Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

प्रादेशिक

स्लमडॉग फेम’ सलीमची वांद्रयातील झोपडी उद्ध्वस्त
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी
ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटातील बाल कलाकार अझरुद्दीन मोहम्मद इस्माईल याची वांद्रे पूर्वमधील गरीब नगर झोपडपट्टीतील झोपडी बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज उद्ध्वस्त केल्याने त्याचे कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले आहे. अझरुद्दीनने डॅनी बोयल यांच्या स्लमडॉग चित्रपटात सलीमची भूमिका केली होती.

‘भारतश्री’चे पाच पुलअपस् तर महिला उमेदवाराचे दहा पालिका सुरक्षा रक्षकांच्या भरतीत घोळ!
मुंबई, १४ मे/प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या भरतीत ‘भारतश्री’ किताब मिळविलेल्या उमेदवाराने जेमतेम पाच पुलअपस् मारल्या तर एका महिला उमेदवाराने दहा पुलअपस् मारल्या. दोरखंड चढणे या प्रकारात थेट दहा पैकी दहा गुण न देता काही उमेदवारांना पाच पैकी पाच गुण दिल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकांच्या भरतीमधील घोळाचे अनेक पुरावे आता प्रकाशात येऊ लागले आहेत.

‘चुकीची व अपुरी माहिती दिल्याने सरकारवर ताशेरे’
मुंबई, १४ मे/प्रतिनिधी

चर्नी रोड येथील राज्य सरकारच्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातील ‘कॉपी होल्डर’ पदावरील सौ. वेजारे व सौ. सावंत या दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदलीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाखल केलेल्या प्रकरणात मुद्रणालयाच्या व्यवस्थापनातर्फे सरकारी वकिलास अपुरी व चुकीची माहिती दिली गेल्याने न्यायाधिकरणाकडून ताशेरे ओढले जाण्याची नामुश्की सरकारवर ओढवली, असा आरोप शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटने’ने केला आहे.

वाहिन्यांच्या संदर्भछटाईवर मनोहर जोशी नाराज
मुंबई, १४ मे/प्रतिनिधी

आपण जे बोललो त्यामधील मोजकेच दाखवून सनसनाटी निर्माण करण्याच्या काही वृत्तवाहिन्यांच्या कृतीवर शिवसेना खासदार मनोहर जोशी कमालीचे नाराज झाले आहेत. काही वाहिन्यांकडून वरचेवर असा अनुभव येत आहे. परंतु पत्रकारांचे लोकशाहीतील महत्व लक्षात घेता आपण काय बोलणार, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील मतमोजणीसाठी चार हजार अधिकाऱ्यांची नेमणूक
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रांवर चार हजारांहून अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांनी दिली आहे.

कसाब आणि साथीदार मलबार हिल येथे रक्तपातासाठी निघाले होते
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी सीएसटी येथे मृत्यूचे तांडव घातल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि चकमकीत ठार झालेला त्याचा साथीदार अबू इस्माईल यांचे पुढील लक्ष्य हे मलबार हिल होते आणि त्याचसाठी ते चौपाटीमार्गे मलबार हिलच्या दिशेने निघाले होते हे तपासादरम्यान पुढे आलेच आहे.

मतदार याद्यांच्या घोळामुळे मतदान न करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी

मतदार यादीतून गायब नावे, नावनोंदणीची क्लिष्ठ प्रक्रिया, मतदार यादीतील नावाचे नूतनीकरण, आवश्यक ओळखपत्राचा अभाव यासारख्या तांत्रिक कारणामुळे सर्वाधिक ४५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाबण्याकडे पाठ फिरवल्याचा निष्कर्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या स्वयंसेवी संस्थेने एका सर्वेक्षणाआधारे नोंदविला आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांकडून होणाऱ्या भ्रमनिरासामुळे नैराश्याच्या भावनेतून मतदान न करणाऱ्यांची संख्या त्याखालोखाल असून, उन्हाच्या कडाक्यामुळे मतदान न करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य म्हणजे १.०७ टक्के इतकी असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.

डॉ. विनायक सेन यांच्या जिवाला धोका
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी
छत्तीसगड सरकारने दोन वर्षांपूर्वी अटकेत टाकलेल्या डॉ. विनायक सेन यांच्या जिवाला धोका आहे तेव्हा त्यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी आज विविध संघटनांकडून आयोजित सभेत करण्यात आली. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली डॉ. विनायक सेन यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. जगभरातील लोकशाहीवादी जनता डॉ. विनायक सेन यांच्या सुटकेची मागणी करीत आहे. मुंबईत आज दादर येथे मूक मोर्चा काढून नंतर सभा घेण्यात आली.

सीबीआयच्या उपनिरीक्षकाला साक्षीदाराकडून लाच घेताना अटक
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी

सीबीआयच्या आर्थिक गुन्हे विभागातील उपनिरीक्षक दीपक कुमार याला साक्षीदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. घाटकोपर येथील शासकीय वसाहतीतील घरातून कुमार यासा अटक करण्यात आली. पुणे न्यायालयात सुरू असलेल्या बँक घोटाळा प्रकरणाचे तपास अधिकारी असलेल्या कुमार यांनी खटल्यातील साक्षीदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच ही रक्कम न दिल्यास अटकेची धमकी दिली होती.

छोटा शकीलचा गुंड भुल्लरला मुंबईत आणले!
मुंबई, १४ मे / प्रतिनिधी

बँकॉक सरकारकडून हस्तांतरित करण्यात आलेला कुख्यात गुंड छोटा शकीलचा साथीदार गुरूप्रीत सिंग भुल्लरला (३१) मुंबई पोलिसांनी आज मुंबईत आणले. मुंबई पोलिसांच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक गेल्या आठवडय़ात थायलंड येथे भुल्लरला ताब्यात घेण्याकरिता गेले होते. भुल्लर हा शकीलचा नजीकचा साथीदार असून डिसेंबर २००६ मध्ये त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली होती.