Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

शाब्बास!
एमएमआरडीए, पालिका आणि वाहतूक पोलीस

प्रतिनिधी

सरकारी यंत्रणेविषयी लोकांच्या मनात नेहमीच एक असंतोषाची भावना असते. सरकारी काम म्हणजे वेळकाढूपणा आणि पैशाची उधळपट्टी असा एक सार्वत्रिक समज आहेत. अर्थात सरकारी यंत्रणाच त्यास कारणीभूत आहे. मात्र हा समज खोटा ठरविणारी कामगिरी महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महानगरपालिकेने केली आहे. एमएमआरडीएने विक्रमी वेळेत लालबाग येथील पूल पाडण्याची तर पेडर रोडवरील मल:निस्सारण वाहिनी दुरुस्त करण्याचे काम पालिकेने करून दाखविले. हा मुंबईकरांसाठी एक सुखद धक्का आहे.

सिंधू संस्कृतीच्या चिन्हांतील भाषेवर आंतरराष्ट्रीय मोहर!
रेश्मा जठार

सिंधू संस्कृतीच्या लिपीबाबतचे भारतीय अभ्यासकांचे संशोधन ‘सायन्स’ मासिकात प्रसिद्ध २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोलॅप्स ऑफ द इंडस-स्क्रिप्ट थिसिस’ संशोधनाला दणदणीत प्रत्युत्तर जवळजवळ साडेपाच हजार वर्षे सिंधू नदीच्या खोऱ्यात नांदलेल्या संस्कृतीभोवती असलेले गूढरम्य आकर्षण आजही कायम असल्याचे एक कारण म्हणजे, या सिंधू संस्कृतीच्या लिपीचा अर्थ अद्याप आपल्याला लावता आलेला नाही.

क्रांतीचे सूत्र
उत्क्रांतिवाद ही संकल्पना नसून सूत्र आहे क्रांतीचे.. जगाची विचारसरणी बदलून टाकणारे.. पण उत्क्रांतिवाद कधी यशस्वी होईल याबाबत खुद्द डार्विनच साशंक होता.. कारण डार्विनपुढे आव्हान तगडे होते.. त्याला सिद्धांत गळी उतरवायचा होता वैज्ञानिक अन् धर्ममार्ंतडांच्या.. सामान्य जनतेलाही त्या काळी हा सिद्धांत फारसा उमगला नव्हता.. आपला सिद्धांत वादंग निर्माण करील याची डार्विनला कल्पना होती.. पण डार्विन स्वत: मात्र या वादात कधीच पडला नाही.. वैज्ञानिक हरकती घेत.. धर्मगुरू ओरड करीत.. पण हे सारे वाद डार्विनचे खंदे समर्थक परतावून लावत..

गिर्यारोहणाचे व्यापारीकरण
नुकतेच वृत्तपत्रात एक मराठी गिर्यारोहक तरुणी सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्ट सर करणार ही बातमी वाचून आनंद तर झालाच पण बरोबरीने खेद वाटला तो गिर्यारोहणातील व्यापारीकरण बळावत चाललेले पाहून. कारण ज्या एशिया ट्रेकिंग संस्थेमार्फत ही मोहीम आखली जात आहे, ती दरवर्षी अशा प्रकारे व्यापारी तत्वावर किमान दोन मोहिमा एव्हरेस्टवर घेऊन जाते. आता तुम्ही म्हणाल की यात गैर काय आहे? शेवटी कितीही पैसे मोजावे लागले तरी डोंगरावर आरोहण तर त्या गिर्यारोहकाला करावेच लागणार ना?

