Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९

यश व्यापक होईल
पंचमात शनी, दशमांत राहू, लाभांत गुरू आणि सूर्य, बुध अनुकूल असल्याने घेतलेले निर्णय, कृती यामधून शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत यश मिळवता येईल. नवे मार्ग, नवे परिचय, अभिनव उपक्रम याच तंत्राचा उपयोग यश व्यापक करण्यास उपयुक्त ठरणार आहे. शुक्र, मंगळ व्ययस्थानी असेपर्यंत आर्थिक देवघेव, पाहुण्यांची गर्दी यामुळे धावपळ सुरू राहील. अनपेक्षित अधिकार हाती येण्याचा संभव आहे.
दिनांक : १२ ते १६ शुभ काळ.
महिलांना : प्रवास होतील. आप्त भेटतील.

गाडी पुढे सरकत राहील
भाग्यांत राहू, दशमांत गुरू, लाभांत शुक्र, मंगळ तसेच गुरुवारी राशिस्थानी येत असलेल्या सूर्यमुळे कल्पना कृतीत येतील. अभिनव प्रयोग गाजतील, अर्थप्राप्तीचे मार्ग निर्वेध होतील आणि सत्ताकेंद्रातही प्रभाव वाढेल. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत कमी-अधिक वेगाने गाडी अशीच पुढे सरकत राहील. चतुर्थात शनी असल्याने प्रापंचिक समस्यांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. मंगळ-शनी अशुभ योगात वाहन जपून चालवा. आश्वासनं देताना सावध राहा.
दिनांक : १०, ११, १५, १६ शुभ काळ.
महिलांना : संसारात संयम ठेवा. समाजात मान मिळेल. प्रवास कराल.

अडचणींची चिंता नको
पराक्रमी शनी, भाग्यांत गुरू, दशमांत शुक्र यांच्या आधाराने नियमित उपक्रम पूर्ण करता येतील. नवीन कार्यक्रमांची रूपरेखा निश्चित करता येईल. त्यामध्ये बौद्धिक प्रांत, कलाक्षेत्र, व्यापारी देवघेव यांचा समावेश राहील. अष्टमांत राहू व्ययस्थानी, बुध, गुरुवारचे रवी राश्यांतर यातून छोटय़ा मोठय़ा अडचणी येत राहतील. खर्चाचा आढावाही चुकण्याचा संभव आहे, परंतु विचलित होऊ नका. अखेर शुभ चंद्रभ्रमणातून बाजी मारता येईल.
दिनांक : १२ ते १४ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न करा, गोड बोला, कार्यभाग साधता येईल.

प्रकरणे मार्गी लागतील
साडेसाती, अष्टमांत गुरू यांच्यामुळे त्रस्त असलेल्या कर्क व्यक्तींना सप्तमातील राहू, भाग्यातील शुक्र, मंगळ सहकार्य करतील. त्यातून बरीच दडपणे कमी होतील. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत बरीच प्रकरणे मार्गी लावता येतील. श्री मारुतीची उपासना, आराधना, सफलता सोपी करणारी ठरेल. प्रवास होतील, शुभकार्ये ठरतील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक प्रश्न सोडवू शकाल, गुरुवारचा सूर्य राश्यांतर आरोग्यावर रामबाण औषध मिळवून देईल.
दिनांक : १०, ११, १५, १६ शुभ काळ.
महिलांना : सामोपचाराने प्रापंचिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न सुटतील.

प्रवास पूर्ण होईल
साडेसाती, अनिष्ट राहू, अष्टमांत शुक्र-मंगळ अशा ग्रहकाळात ठरवलेल्या वेळेत ठरवलेल्या मार्गाने प्रवास पूर्ण होत नाहीत; परंतु गुरूची कृपा भाग्यदशमातून भ्रमण करणारा सूर्य, अनुकूल बुध यांच्यातून अचानक सहकार्याचे हात पुढे येतील. त्यातून उत्साह निर्माण होतो. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगामुळे अवघड प्रवास अखेर पूर्ण करता येतो. त्यातील निश्चितीसाठी श्री मारुतीची उपासना, आराधना उपयुक्त ठरेल. प्रपंचात संयम ठेवा, खर्चात शिस्त ठेवा.
दिनांक : १२, १३, १४ महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
महिलांना : आप्तांच्या भेटी, नवे परिचय, अभिनव कार्यतंत्र यातून यश निश्चित होईल.

जबाबदाऱ्या पूर्ण होतील
पंचमात राहू, सप्तमात शुक्र, मंगळ, भाग्यात बुध आणि शुक्रवारचं रवी राश्यांतर, याच ग्रहांमुळे कन्या व्यक्तींच्या जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकतील. त्यात शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगामुळे बहुतेक कार्याचा अखेर गोड होईल. भक्तिमार्गातून आनंद व्यापकही करता येईल. सत्ता प्रबळ होईल, प्राप्ती मजबूत करता येईल. शिक्षणातल्या अडचणी दूर करू शकाल. मंगळ- शनी अशुभ योगात वाद टाळा. वाहनाना फार वेग ठेवू नये.
दिनांक : १०, ११, १५, १६ शुभ काळ.
महिलांना : प्रकृती सुधारेल. घरातील मंडळी खूश राहतील. प्रवास कराल.

प्रतिष्ठा सांभाळता येईल
चतुर्थात राहू, षष्ठात शुक्र-मंगळ आणि अष्टमात बुध, शुक्रवारच्या रवी राश्यांतर, संशयातून समस्या आणि समस्यांतून अपयश असे चक्र या ग्रहकाळात सुरू राहणे शक्य असते. मंगळ-शनीच्या अशुभ योगामुळे त्यातील तीव्रता वाढते. परंतु याच काळात ‘शनीसारखा त्राता नाही, गुरूसारखा दाता नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येईल. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगाचा छोटासा आधार प्रतिष्ठा सांभाळेल व मोठे यश देऊन जाईल. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : १० ते १४ प्रतिष्ठा सांभाळता येईल.
महिलांना : संधीतून प्रश्न सुटतील. चिंता दूर होतील.

अनंत हस्ते देणारा काळ
पराक्रमी राहू पंचमात, शुक्र, मंगळ सप्तमात, बुध दशमात, शनी आणि गुरुवारचे रवी राश्यांतर अशाच ग्रहकाळाला अनंत हस्ते देणारा पर्वकाळ म्हणतात. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत अनेक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सफलता मिळत राहील. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार या क्षेत्रातील मंडळींचा त्यात समावेश राहील. वेगवान प्रगतीची गाडी मंगळ-शनीच्या अशुभ योगांनी अडवू नये, यासाठी सतर्क मात्र राहावे. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : ११ ते १५ ‘कराल ती पूर्व’ असा काळ
महिलांना : अपेक्षित यश मिळेल. कर्तृत्व उजळून निघेल असा ग्रहकाळ आहे.

प्रवास आनंद देईल
पराक्रमी गुरू भाग्यात, शनी मकर राशीत, राहू षष्ठात येत असलेला सूर्य, मीन राशीत शुक्र मंगळ अशाच ग्रहकाळात प्रपंच ते परमेश्वर यातील कोणताही प्रवास सार्थकी परिश्रमाचा आनंद देतो. यामध्ये मंगळ- शनी अशुभ योगाने विघ्न आणू नयेत, यासाठी शब्दांत संयम आणि कृतीत सावधानता यांची आवश्यकता राहील. शनिवारचा रवी-हर्षल शुभयोग अनपेक्षित संधीतून, शिक्षण, विज्ञान, अधिकार यामध्ये धनू व्यक्तींना मोठेपणा मिळवून देणार आहे.
दिनांक : १२ ते १६ यशस्वी व्हाल.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश निश्चित मिळेल.

संधीचं सोनं होईल
राशीस्थानी राहू, कुंभ, गुरू, पराक्रमी शुक्र, मंगळ पंचमात, बुध गुरुवारचे सूर्य राश्यांतर हा ग्रहकाळ प्रयत्नातून उपक्रमाचं आणि संधीचं सोनं करणारा आहे. शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत याचा प्रत्यय येईल. अष्टमात शनी तसेच मंगळ-शनीचा अशुभ योग होत आहे. मध्येच वाकडी अवघड वळणे आली तर थांबा, बघा आणि पुढे चला. धोका टळून यश मिळेल. शिक्षण, कला, क्रीडा विभागातील मकर व्यक्ती विशेष चमकतील. शेतीची कामे मार्गी लागतील.
दिनांक : १०, ११, १५, १६ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न कारणी लागतील. श्रेष्ठत्व सिद्ध होईल.

भरीव यश मिळेल
राशीस्थानचा गुरू, मीन, शुक्र, मंगळ सप्तमात शनी याच ग्रहकाळात प्रयत्नांमध्ये उत्साह येतो आणि झटपट निर्णय घेऊन प्रकरणं मार्गी लावता येतात. हाच मंत्र याही वेळी उपयोगात आणून भरीव यश संपादन करता येईल; परंतु बारावा राहू, चतुर्थात येत असलेला सूर्य यांमुळे येणाऱ्या अडचणी हुशारीने दूर करता येतील. नोकरी, व्यवसाय, कला, साहित्य यांमध्ये साहस आणि डावपेच यापेक्षा सरळ मार्गच विशेष लाभ देऊन जातील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल, जागेचा प्रश्न सुटेल.परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : १० ते १४ शुभ काळ.
महिलांना : नवीन क्षेत्रात प्रवेश संभवतो. कला- साहित्य- विज्ञानात चमकाल.

अचूक उत्तरातून यश
राशीस्थानी शुक्र, मंगळ, लाभात राहू, वृषभ, बुध गुरुवारचे सूर्य राश्यांतर व्यावहारिक गणिताची उत्तरं अचूक शोधून केलेल्या कृतीमधून, शनिवारच्या रवी-हर्षल शुभयोगापर्यंत मीन व्यक्तींना बाजी मारीत पुढे सरकत राहता येईल. षष्ठात शनी, व्ययस्थानी गुरू असल्याने आरोग्याची पथ्य सांभाळा. त्यात कोणत्याही प्रकारची निष्काळजी उपयोगाची नाही. व्यापारी करार पैसा देतील, समाजकार्य प्रतिष्ठा देईल, शिक्षणातील अडचणी दूर करता येतील.
दिनांक : १० ते १५ शुभ चंद्रभ्रमणात मोठं सहकार्य मिळेल.
महिलांना : शक्ती, बुद्धीच्या मर्यादा सांभाळून पुढे चला, यश मिळेल.