Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

िडभे उजव्या कालव्याच्या रखडलेल्या कामांसाठी १३. ४१ कोटी
मंचर, १४ मे / वार्ताहर

कुकडी प्रकल्पांतर्गत िडभे उजव्या कालव्याच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील उर्वरित पाणी वितरण व्यवस्थेच्या रखडलेल्या कामांना सुमारे १३ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आल्याने शेतक ऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने प्रलंबित कामांना भरघोस निधी

 

उपलब्ध होणार आहे.
कुकडी प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले, की कुकडी प्रकल्पांतर्गत िडभे उजवा कालव्याच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील उर्वरित वितरण व्यवस्थेची रखडलेली कामे मार्गी लागली असून, त्या कामासाठी १३ कोटी ४१ लाख रुपये निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नाने आंबेगाव, शिरूर तालुक्यातील सुमारे ६९१ हेक्टर क्षेत्रासाठी रुपये ६ कोटी ४७ लाख रपये खर्चाची वितरण व्यवस्थेची कामे मंजूर करण्यात आली असून, त्याच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, ८६९ हेक्टर क्षेत्रातील ६ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या कामाबाबत तांत्रिक मंजुरी व निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.
सदर कामे पूर्ण झाल्यानंतर मंचर, अवसरी, कवठे, गावडेवाडी, पारगाव, जारकरवाडी या गावांतील व परिसराला पाण्याचा लाभ मिळू शकेल.
सदर कामे पूर्ण झाल्यानंतर िडभे उजव्या कालव्याच्या किलोमीटर १०२ पर्यंत (पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग)पर्यंतची मुख्य कालव्याची वितरण व्यवस्थेसह कामे पूर्ण होऊन संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येईल.