Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

व्यापार - उद्योग

एकाकी ज्येष्ठांना मिळणार काळजी वाहणाऱ्या सेवेचा हात पुण्यात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सव्र्हिस पार्टमेंट्स
व्यापार प्रतिनिधी:
‘हेल्थकेअर हॉस्पिटॅलिटी’ या नव्या व्यवसायात प्रवेश केलेल्या अॅपल हॉस्पिटॅलिटी सव्र्हिसेसने पुण्यातील ज्येष्ठ/वृद्ध नागरिकांसाठी पुण्यात बाणेर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असिस्टेड लिव्हिंग सव्र्हिस अपार्टमेंट सुरू केले आहे.
हेल्थकेअर हॉस्पिटॅलिटी ही आपल्या देशात तुलनेने नवी कल्पना असली तरी वैद्यकीय पर्यटन, वृद्ध सेवा, शस्त्रक्रिया पूर्व व शस्त्रक्रियेनंतरची काळजी किंवा मुले कामानिमित्त अथवा परदेशी गेली असताना त्यांच्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याची वाढती गरज लक्षात घेता हेल्थकेअर हॉस्पिटॅलिटीला असणारा मोठा वाव लक्षात घेऊन संस्थेने सुविधा सुरू केली आहे.

हसिया इंडियाची विस्तार योजना
व्यापार प्रतिनिधी:
हसिया पॅकेजिंग या पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनीने २०१२ पर्यंत ३० कोटींहून अधिक वार्षिक उलाढालीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विस्तारयोजना हाती घेतली आहे. पॅकेजिंगशी संबंधित मशीनरी सेवेमध्ये नावीन्यपूर्ण सुविधांची सुरुवात करण्यावर कंपनीने भर दिला असून त्याकरता गुंतवणूक केली जाणार आहे. आफ्रिका, पूर्व आणि मध्य पूर्वेतील कंपनीबरोबर भागीदार एजन्सीसमवेत जगभरात सॅटेलाईट कार्यालये सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

व्यापार संक्षिप्त
व्होडाफोनचा ग्रामीण महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ‘गप्पागोष्टी’ प्लॅन

व्यापार प्रतिनिधी:
व्होडाफोन एस्सारने आपल्या ग्रामीण महाराष्ट्र आणि गोव्यातल्या प्री-पेड ग्राहकांसाठी ‘गप्पागोष्टी’ ही खास योजना जाहीर केली आहे. व्होडाफोन गप्पागोष्टी पॅकचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना फक्त ३० पैसे प्रति मिनिट एवढा आकार देऊन आपल्या गावातील मित्रमंडळी, नातलग आणि कुटुंबीय यांच्याशी कायम संपर्कात राहून व्यापारधंद्याच्या आणि इतर गप्पागोष्टी करणे शक्य होणार आहे. व्होडाफोनच्या सध्याच्या ग्राहकांना रु. १०१चे व्हाऊचर वापरून या योजनेत सहभागी होता येईल, तर नव्या ग्राहकांना रु. १०१च्या प्रीपेड कार्डावर गप्पागोष्टी योजनेचे फायदे मिळतील.

अॅनिमेशनवरील ‘सीजीटी एक्स्पो’ मुंबईत
व्यापार प्रतिनिधी:
अॅनिमेशन व्यवसायावरील देशातील सर्वात मोठे प्रदर्शन ‘सीजीटी एक्स्पो-०९’ येत्या २३ व २४ मे रोजी पवईच्या (मुंबई) ‘दी रेसिडेन्स हॉटेल अँड कन्व्हेंशन सेंटर येथे होणार आहे. अॅनिमेशन व्यवसायात आघाडीवर असणाऱ्या सीजीतंत्र कंपनीने फ्रेमबॉक्स अॅनिमेशन आणि डिजिटल एशिया स्कूल ऑफ अॅनिमेशन यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ‘नाईन इंटरॅक्टिव्ह’ प्रदर्शनाची निर्मिती व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडीत आहे. या प्रदर्शनात चर्चासत्र, परिसंवाद, स्क्रिनिंग, मास्टर क्लासेस आदी उपक्रमांचा समावेश आहे. या मध्ये एनव्हीआयडीआयए, एचपी, अॅडॉब, बिग अॅनिमेशन, इंडिया चाऊस ग्रुप व्ही या नामवंत कंपन्यांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मॅट्रिक्स सेल्युलरचे डॉइशे बँकेसह को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड
व्यापार प्रतिनिधी:
डॉईशे बँक आणि भारताची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स देणारी आघाडीची कंपनी मॅट्रिक्स सेल्युलरने डॉईशे बँक मॅट्रिक्स क्रेडिट कार्ड दाखल करत असल्याची घोषणा केली. मॅट्रिक्स ग्राहक आणि नियमित आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन डॉईशे बँक मॅट्रिक्स कार्ड हे प्लॅटिनम प्रकारांमध्ये उपलब्ध असून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या मॅट्रिक्स गिफ्ट व्हाऊचर्ससह ग्राहकांना मिळणार आहे. त्याशिवाय सर्व पॉवर पॅक्ड प्लॅटिनम कार्ड वैशिष्टय़ेही या कार्डाबरोबर ग्राहकांच्या सुविधेच्या दृष्टीने अंतर्भूत आहेत. डॉईशे बँक मॅट्रिक्स प्लॅटिनम क्रेडिट कार्डधारक स्थानिक पातळीवर खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांवर सहा रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक १०० रुपयांच्या खरेदीवर तीन पॉइंट्स दिले जातात. हे सर्व रिवॉर्ड पॉइंट मॅट्रिक्स टॉक टाइमसाठी वापरता येतील. त्याचप्रमाणे डॉईशे बँकेच्या इतर पर्यायांसाठीही हे रिवॉर्ड पॉइंट वापरता येतील. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्डधारकाला वेळोवेळी विशेष मॅट्रिक्स ऑफर्सही मिळणार आहेत.

उत्तम गॅल्वाला १९३ कोटींचा नफा
व्यापार प्रतिनिधी:
उत्तम गॅल्वा स्टील्स लिमिटेड (यूजीएसएल)ने मार्च २००९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत १९३ कोटी रुपयांचा रोख नफा नोंदविला आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने नक्त विक्री ४३७२ कोटी रुपये एवढी नोंदविली असून ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत ३९ टक्के आहे. मार्च २००८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ही विक्री ३१५६ कोटी रुपये एवढी होती. ही माहिती यूजीएसएलचे संचालक (वाणिज्य) अंकित मिगलानी यांनी दिली.

अॅरिस अॅग्रोचे ‘एमसीएक्स’शी सहकार्य
व्यापार प्रतिनिधी:
अॅरिस अॅग्रो लि. (एएएल) या स्पेशलिटी मायक्रोन्यूट्रिएंट कंपनीने मल्टि कमोडिटी एक्स्चेंजशी (एमसीएक्स) सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. या सहकार्य करारानुसार अॅरिस अॅग्रो आपल्या उत्पादनांच्या प्रमोशनासाठी आणि विक्रीसाठी ग्रामीण सुविधा केंद्र (जीएसके) या भारतीय पोस्ट आणि एमसीएक्स यांच्या संयुक्त कंपनीच्या जाळ्याचा वापर करेल. यामुळे कंपनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांतील ७६८ गावांना सेवा देणाऱ्या पोस्टाच्या १६० शाखांशी जोडली जाणार आहे. या सहकार्य करारावर अॅरिस अॅग्रोच्या देवनार येथील मुख्यालयात अॅरिस अॅग्रो लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जिमी मिरचंदानी आणि एमसीएक्स इंडियाच्या ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजच्या उपाध्यक्ष सरिता बहल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

इंटेक्सच्या स्वस्त संगणकाचा बाजारात प्रवेश
व्यापार प्रतिनिधी:
आय.टी. हार्डवेअर मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमधील इंटेक्स टेक्नॉलॉजीज (इंडिया) लि. या कंपनीने स्वस्त संगणक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. कंपनीतर्फे बाजारपेठेमध्ये इंटेक्स सिल्व्हर जीबी ७५५०१ डेस्कटॉप संगणक सादर करण्यात आला आहे. संगणकामध्ये इंटेल अॅटम प्रोसेसर ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली असून संगणकामध्ये असणारे मूळचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. किमतीच्या बाबतीत तडजोड करणाऱ्या ग्राहकांच्या गरजा ओळखून हा संगणक तयार करण्यात आला आहे. ‘अॅटम प्रोसेसर’ हा इंटेलकडून सादर करण्यात आलेला सर्वात लहान प्रोसेसर असून यामध्ये जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर्स बसविण्यात आले आहेत. यामुळे कमीप्रमाणात वीज वापरली जाते. तसेच कॉम्पॅक्ट आणि स्लिक डिझाइनमुळे संगणक कमी जागा व्यापतो. इंटेक्स ‘सिल्व्हर जीबी ७५५०१’ दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असून यामध्ये ९४५ जीसीएलएफ इंटेल चिपसेट, एक जीबी मेमरी, ८०/१६० जी बी हार्ड डिस्क, डीव्हीडी रॉम/ डीव्हीडी रायटर आणि १७ इंची मॉनिटर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याची किंमत अनुक्रमे रु. १२,९०० आणि रु. १३,५०० इतकी आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील घरे,सायबर कॅफे, छोटय़ा आकाराच्या उद्योगधंद्यांमध्ये संगणक वापरासाठी कमी किंमत व संगणकामध्ये असणारे मूळचे तांत्रिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. यामुळे या संगणकाला चांगली मागणी मिळू शकणार आहे. या वेळी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी आणि इंटेक्स पीसी बिझिनेस विभागाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले की, इंटेक्स कंपनीने संपूर्ण देशभरात असणाऱ्या ग्रामीण आणि निमशहरी भागात संगणक वापर वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.