतागुंतीचे, याचे मन विषण्ण करणारे दर्शन त्यातून घडते. या साऱ्या मेटाकुटीत साहित्याच्या निर्मळ प्रेमाने भारावून, साहित्य संमेलनाला पदराला खार लावून येणाऱ्या खऱ्याखुऱ्या रसिकाच्या भावनेला काही स्थान उरलेले नाही याचेच अतीव दु:ख होते. विविध कायदेशीर घटनाचे तंत्रमंत्र सांभाळून कुणीतरी एखादा ‘निवडून’ आला की ती निवड सामान्य रसिक लगेच शिरोधार्थ मानून त्याही अध्यक्षाचा सन्मान करतो. मग बेळगाव, हैदराबाद, दिल्ली, बंगलोरपासून अगदी नंदुरबार, येळगाव, रहितमतपूपर्यंत कुठून कुठून शेकडो रसिक संमेलनाला येतात. २-३ दिवस पुस्तकांच्या वातावरणात, साहित्यिकांच्या थोडं जवळ- थोडं दुरून सहवासात त्याचे क्षण उत्साहात जातात. कधी रटाळ, कधी चतन्यमय, कधी व्यासंगी, कधी उथळ परिसंवाद, भाषणे, कविसंमेलने, हा सामान्य- पण निखळ प्रामाणिक साहित्यरसिक आनंदाने पचवतो. आणि झेपतील तेवढे ग्रंथ विकत घेऊन, उपस्थित साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या त्यावर घेऊन कौतुकाने गावाला परततो.

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी मांडलेली भूमिका वाचली. त्यांनी केलेले सर्व आरोप व त्यांनी मांडलेली स्वत:ची भूमिका याबद्दल माझे हे थोडक्यात स्पष्टीकरण-
म हामंडळाने विचार करून महाबळेश्वरची निवड संमेलनासाठी केल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी कुठल्या व्यक्तींचा विचार केला त्याचा उल्लेख दिसत नाही. दर वर्षी साहित्यसंमेलनाला येणारा मोठा वाचकवर्ग, आपली पुस्तके विकण्यासाठी येणारा प्रकाशक, ग्रंथविक्रेता, साहित्य संमेलनाला आपले तीर्थस्थळ मानणारे लेखक; अशा साहित्यसंमेलनात लेखक-पुस्तक - वाचक यांची गळाभेट होत असते, सुसंवाद होतो, नवनवीन योजना ठरतात, नवीन कवींना व्यासपीठ मिळते, त्या त्या शहरात वाढणारा नवीन व तरुण वाचक वर्ग, त्या त्या गावातील साहित्यिक परंपरा या सगळ्याचा विचार महामंडळाने केला असा याचा अर्थ काढायचा काय. - ‘विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी आम्ही फक्त त्यांना मदत करणार आहोत’ अशी भूमिका वर्तमानपत्रातून जाहीर करणारे महामंडळ आता या लेखात त्यांची ‘जबाबदारी आहे’ असा खुलासा करत आहे. सत्य परिस्थिती मांडण्याचा दावा करणाऱ्या या लेखामध्ये, या संमेलनात काय काय गमतीजमती झाल्या याचा थोडाफारही उल्लेख महामंडळाने करू नये किंवा तिथे केलेल्या ठरावांचा गोषवारा कुठल्याही साहित्य परिषदेच्या सभासदांना कळू नये, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

अमेरिकन मंदी खरी किती, खोटी किती?
असे म्हणायची पद्धत आहे की, मंदी, आर्थिक अरिष्ट, शेअरबाजारातील अस्थिरता, फुगे निर्माण होणे व फुटणे ही सर्व भांडवलशाहीची लक्षणे आहेत. परंतु, त्याचबरोबर हे सांगितले जात नाही की असे ‘पेचप्रसंग’ निर्माण करायचे आणि ‘अरिष्ट हीच संधी’ असा सिद्धांत मांडला गेला आहे. फुगे फुगवायचे आणि फोडायचे, ही आता बँका आणि मल्टिनॅशनल वित्तीय संस्थांची नीती झाली आहे. या कारस्थानात वर्ल्ड बँक, आयएमएफ अमेरिकन सरकार आणि मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन्स सामील आहेत. तथाकथित फुगे फुगले वा फुटले तरी त्यांचे नफे मात्र फुगतच राहिले. म्हणूनच मूळ प्रश्न विचारायला हवा तो हा, की ही अमेरिकन मंदी खरी आहे, की खोटी?
’ १९८० च्या दशकात रिगन प्रशासनाने कार्पोरेशन्सना रान मोकळे करून दिल्यामुळे कार्पोरेशन्सनी ‘सर्जनशील हिशोबपद्धती’ (क्रिएटिव्ह अकाऊंटिंग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिशोबव्यवस्थेचा गैरवापर करून प्रचंड मोठय़ा प्रमाणावर आíथक गुन्हे, गैरव्यवहार केले. अकाऊंटिंग फम्र्सनी अशा गुन्ह्य़ावर नियंत्रण करण्याऐवजी त्याला मदत केली. हिशोब तपासनीसांनी खोटे हिशोब आणि ऑडिट, मूल्यमापन, नफ्याचा खोटा ताळेबंद आणि कंपन्यांतर्गत घेतलेले कर्ज आणि व्यवहाराबद्दल बनावट कागदपत्रे तयार करून गुंतवणूकदारांची इतक्या मोठय़ा प्रमाणावर दिशाभूल केली की एन्रॉन, वर्ल्ड डॉट कॉम आणि तत्सम मोठे आर्थिक गुन्हे, गैरव्यवहार बाहेर येईपर्यंत त्याचा कुणाला पत्ताही लागला नाही. १९८० च्या दशकात वित्तीयकरणाचे वारे जोरात वाहत असतांना व्हाईट कॉलर गुन्हेगारीवर त्याच नावाचा ग्रंथ लिहणाऱ्या फ्रँक कॉस्टीगन यांच्या मतानुसार १९८० च्या दशकात अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्र अत्यंत भ्रष्ट बनले.

