Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

तोल-समतोल
गेल्या पंधरवडय़ात समतोल फौंडेशनच्या मनपरिवर्तन शिबीराच्या समारोपाला जाण्याचा योग आला.. हा समारोपाचा कार्यक्रम होता डोंबिवलीतील कानविंदे व्यायाम मंदिराच्या सभागृहात, पण समतोलचं शिबीर प्रत्यक्षात झालं होतं ते कल्याणपासून १५-१६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मामणोली गावातील हिंदू सेवा संघाच्या जागेत.. शिबीर होतं ते घरातून पळून आलेल्या किंवा आणल्या गेलेल्या मुलांचं.. ही सारी मुलं सीएसटी, दादर, कल्याण वा ठाणे या अवाढव्य रेल्वे स्टेशनांवर राहणारी.. तिथल्या बिनचेहऱ्याच्या गर्दीत बिनबोभाट सामावून गेलेली.. वय र्वष ८ ते १२ मधली ही मुलं.. कोण कुठल्या गावचा, कोण कोणत्या धर्माचा, कोण काय शिकलेला, कोण कशासाठी घरदार वा आईबापांना सोडून आलेला हे सारं गूढच.. मुंबईच्या उपनगरी रेल्वेनं प्रवास करणारे आपण सारे.. ही मुलं कधी भीक मागण्याच्या निमित्तानं, कधी काही खायला हवं असण्याच्या निमित्तानं, कधी गाणं गाऊन रेल्वे प्रवासात आपलं मनोरंजन करण्याच्या निमित्तानं आपल्याला सामोरी आलेली..

मर्दानी काबूलवाली!
पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी शरियत लागू केला तेव्हाच अमेरिकेने त्याची गंभीर दखल घेतली आणि तेथील शीख समाजावर जिझिया कर लादला गेला त्यानंतर मात्र योगायोगाने का होईना, पण तालिबान्यांना नेस्तनाबूत करण्याची निर्णायक कारवाई सुरू झाली. पाकिस्तानातील हिंदू समाजाबद्दल अधेमधे का होईना बोलले जाते, लिहिले जाते. पण त्यालगतच्या अफगाणिस्तानातील हिंदू व शीख समाजाची फारशी दखल घेतली जात नाही. अफगाणिस्तानातही हिंदू आणि शीख समाज नांदतो आहे, काबूलमध्ये आशामाईचे मंदिर आणि त्यात तेवणारी अखंड ज्योत, भैरवनाथ मंदिर, मंगलवार मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत, स्तूप आहेत, गुरुद्वारा आहेत, तेथे सण साजरे होतात इतकेच नव्हे तर जिर्गा या स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रशासकीय सभेतही दोन जागा हिंदूंसाठी राखीव असतात; या गोष्टींची फारशी चर्चा कधी होत नाही.

निसर्गाच्या दैवतांचे तळतळाट नकोत!
साऱ्या जगभर दहशतवादानंतर पाणी आणि पर्यावरणावरच सर्वाधिक चर्चा होत आहे. दहशतवादासारखेच पर्यावरणाच्या असंतुलनाचेही संकटही मानवी जीवनाला विळखा घालून बसले आहे. दहशतवादाचा धोका देशांतर्गतही उभा होताना दिसत असतानाच शेजारी राष्ट्रांकडूनही तो आपल्यावर लादला जात आहे पण, पाणी आणि पर्यावरणाच्या असंतुलनाचे संकट मात्र ‘आ बैल मुझे मार या’ पद्धतीने आपणच ओढवून घेतले आहे, हे मनोमन मान्य करणार नाही तोवर संकटाच्या विळख्यातून आपली सुटका होणार नाही. नॉर्वेची राजधानी कोपनहॅगन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय जी-२० या शिखर परिषदेतही अमेरिका-भारतासह अनेक देशांनी पृथ्वीच्या जल-वायू स्थितीचा आढावा घेतला आणि ग्लोबल वार्मिगची गती कुंठीत करण्याच्या उपायांची सूची तयार करण्यात आली.