Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेला आपला देश सध्या पंधराव्या संसदेसाठी मतदानप्रक्रियेच्या विविध टप्प्यांतून जात आहे. प्रस्तुत लेख आपल्या हाती येईपर्यंत चौथ्या टप्प्यातील मतदान संपलेले असेल. यानंतर निवडणुकांच्या निकालांवर सर्वाचे लक्ष असेलच. पण त्याचबरोबर या निकालांचे पडसाद शेअर बाजारावर कसे उमटताहेत हे जाणून घेण्याची उत्सुकतादेखील असेल. वार्षिक अर्थसंकल्प आणि पंचवार्षिक संसदीय निवडणुकांपश्चात शेअर बाजारात होणाऱ्या उलथापालथीचे भाकित करणे तज्ज्ञांसाठी एक आव्हानच असते. त्यामुळे निवडणुकानंतरचे शेअर बाजाराचे भविष्य वर्तवण्याबरोबरच टेक्निकल अनॅलिसिसच्या आधारे येणाऱ्या काळातील चढउतारांचे क्रमवार टप्पे लक्षात घेणे जास्त संयुक्तिक ठरेल.
६ मार्च २००९ रोजी ८०४७.१७ चा तळ गाठून सुरू झालेली सेन्सेक्सची वाटचाल ६ मे २००९ रोजी १२२७२.१० ची उंची गाठून ८ मे रोजी ११८७६.४३ वर स्थिरावली आहे.
खालील आकृती (Weekly Chart) मध्ये दाखविल्याप्रमाणे सेन्सेक्सने १२,००० तसेच २०० EMA चे मोठे प्रतिरोध (Resistance) तोडून टाकले आहेत. यानंतर १३,००० चा टप्पा महत्त्वाचा ठरेल. परंतु, सद्य परिस्थितीत सेन्सेक्स

 

Overbought झालेला दिसत आहे. परिणामी सेन्सेक्सची एक उतरण (Correction) अपरिहार्य आहे.
सर्वसामान्य परिस्थितीत हेCorrection १०,३०० पर्यंत आले असते, परंतु हा निवडणुकीच्या धामधूमीचा काळ आहे. कानाकोपऱ्यातून येणाऱ्या उलटसुलट बातम्यांमुळे सेन्सेक्स अत्यंत अस्थिर (Volatile) होईल. परिणामी सेन्सेक्स ९७०० पर्यंतसुद्धा खाली जाऊन आपले Correction पूर्ण करू शकतो. परंतु अगदी मार्केटद्वेष्टय़ा कम्युनिस्टांचे सरकार जरी सत्तेवर आले तरीही सेन्सेक्स ९२०० च्या खाली जाणार नाही असे चित्र दिसत आहे.
हे Correction पूर्ण करत मार्केट पुन्हा एकदा बाळसे धरू लागेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मोठय़ा तेजीची सुरुवात झाली असे म्हणता येईल. या बाबतचे स्पष्टीकरण २९ डिसेंबर २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘.. तर सेन्सेक्स ४०००० वर जाईल’ या लेखात, यापूर्वीच देण्यात आले आहे.
या पडझडीच्या काळात गुंतवणूकदारांनी रु. ३५० च्या आसपास मिळाल्यास महिंद्र अॅण्ड महिंद्रा, रु. २५० च्या आसपास मिळाल्यास विप्रो, रु. २२० च्या आसास मिळाल्यास सिप्ला, रु. ३०० च्या आसपास मिळाल्यास कॅस्ट्रॉल किंवा रु. २०० च्या आसपास मिळाल्यास टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकीची संधी दवडू नये. येणाऱ्या एक ते दीड वर्षांच्या काळात यात दामदुपटीने नफा मिळू शकेल.
’ प्रा. प्रवीण मोकाशी
\www.equitymonk.com