Leading International Marathi News Daily
गुरुवार । १४ मे २००९
  आध्यात्मिक ग्रंथांचे महत्व...
आजच्या संदर्भात
  ओपन फोरम
  थर्ड आय - ..आता यांच्याच घ्यायला हव्यात ‘कार्यशाळा’!
  दवंडी - व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी..!
  लँग्वेज कॉर्नर - अडुसष्टचा झंझावात
  स्मार्ट बाय
  ग्रूमिंग कॉर्नर - धावा.. पण जरा जपून!
  दिशा - म्युझियम माझे दुसरे घर
  ऑल द बेस्ट - ४००० व्या प्रयोगाकडे वाटचाल
  अवती भवती - पत्रकार ते पर्सनल फिटनेस ट्रेनर

निर्णयक्षमता
वंदन : Rashmi, what I heard is true?
रश्मी : काय ऐकलंस तू?
वंदन : ou are not going to America with your hubby?
रश्मी : हं ते होय? ते खरंच आहे.
वंदन : I can't believe it.

 

रश्मी : वंदन, जरा मायमराठीत बोल ना!
वंदन : Oh! ya! I am so sorry!
रश्मी : वंदन..
वंदन : याला म्हणतात, दैव देतं नि कर्म नेतं. इथं आम्ही तडफडतोय अमेरिकेला जायला तर आम्हाला नाही संधी मिळत आणि ही रश्मी इतकी ॠ’ीिल्ल स्र्स्र्१३४ल्ल्र३८ सहज सोडून देतेय.
सारंग : तर काय! वंदन, तुझं अजून कुठे नाही जमलं ना रे?
वंदन : नाही ना! मला तर वाटतं माझ्या नशिबातच नाहीये.
रश्मी : पण वंदन तू इतका का अधीर आहेस अमेरिकेला जायला?
वंदन : हा काय प्रश्न झाला? अरे काय ठेवलंय काय या इंडियात?
इथली घाण, अस्वच्छता, पोल्यूशन, बेकारी, झोपडपट्टी.. सगळ्या सगळ्याचा वीट येतो नुसता मला. लहानपणापासून मी हे स्वप्न पाहिलं होतं. अमेरिकेला जाण्याचं. पण आपलं नशीबही बघ रश्मी, माझ्या नोकरीची वेळ आली तसे तिकडे रिसेशन आलं.
रश्मी : अरे इतका का निराश होतो आहेस? होईल तुझं पण स्वप्न पूर्ण.
वंदन : रश्मी, तू मैत्रेयलाही सांगून ठेव हं माझ्याबद्दल.
रश्मी : अरे, तो फक्त त्याच्या प्रोजेक्टसाठी चाललाय. वर्षभरात त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि तो परतही येईल.
मीनल : रश्मी, तू खरंच एक वर्ष मैत्रेयपासून दूर राहू शकशील? जड नाही जाणार तुम्हाला?
रश्मी : मला वाटतं मीनल आपल्या प्रायोरीटीज ठरवल्या तर नाही जड जात.
मीनल : तरी पण मला नाही बाई जमणार.
नेहा : ते तर दिसतंच आहे. अगं, नुसतंइथल्या इथे एक-दोन दिवसासाठीही पाठवायची तयारीनसते तुझ्या नवऱ्याची, वर्षभर काय दूर राहणार तुम्ही? आताही किती दिवसांसाठी आली आहेस?
मीनल : किती दिवसांसाठी कसलं गं! संध्याकाळी हजर होईल मला न्यायला.
रश्मी : ए मीनल, आज जाऊ नकोस ना. अगं किती दिवसांनी आपण सगळे असे एकत्र जमलोय.
मीनल : छे! शक्यच नाही. मी नाही गेले तर विशाल इतका रागावतो ना की बस्स! घरात शिरल्याशिरल्या दिसायलाच लागते त्याला. मी नसले ना तर जेवणाचेही हाल करून घेतो.
सारंग : आणि मीनलबाईंना पोहोचायला उशीर झाला की, मग फोनवर फोन.. तो बघ आताही फोन वाजतोच. त्याचाच असेल. तू येते आहे ना कन्फर्म करायला फोन केला असेल.
नेहा : लग्न झालं की, सगळी इक्वेशन्स कशी बदलतात नाही? काल-परवापर्यंत एकटे असणारे आपण एका अवचित नात्यानं बांधले जातो काय आणि एकमेकांशिवाय करमेनासं होतं काय. गंमतच आहे नाही सगळी.
सारंग : बाय द वे नेहा, तू काय केलं असतंस ग?
नेहा : अरे, मी कुठे रश्मीसारखी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे? आमच्या घरात अगदी साध्या साध्या गोष्टींबाबतचे निर्णयही सगळे मिळून घेतात. यासारख्या मोठय़ा इश्यूवर तर कमिशनच बसलं असतं.
सारंग : आणि त्यातून जो निर्णय घेतला जातो तोच अमलात आणायचा, बरोबर?
नेहा : हो, त्यावर मग चर्चा नाहीत.
