Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहा
वृषाली ट्रेडिंग कंपनीचे संचालक राम दळवी भेटतात तेव्हा चहा या विषयाला चांगलीच उकळी फुटते. कारण त्यांची कंपनी चहाचा व्यापार करते. अगदी आसाममधल्या दिब्रूगड इथल्या चहाच्या मळ्यापासून, त्याची वार्षिक चार वेळा छाटणी, प्रतवारी, मिक्सिंग-ब्लेटिंग किती महत्त्वाची प्रक्रिया यावर ते भरभरून बोलतात. पण परवा राम दळवी भेटले ते वेगळ्याच मूडमध्ये बोलत होते. गांधीयन मंत्र व चहाचा चाहता ग्राहक या विषयावर ते मोठय़ा आत्मविश्वासाने सांगत होते.. ‘आमच्या कंपनीच्या चहाचे ब्रँडनेम ‘वृंदावन’

 

आहे. सध्या आमच्या कंपनीपुढचे ध्येय आहे.. घरोघरी वृंदावन चहा. समाजातील सर्व थरांतील अधिकाधिक लोकांपर्यंत उद्योजकांनी आपली उत्पादने पोहोचविल्यास बाजारपेठ वाढते. त्यांना यशही मिळू शकते. शिवाय समाजातील विषमता दूर होण्यास मदत होते. या मंत्राप्रमाणे आम्ही चहा विक्रीच्या डेपोचे जाळे तयार करीत आहोत. ग्राहक देवो भव मानून ग्राहकांना घरपोच चहा, मनी बॅक गॅरन्टी. कुपन सोय, शिवाय बाजारातल्या ब्रॅन्डनेमपेक्षा कमी किमतीत उत्तम चहा. म्हणून तर वृषाली ट्रेडिंग कंपनीची सुरुवात फक्त १०० किलोनी झालेली होती ती आज २० टनांपर्यंत पोहोचलेली आहे..’
म्हणजे दळवीसाहेब आपली कंपनी रिटेल तेजीवर स्वार होत आहे तर! नाही तरी जागतिक स्तरावरच्या कंपन्यादेखील दैनंदिन गरजेच्या पेस्ट, साबण, तेल, शाम्पू आदी वस्तूंच्या पाऊच रूपाने ते अगदी तळागाळातल्या ग्राहकाला आपलेसे करीत आहेत. एवढेच काय पिण्याच्या पाण्याचे पाऊचही ग्राहकांची तहान भागवीत आहेत. अशा या किरकोळ विक्री व्यवस्थापनाला काही तज्ज्ञ मंडळी गांधीयन इंजिनीअरिंग असेही म्हणतात.
‘‘हाऽ.. हाऽ तेच इंजिनीअरिंग म्हणा वा मंत्र, शेवटी उद्योजकाला आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असतात आणि आम्ही तर चहा पावडरचे विक्रेते. चहा म्हणजे स्वागत पेय. आजच्या धावत्या काळाचे अमृत. काळाप्रमाणे बदलणे, म्हणून तर ‘वृंदावन चहा घरोघरी’ हे ध्येय साकारून आम्ही आमची कंपनी मोठी तर करतोच, पण त्यातून वितरण व्यवस्था- डेपो संख्या वाढवून मोठय़ा प्रमाणावर रोजगारही निर्माण करीत आहोत. घरबसल्या गृहिणी, विद्यार्थी, बेरोजगार, पार्टटाइम या दिशेनेही वृंदावन चहाचे डेपो चालविता येतात. आतापर्यंत मुंबईच्या उपनगरातून ८०० डेपो सुरू असून साधारण २००० लोक त्याचा फायदा घेत आहेत. असे नेटवर्क राज्यभरच नव्हे तर देशभर निर्माण करण्याची आमची इच्छा आहे. अशा प्रकारे वृंदावन चहाची किरकोळ विक्री करणारी आमची एकमेव कंपनी आहे.’’ काळाप्रमाणे बदलत राम दळवी वृंदावन चहाला घरोघरी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारात ब्रॅन्डनेम असलेली नामांकित कंपन्यांचे चहा आहेत. तरी पण दळवींसारख्या एका मराठी तरुणाने या क्षेत्रात उतरून भक्कमपणे उभे राहणे ही त्यांच्या उद्योजकतेची कसोटी म्हणावी लागेल. चहाचा व्यापार हा काही त्यांचा वारसा नाही. रायगड जिल्ह्य़ातील माणगावचे रहिवासी. वडील सेवानिवृत्त. मोठे बंधू लक्ष्मण यांनी गावातच इलेक्ट्रिकल-हार्डवेअरचे दुकान थाटले. एका दुकानावर पूर्ण कुटुंब पोसणे शक्य नाही म्हणून ते मुंबईत आले. प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करीत तसे जॉबवर्कही केले. रात्रौ कॉलेज करून बी. कॉम. पदवी मिळविली आणि योगायोगाने प्रख्यात चहा कंपनीतील एका अधिकाऱ्याशी ओळख झाली. दैनंदिन गरज असणाऱ्या अशा चहाच्या मार्केटिंगमध्ये राम दळवी कामाला लागले. चहाचे मळे, त्यांची प्रतवारी, ब्लेंडिंगचे कसब, त्याचे महत्त्व त्यांनी जाणले. पॅकिंग, वितरण, किंमत याचा अभ्यास केला. लोकाभिमुख चहा पावडरची मागणी वाढती आहे. ही गरज आपणही भागवू शकतो या विश्वासाने राम दळवी यांनी वृषाली ट्रेडिंगची स्थापना केली. बाजारातल्या चहाप्रमाणेच दर्जेदार चहा पण माफक किमतीत व तत्पर सेवा हे धोरण राबविले. अनावश्यक खर्चाला आळा घातला. तसेच घरच्यांनी पाठिंबा दिल्याने जम बसत गेला. हॉटेल मिक्सिंगचे ग्राहक स्थिरावत गेले आणि मध्येच रिटेलिंगचे गांधीयन मंत्र सुचले तसे दळवी यांनी लहान-मोठे, घरगुती वृंदावन चहाचे डेपो सुरू केले आणि असे डेपो राज्यातल्या इतर जिल्ह्य़ांतूनही सुरू केले. फक्त एका फोनवर वृंदावन चहा आपल्या दारी येतो. अर्थात अशा वितरण प्रक्रियेत कंपनी डेपोधारकांना प्रशिक्षण देते. तसेच कंपनीचे सेल्समनही त्यांना मदत करतात. त्यामुळे चहाच्या या वितरणात एक विश्वसनीयता आलेली आहे. रत्नपारखी अनुभवाने ठरतो, तसे राम दळवीही चहापारखी आहेत. चहा कंपनीत नोकरी
एक चाकरी म्हणून त्यांनी केलेली नव्हती. चहाचा एक कार्यानुभव म्हणून त्यांनी चहाविश्वात पदार्पण केले. चहाचे मळे पाहिले. ब्लेंडिंगचे कौशल्य शिकून घेतले. अशा विश्वासातून
राम दळवी आज चहा व्यापारात स्थिरावले आहेत. चहा क्षेत्रातील वृषाली ट्रेडिंग कंपनी
मोठी व्हावी, नामवंत व्हावी अशी त्यांची
धडपड आहे. घरोघरी वृंदावन चहा.. हा
त्यांचा ध्यास आहे. पण या सर्वस्पर्शी सेवा उद्योगात सहकाऱ्यांची साथ हवी. होतकरू, नवउद्योजकांना अशी साथ मिळत नाही असा दळवींचा अनुभव आहे. किंबहुना अडथळे आणले जातात. गुजराथी, राजस्थानी,
मारवाडी असे पारंपरिक उद्योजकीय समाज एकमेकांना सांभाळून घेतात. त्यांना मनुष्यबळाची साथ मिळते. उडपी लोकांनी हॉटेल उद्योगावर आपला प्रभाव निर्माण केला ते अशा साथसंगतीमुळे. तेव्हा राम दळवींसारख्या उमेदीच्या उद्योजकांने समाजानी साथ दिली
तर वृंदावन चहा घरोघरी जाण्यास कितीसा
वेळ लागणार! संपर्क : ९८२१७२९८४५/ ९३२१९२९८४५.
’ भीमाशंकर कठारे