‘‘माझे चित्रपट फार आक्रस्ताळे होते’’ असं जाहीर कबूल करण्याचं धैर्य किती जण दाखवू शकतील? भौतिकतेची सर्व सुखे पायाशी लोळण घेतील अशी प्रलोभने नाकारणारे कुठे भेटतात? आपले साथीदार सत्तेमध्ये असताना फायदा घेणं तर दूरच त्यांचे दोष परखडपणे मांडणारे फकीर कुठे दिसतात? अशा व्यक्तीचं वर्णन ‘अवलिया’ या एकाच शब्दात करता येईल. (भौतिकतेमध्ये न रमणाऱ्या साधू वृत्तीस अवलिया म्हटले आहे.) पन्नास वर्षांत सत्तावीस चित्रपट व बारा लघुपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या पद्मभूषण मृणाल सेन यांनी गेल्या पाच वर्षांत चित्रपट केला नाही. तरीही त्यांचे धारदार विश्लेषण तसेच शाबूत आहे. संवेदनशीलता अढळ आहे. १४ मे रोजी ८६ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या मृणालदांचे जगाविषयीचे कुतूहल आणि ते पाहण्यासाठी लागणारा मनाचा खुलेपणा तसचा टिकून आहे. बोलताना सहज येणारा नर्मविनोद तसूभराने कमी झालेला नाही. कोलकाताच्या महाराष्ट्र मंडळाच्या अगदी पाठीमागे बेलतोला रस्त्यावर अडीच खोल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या मुलाखतीमधील काही अंश- दु ष्काळात माणसांचच काय होतं? व्यक्ती दुष्ट असतात का काळच क्रूर असतो? जात, वर्ग व निसर्ग यापैकी कशाचीही साथ नसणारे कोटय़वधी लोक कसे जगतात? दरिद्री व वंचित माणसं आणि त्यांचं वर्तन समजून घेण्याचा ध्यास मृणाल सेन यांनी कसा घेतला ते पहायचं आणि अनुभवायचं असेल तर मृणाल सेन यांचा चित्रपट पाहा.

माझ्या मुलींचे शेवाळकर आजोबा गेले. हो मला मानसकन्या मानत होते ते. परिचय १९९६ चा. रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये जर्नालिझम करत असताना शेवाळकर पुण्यात आले की, ते असतील तेवढे दिवस त्यांची लेखनिक म्हणून काम करण्यासाठी काही महिने मी जात होते. त्यानंतर त्यांचंही पुण्यात येणं कमी कमी होत गेलं आणि मीही पत्रकारिता क्षेत्रात मुक्त पत्रकारितेत रमून गेले. नंतर १०-११ र्वष संपर्क नव्हताच. गेल्या वर्षी आनंदवनात साधनाताईंना भेटले तेव्हा शेवाळकरांच्या आठवणी निघाल्या आणि तिथून पुण्यात परतल्यावर पहिल्यांदा शेवाळकरांना फोन केला. खूप वेळ मी आणि माझे पती त्यांच्याशी फोनवर बोललो त्या वेळी त्यांच्या संवादातून झालेल्या संभाषणातला आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतेय, ते म्हणाले होते- ‘लेखनिक बरेच मिळाले मला, पण वाङ्मयीन दृष्टी असलेली तू एकटीच होतीस’.. अर्थात साहित्यिक-लेखनिक असं नातं नव्हतंच कधी आमच्यात, माझ्या नवऱ्याबद्दल विचारपूस करताना म्हणायचे, ‘काय म्हणताहेत आमचे जावईबापू?’ त्या दिवशी फोनवर बोलताना माझे पती डॉ. कुलकर्णी त्यांना गमतीत बोलताना म्हणाले, ‘तुमचं नागपूर काळं का गोरं अजून पाहिलं नाही आम्ही, एकदा येऊ आम्ही तुमच्या घरी’. तेव्हा शेवाळकरांचं उत्तर मोठं मार्मिक होतं, ‘‘नागपूर काळं असलेलं मी तरी बघितलेलं नाही. तेव्हा गोरं नागपूर मात्र नक्की दाखवेन मी तुम्हाला!’’ त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये ते पुण्यात आले होते.