सारंग : पण समजा त्यांनी घेतलेला निर्णय तुला मान्य नसेल तर?
नेहा : तरीही तो मान्य करायचा.
सारंग : हे अवघड आहे.
नेहा : आहेच ना! कित्येक वेळेला मला नाही पटत. मागं संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या बाबतीत असंच झालं होतं. मला नव्हतं ते हळदीकुंकू आणि हलव्याचे दागिने यात इंटरेस्ट; पण सासूबाईंनी कुठे ऐकलं? रश्मी, हा एवढा अवघड निर्णय तू कसा काय ग, तुझ्या सासू-सासऱ्यांना पटवलास? त्यांनी कसं काय मान्य केलं?
रश्मी : अगं, आधी त्यांनाही हे मान्य नव्हतेच..
मीनल : पटण्यासारखा निर्णय नाहीये तुझा! माझ्या सासूबाई तर म्हणत होत्या. तुझ्या मैत्रिणीला सांग नुकतंच लग्न झालंय आणि अमेरिकेसारख्या मोहमयी दुनियेत नवऱ्याला एकटय़ाला पाठवते आहेस. काही करता काही बसायचं आणि मग पस्तावायची वेळ यायची हो..
सारंग : ए गप गं मीनल. काहीही काय बोलते आहेस? जशी काय आम्ही मुलं म्हणजे टपलेलोच असतो.
वंदन : तर काय! हा समस्त तरुण मुलांवर अन्याय आहे. या अन्यायाचा आम्ही निषेध करतो.
नेहा : ए विषयाला उगीच फाटे फोडू नका रे!
सारंग : आम्ही कुठे फाटे फोडतोय? ही मीनलच भलती स्टेटमेंट्स करतेय.. मग आम्ही काय गप्प बसायचं काय?
नेहा : ठीक आहे.. ठीक आहे.. या विषयावर आपण नंतर बोलूया. आधी मला रश्मीकडून टिप्स घेऊ देत सासऱ्यांना कसं पटवायचं.
रश्मी : टिप्स वगैरे काही नाहीत गं. खरं तर त्यांना पटवण्याचं काम मैत्रेयनंच केलं आणि मैत्रेयला मान्य आहे म्हटल्यावर त्यांचाही विरोध आपोआपच मावळला.
नेहा : मैत्रेयने पटवलं ना? आमच्याकडे त्याचेच वांधे आहेत. निरंजन जरासुद्धा त्यांच्या शब्दाबाहेर नसतो. सासऱ्यांना विचारल्याशिवाय त्याचं पानही हलत नाही.
मीनल : मग काय चुकीचं आहे गं त्यात? घरातल्या मोठय़ांना डावलणं सगळ्यांना जमतच असं नाही. आणि मलाही नाही बाईं पटत असे परस्पर निर्णय घेणं, अगं मोठय़ांनी आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. त्यांच्या अनुभवाला काही किंमत असते का नाही?
नेहा : मीनल, तुझा रोख कुणावर आहे, हे कळतंय मला, तू म्हणते तेही पटतंय. मोठय़ांशी बोलावं. सल्लामसलत करावी. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. हे सगळं पटतंय, पण याचा अर्थ त्यांनी त्यांचे निर्णय लादावेत, असाही नाही ना?
सारंग : परफेक्ट! त्यांनी फक्त मार्गदर्शन करावं.
नेहा : पण आमच्याकडे तसं नाही न होतं. सगळ्यांना निर्णय प्रकियेत सामावून घेतलं आणि तो निर्णय स्वीकारला नाही तर ते उगीचच दुखावले जातात. आमचं ऐकायचे नव्हतं तर मग आम्हाला विचारलंच कशाला? असं म्हणतात. लहानपणापासून निरंजन या अशाच वातावरणात वाढला आहे त्यामुळे तो स्वतंत्रपणे निर्णय घ्यायचेच टाळतो. मग मलाही पर्याय नसतो.
रश्मी : ही कोंडी केव्हातरी फोडायला लागेल आणि हे काम तुलाच करावं लागेल.
नेहा : का? तुमच्याकडे मैत्रेयने जशी ही जबाबदारी घेतली तशी निरंजनला का जमू नये?
रश्मी : नेहा, अगं, प्रत्येकाच्या घरातली चौकट वेगळी असते. मी काय किंवा मैत्रेय काय. आमच्या घरांमध्ये निर्णयस्वातंत्र्य पहिल्यापासूनच आहे. तसं निरंजनचं नाही. आई-वडिलांशी एका विशिष्ट पद्धतीनं वागायची सवय त्याच्या अंगवळणी पडली आहे. ही सवय मोडणं त्यालाही एकदम कसं जमेल? म्हणून तुला पुढाकार घ्यायला पाहिजे.
नेहा : आमच्याकडे कितपत हे जमेल मला जरा शंकाच आहे बाई!
रश्मी : असं कशाला म्हणतेस? हळूहळू पायरी पायरीनं पुढं जा. तुझ्या निर्णयक्षमतेबद्दल त्यांना खात्री पटली की तेही मान्य करतील..
shubhadey@gmail.com