माइंड इट!
‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर शाहरूखचे सिक्स पॅक अॅब्ज, दीपिकाचे सौंदर्य यांची झालेली चर्चा काही काळाने थंडावली पण ‘पिक्चर अभी बाकी है दोस्त’ आणि ‘यन्ना रास्कला, माइंड इट’ ही दोन वाक्ये अजूनही उच्चारली जातात. ‘ओएसओ’मध्ये शाहरूखने केवळ एका दृश्यापुरती साकारलेली ‘क्विकगन मुरुगन’ ही व्यक्तिरेखा आता तीन तासांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा एक इंग्रजी चित्रपट असून त्यात प्रसिद्ध तेलगु अभिनेता राजेंद्रप्रसाद ‘क्विकगन मुरुगन’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. क्लिन्ट इस्टवूडचा अॅटिटय़ुड आणि दाक्षिणात्या हिरोंचे ग्लॅमर याचे मिश्रण या व्यक्तिरेखेत असेल, अशी चर्चा आहे. ‘स्लमडॉग मिलियॉनर’चे वितरक फॉक्स स्टार स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरूखचा रजनीकांतच्या स्टाईलमध्ये साकारलेला क्विकगन मुरुगन हीट ठरला. आता राजेंद्रप्रसाद कोणाच्या स्टाईलने ही व्यक्तिरेखा साकारतोय ते पाहायचे. एका खासगी वाहिनीतर्फे ही व्यक्तिरेखा तयार करण्यात आली होती. नव्याने होत असलेल्या या चित्रपटात शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांमधील भांडण दाखविण्यात आले आहे. ‘क्विकगन मुरुगन’ या ‘काऊबॉय’ने गायींना वाचविण्याचा विडा उचलला आहे. त्याच गावात एक फास्टफूड रेस्तराँ आहे. या रेस्तराँचा मालक गायीच्या मांसापासून तयार केलेले पदार्थ प्रमोट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दोघांमधील भांडणावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शकाने दिग्दर्शकांने केवळ ‘काऊबॉय’ आणि ‘काऊ’ हे शब्द जुळतात म्हणून कथेत गोमांसपदार्थाचा धागा गुंफला आहे. याचे निमित्त पकडून धर्माध संघटनांनी या चित्रपटाला विरोध करू नये हीच अपेक्षा.
प्रतिनिधी

राधा मंगेशकर यांचा पहिलावहिला अल्बम
चित्रपटांना संगीत देण्याबरोबरच निवडक कविता वेचून त्या संगीतबद्ध करण्याकडे पं. हृदयनाथ मंगेशकरांचा कल राहिला आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि सुधीर मोघे, ना. धो. महानोर, बा. भ. बोरकर यांच्या गीतरचना असलेला ‘नाव माझं शामी’ हा म्युझिक अल्बम लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या अल्मबच्या निमित्ताने राधा मंगेशकर संगीतक्षेत्रात बऱ्याच कालावधीनंतर मंगेशकरांनी संगीत दिलेली गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. येत्या २९ मे रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले (पू. ) येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर प्रस्तुत भावसरगम’ हा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. प्राध्यापक शंकर वैद्य या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अल्बममध्ये भारताच्या विविध भागांतील लोकसंगीताचा बाज एकवटला आहे. गोव्याचे सुंदर वर्णन असलेले गोव्याचे गाणे, सुधीर मोघे यांनी रचलेले ‘नाव माझं शामी’ हे कोळीगीत, ना. धो. महानोर यांचे ‘सुटलेला आंबाडा’ हे शृंगाररसातील भावुक गीत, पंजाबी लोकसंगीताततील ‘हीर’ या गीतप्रकाराची आठवण करून देणारे ‘थकून बसली माय गं’ इत्यादी गाण्यांचा या अल्बममध्ये समावेश आहे.
प्रतिनिधी

बीएसएनएल देणार गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल
प्रतिनिधी

गोवा बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल शुक्रवार १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता जाहीर केला जाणार असून बीएसएनएलच्या लॅण्डलाइन आणि मोबाईल दूरसंपर्क सेवांवरही तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर बीएसएनएल मोबाईलवरून १२५५५६० किंवा १२५५५ हे नंबर डायल करून विद्यार्थ्यांना त्यांचा नंबर सांगून निकाल जाणून घेता येणार आहे. त्यासाठी प्रति मिनिट ५ रूपये दर आकारला जाणार आहे. लॅण्ड लाइनवरून दर २० सेकंदानंतर एक युनिट मोजले जाईल. निकालाआधी बीएसएनएलकडे एसएमएस सुविधेद्वारे विद्यार्थी आपला रोलनंबर नोंदवू शकणार आहेत. त्यासाठी जीबी१२ नंतर आपला रोलनंबर टाईप करून ५६५०५ ला पाठवून द्यायचे आहे. या सुविधेसाठीही प्रति एसएमएस ५ रूपये दर आकारला जाणार आहे. निकालानंतर रोल नंबर नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे त्यांचे गुण क़ळविले जाणार आहेत.

अध्यात्मिक व्याख्यानांचे आयोजन
प्रतिनिधी

अध्यात्म संशोधन मंदिरतर्फे १६ आणि १७ मे रोजी डॉ. प. वि. वर्तक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता ‘ऋषि परंपरा व संत परंपरा’ या विषयावर तर रविवारी सकाळी १० वाजता ‘कुंडलिनी शक्ती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ही व्याख्याने प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर येथे होणार आहेत. शनिवारी डॉ. वर्तक यांच्या आत्मचरित्रात्मक ‘ब्रह्मर्षिची स्मरणयात्रा’ आणि महाभारतावरील प्रबंधपर ‘स्वयंभू’ या दोन पुस्तकांच्या सुधारित आवृत्तींचे प्रकाशन मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.