Leading International Marathi News Daily
मंगळवार, १२ मे २००९

तालिबान म्हणजे ‘आयएसआय’ आणि ‘सीआयए’ने निर्माण केलेला भस्मासूर
झरदारी यांची कबुली
वॉशिंग्टन, ११ मे/पी.टी.आय.
तालिबानचे भूत हे ‘आयएसआय’ आणि ‘सीआयए’ यांनीच निर्माण केले असून, तालिबान हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आज मान्य केले. अमेरिकेच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वी भारत हा आमचा ‘एक नंबर’चा शत्रू नसल्याचे मान्य करणाऱ्या झरदारी यांनी एन.बी.सी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, तालिबानला थोपवण्याचा मार्ग काढायला विसरलो आहोत. या राक्षसी शक्तीशी आमचे खरे युद्ध आहे, असे म्हटले आहे.

उत्तरेकडील गारपीट महाराष्ट्राच्या पथ्यावर
विजेचे वाढीव भारनियमन टळणार
मुंबई, ११ मे / प्रतिनिधी
उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेली गारपीट महाराष्ट्राच्या पथ्यावर पडली आहे. या गारपीटीमुळे उत्तरेकडील राज्यांच्या विजेच्या मागणीत लक्षणीय घट झाली असून त्याचा लाभ उठवून महाराष्ट्राने राष्ट्रीय ग्रिडमधून अत्यंत कमी दराने तब्बल ८४० मेगावॉट जादा वीज खेचली आहे. त्यामुळे राज्यातील विजेच्या भारनियमनात कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट संकेत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिले असून ही उन्हाळ्याच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जनतेसाठी अत्यंत समाधानाची बाब मानण्यात येत आहे. चंद्रपूरच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड निर्माण होऊन जवळपास ७५० मेगाव्ॉटची निर्मिती ठप्प झाल्याचे वृत्त थडकले.

पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे दोन संशयित रुग्ण
पुणे, ११ मे / प्रतिनिधी

अमेरिका आणि स्पेनमधून परतणारे दोन प्रवासी ‘स्वाईन फ्लू’चे संशयित रुग्ण म्हणून आढळले असून ते पुण्यातील आहेत. संशयित रुग्णांना महापालिकेच्या नायडू संसर्ग रुग्णालयात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दोघांच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. चोवीस तासांत त्याचा अहवाल येणे अपेक्षित असून त्यानंतरच उपचाराची दिशा ठरविण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी
महाराष्ट्रातही आता दोन रुपयांनी धान्य

संदीप प्रधान, मुंबई, ११ मे

‘दोन रुपये किलो दराने तांदूळ व तीन रुपये किलो दराने गहू’, अशा लोकानुनयी घोषणा करणाऱ्या राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होणार असल्याचे संकेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिले. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वस्त दरात धान्य वाटप करण्याची योजना लागू करण्याचा सरकारचा विचार सुरू असून येत्या अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अडीच लाख विद्यार्थी आज देणार ‘सीईटी’
पुणे, ११ मे/ खास प्रतिनिधी

अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उद्या, मंगळवारी (दि. १२) सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होत असून राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी या आव्हानासाठी कंबर कसली आहे. ‘सीईटी’च्या प्रवेशपत्रांमधील तपशिलात गोंधळ झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असल्या, तरी प्राप्त झालेल्या प्रवेशपत्रानुसार सर्व विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. कुणालाही परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रॅगिंगच्या आरोपावरून तिघांना अटक; दोघे फरारी
लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतनातील गैरप्रकार
लातूर, ११ मे/वार्ताहर

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात रॅगिंग केल्याची फिर्याद पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या आकाश बालाजी आचवले याने आज दिली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली. दोन विद्यार्थी फरारी असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. लातूरच्या शैक्षणिकजगतात खळबळ उडवून देणारी ही घटना असून प्रथमच रॅगिंगसंबंधी गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश आचवले (वय १७) शिरूर अनंतपाळचा रहिवासी असून तो तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक शाखेच्या पहिल्या वर्षांत शिकत आहे.

‘नासा’लाही मंदीचा फटका
तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांची कपात
‘इस्रो’मध्ये मात्र नोकरकपात नाही!

विनायक परब, मुंबई, ११ मे

जागतिक मंदीची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली असून ते गंडांतर आता अवकाश संशोधनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनपर्यंत (नासा) पोहोचले आहे. नासाच्या विविध मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या तंत्रज्ञांपैकी सुमारे आठ हजार तंत्रज्ञांना तरी येत्या काळात घरी बसावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली असून ‘नासा’नेच या शक्यतेवर शिक्कामोर्तबही केले आहे. केवळ एवढेच नव्हे तर नासाच्या विविध मोहिमांसाठीच्या गंगाजळीमध्येही यापूर्वी मंजूर केलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम पडणार आहे.

बेदरकार वर्तनासाठी
कोर्टाने कसाबला फटकारले

मुंबई, ११ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी चौपाटी येथे झालेल्या पोलीस चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची हत्या केल्याचे न्यायालयाला सांगणारे पोलीस उपनिरीक्षक भास्कर कदम यांनी आज कसाबने ज्या एके-४७ रायफलने ओंबळेंवर गोळीबार केला ती रायफलही न्यायालयात ओळखली.

आयपीएल मॅचवरून बापाने केली मुलाची हत्या
मुंबई, ११ मे / प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे रात्री उशिरापर्यंत झोपू न देणाऱ्या मुलाची निर्घृणपणे चाकू भोसकून बापाने हत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी (पूर्व) येथील शंकरवाडी परिसरातील गोम्स चाळीत व्यवसायाने पहारेकरी असलेले मेघनाथ कांबळे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. संगणक दुरुस्तीचा अभ्यासक्रम शिकणारा संदेश काल रात्रीही नेहमीप्रमाणे आयपीएलच्या मॅचचा घरच्या टीव्हीवर आनंद लुटत होता.

विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या;
विद्यार्थ्यांची ससेहोलपट

मुंबई, ११ मे / प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने गेल्या महिन्यात होणाऱ्या शेकडो अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. अशातच उद्या आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी होत असलेल्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’मुळे (सीईटी) विद्यापीठाच्या सुमारे ४६ अभ्यासक्रमांच्या अंदाजे १०० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सुधारित वेळापत्रकाची माहिती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र ससेहोलपट झाली आहे. उद्या (मंगळवार) होणाऱ्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी