Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

मार्केट मंत्र
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये ७३१ अंशांची तेजी आली. या वर्षांतील इन्ट्राडेक्सची ही सर्वात मोठी भरारी. सेन्सेक्सने १२००० टप्पादेखील पार केला. उन्हाळ्यातील वाढत्या गर्मीबरोबर शेअर बाजारातील तेजी वाढत आहे. आठ आठवडय़ापासून ही तेजी कायम आहे. तरीही काही लोक बाजारामध्ये मंदीच चालू

 

आहे, असे बोलतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा सेन्टीमेंट मंदीचा होतो. म्हणूनच अशा प्रकारच्या तेजीमध्ये सामान्य गुंतवणूकदार खरेदी करू शकला नाहीत आणि तेजीची बस सुटली. नेहमीप्रमाणे ‘फिरंगी’ माल घेऊन निघून गेले आणि त्यांनी चांगला प्रॉफिट करून घेतला. २३ मे ला सरकार स्थापन होईल आणि शेअर बाजार आपली चाल निश्चित करतील. परंतु काही असो आता इथून बाजार मोठय़ा प्रमाणावर घसरु शकत नाही. जोपर्यंत निर्देशांक ११२०० वर बंद होत नाही तोपर्यंत घाबरण्याचे काही कारण नाही. जे गुंतवणूकदार लवकर एन्ट्री-एक्झिट करू शकतात, अशांसाठी हा बाजार आहे. बाजाराचा अंडरटोन मजबूत आहे. चांगल्या स्क्रीप्ट डे ट्रेडरना फायदा देतील. रिलायन्स, लार्सन, एच.डी.एफ.सी., भेल, ओएनजीसी, एसबीआय या समभागात दीर्घकालीन गुंतवणूकदारांना नेहमीप्रमाणे फायदाच मिळाला आहे. कोणतेही निगेटिव्ह कारण बाजाराला तेजीपासून थांबवू शकलेले नाही. परंतु आता मंदीसाठी भरपूर कारणे आहेत. उदा. स्वाईन फ्लू, सरकारची स्थापना, भारताचे अर्थधोरण, ओबामांनी केलेला आऊट सोर्सिगचा विरोध इत्यादी कारणांमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर उलथापालथ पाहावयास मिळेल. आता लॉन्ग टर्मसाठी खरेदी करा. कोलगेट, जेट एअरवेज, जेएसडब्ल्यू येणाऱ्या काही दिवसांमध्ये तेजीमध्ये १२६५०, १२९५०, १३३२० आणि मंदीमध्ये ११२०० चा स्टॉप लॉस लावून तेजीच्या दिशेने उभे राहा. जर आपण इंट्राडे ट्रेडर असाल तर आपल्या कुवतीच्या एक-चतुर्थाश काम करा. स्टॉप लॉस लगेचच ठेऊन द्या. मे महिन्यामध्ये सांभाळा मित्रांनो नाहीतर तोटा होईल..!
’ निमीष शाह
९८२०१७२८९९
nimishshah@live.com