Leading International Marathi News Daily

सोमवार ११मे २००९

आता पेन्शन प्रत्येकासाठी!
जी-२० चे फलित
सत्तासंघर्ष झुगारून सेन्सेक्स मुसंडी मारेल..
एसएमएसद्वारे कळविलेली खात्यावरील शिल्लक कायद्याने ग्राह्य़ धरता येणार नाही
देता किती घेशील दो कराने!
मार्केट मंत्र
पर्यटन व्यवसायातील ध्येयवेधी वाटचालं
यशोगाथा : घरोघरी वृंदावन चहां
वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्रीं

वाटा स्वयंरोजगाराच्या : ऑप्टोमेट्री
वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रविभागाची उपशाखा असलेल्या ऑप्टोमेंट्रीच्या अभ्यासक्रमामध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळत असून अशा प्रशिक्षित ऑप्ट्रोमेंट्रिस्टना आज संपूर्ण जगभरातून भरपूर मागणी असते. चार वर्षांचा पदवी

 

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हा ऑप्टोमेट्रिस्ट स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करणे, नेत्रतज्ज्ञाकडे काम करणे, नेत्र रुग्णालयात काम करणे, कॉन्टेक्स लेन्सेस, लो व्हिजन एडस्ची प्रॅक्टिस करणे, चष्म्याच्या लेन्सेस, कॉन्टक्ट लेन्सेसची निर्मिती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत विविध स्तरांवर काम करणे, चष्म्याच्या दुकानात देशात तसेच परदेशातही विविध प्रकारची कामे करू शकतो. आणि या सर्व ठिकाणांहून अशा प्रशिक्षित ऑप्ट्रोमेट्रिस्टना भरपूर मागणी असते. कंपनीच्या रिटेल आऊटलेटमध्ये मॅनेजर म्हणून, कौन्सिलर म्हणून, समाजसेवेची आवड असल्यास नेत्र शिबिराच्या माध्यमातून, स्वत:चा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे.
संपर्क- ९७६९१०५५८७/ ०२२- २७४५२२२८.
टॅक्स कन्सल्टंट
करदाता हा आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे. कर व आर्थिक क्षेत्र हे खूप मोठे आहे. या क्षेत्राला सध्या व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असून उत्पन्नाचे साधन म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
बेसिक अकाऊंटस्, प्रोफेशनल अकाऊंट्स रायटिंग, संपूर्ण इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स फायलिंग, सव्र्हिस टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, सेल्स टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, एक्साइज डय़ूटी व्हॅल्युएशन, सेन व्हॅट प्रोसिजर्स, रजिस्ट्रेशन प्रोसिजर्स, कंपनी रजिस्ट्रेशन, बँकिंग अॅण्ड फायनान्स, प्रोजेक्ट रिपोर्ट्स या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात येईल. मुख्यत: व्हॅट प्रणाली व त्याचे अकाऊंटिंग, व्हॅल्यू अॅडेड टॅक्सचे बदलणारे नियम व करपद्धती, सव्र्हिस टॅक्सप्रणाली याबद्दलही मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॅट टॅक्स रिटर्न भरण्याच्या पद्धती, व्हॅट टॅक्स कायदे, करमुक्त उत्पन्न या करपद्धतीविषयी पूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संपर्क- ९८१९०७०१६६/ ९३२५०७२००६.