Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

क्रीडा

बंगलोरची झेप; चेन्नईवर दोन विकेट्सनी मात
दरबान, १४ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शेवटून तिसऱ्या स्थानावर असलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीतील विजयामुळे आधार मिळाला आणि एकूण १२ गुणांसह या संघाने चौथ्या स्थानावर झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्जला १२९ धावांवर रोखण्याची करामत करून बंगलोरने विजयाचा पाया मजबूत केला होता. पण नंतर ही धावसंख्या गाठताना त्यांची दमछाक झाली तरीही अखेर दोन विकेट्स राखून त्यांनी ही लढत जिंकली.चेन्नईने केलेल्या १२९ धावांना प्रत्युत्तर देताना बंगलोरच्या रॉस टेलरची ४६ धावांची खेळी व विराट कोहलीच्या ३८ धावांमुळे बंगलोरचा संघ विजयाच्या अगदी समीप आला होता. पण नंतरच्या काळात कोहली, बाऊचर, वॉन डर मव्‍‌र्ह, अखिल हे फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्यावर बंगलोरचा संघ संकटात सापडला आणि सामना पुन्हा चेन्नईच्या बाजूने झुकला.

यॉर्कर, ‘स्लोअर वन’ने दिला हात - रजत भाटिया
दुबई, १४ मे/ वृत्तसंस्था

हुकमी यॉर्कर आणि ‘स्लोअर वन’ चेंडू टाकण्याच्या हातोटीमुळेच डेक्कन चार्जर्स विरुद्धच्या सामन्यात मी यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मध्यमगती गोलंदाज रजत भाटिया याने व्यक्त केली आहे. हुकमी यॉर्कर आणि ‘स्लोअर वन’ चेंडू टाकण्याच्या हातोटीमुळेच डेक्कन चार्जर्स विरुद्धच्या सामन्यात मी यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मध्यमगती गोलंदाज रजत भाटिया याने व्यक्त केली आहे.

अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड खेळविणार दोन स्पिनर - वॉर्न
लंडन, १४ मे / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड संघात दोन फिरकी गोलंदाज खेळविले जाण्याची शक्यता आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा निवृत्त फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. अ‍ॅशेस मालिका इंग्लंडमध्ये जुलैमध्ये होणार आहे. २००५ साली इंग्लंडमध्ये झालेली अ‍ॅशेस मालिका इंग्लंडने जिंकली होती.

‘आयसीसी ’ शी चर्चा करण्यास तयार - बट्ट
कराची, १४ मे/ वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे सहयजमनापद काढून घेण्याच्या निर्णयाबाबत आम्ही ‘आयसीसी’ ला नोटीस बजाविली असली, तरी चर्चा करण्यास अजूनही तयार आहोत, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.या प्रकरणी कायदेशीर लढाई हा आमच्यापुढील शेवटचा पर्याय आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी सांगितले.

पंजाबला विजय हवाच! दिल्ली डेअरडेव्हिल्सशी झुंज
ब्लूमफाँटेन, १४ मे / पीटीआय
डेक्कन चार्जर्सविरुद्ध १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सची उद्या पंजाब किंग्ज इलेव्हनशी गाठ पडत असून आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा निश्चय दिल्लीने केला आहे.

आयसीएलमधील माजी भारतीय क्रिकेटपटू बीसीसीआयकडे
मुंबई, १४ मे / क्री. प्र.

आयसीएल या बंडखोर क्रिकेट साखळीत सामील झालेल्या खेळाडू, संघटक, पंच, पदाधिकारी व माजी क्रिकेटपटूंसाठी परतीचे द्वार खुले केल्यानंतर भारतीय बोर्डाच्या त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कपिल देव आणि किरण मोरे वगळता भारताच्या साऱ्या माजी कसोटीपटूंचे आयपीएलकडे आपल्याला मुक्त करण्याची विनंती केली आहे.

आयटीएफ टेनिस : इशा लखानी अग्रमानांकित
मुंबई, १४ मे / क्री. प्र.

शिवाजी पार्क जिमखाना येथे १८ मेपासून सुरू होणाऱ्या १० हजार अमेरिकन डॉलरच्या मदर्स रेसिपी आयटीएफ महिला फ्युचर्स टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व इशा लखानी करणार आहे. या स्पर्धेत ती प्रथम मानांकितही आहे.

ननावला सुवर्ण; भारताची चार पदकांची कमाई
बुद्धिबळ
नवी दिल्ली, १४ मे / पीटीआय

अलमॅटी, कझाकस्तान येथील प्रशिक्षण तसेच स्पर्धेच्या रूपात खेळविण्यात आलेल्या बॉक्सिंगमध्ये भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करीत एक सुवर्ण व एक रौप्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली. विश्व युवा बॉक्सिंगमध्ये अजिंक्यपद पटकाविणाऱ्या ननाव सिंगने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली तर छोटे लाल यादवने ५७ किलो गटात रौप्यपदक मिळविले.

मध्य रेल्वे, पिल्ले अकादमी उपांत्यपूर्व फेरीत दाखल
हॉकी
पुणे, १४ मे/ क्री. प्र.

मध्य रेल्वे, पिल्ले अकादमी यांनी राजेश पिल्ले अकादमी आयोजित निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. पिंपरी-चिंचवड महापालिका पॉलीग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मध्य रेल्वे संघाने नागपूर स्पोर्ट्स अकादमीचा ५-० असा दणदणीत पराभव केला.

वेंगसरकर संघाचा गोव्यावर निर्णायक विजय
गावसकर संघाला एकमात्र धावेची आघाडी

टोटल कप क्रिकेट
मुंबई, १४ मे / क्री. प्र.

वेंगसरकर संघाने जय बिश्त (दोन्ही डावांत अर्धशतके) सर्फराज खान (७८) व जुगल रांभिया (१६/६) यांच्या चमकदार कामगिरीमुळे गोव्यावर ७५ धावांनी निर्णायक विजय मिळवत टोटल कप (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत चार गुणांची कमाई केली.

नोटिशीनंतरही आयसीसीशी चर्चेची पाकिस्तानची तयारी
बॉक्सिंग
कराची, १४ मे/ वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे सहयजमनापद काढून घेण्याच्या निर्णयाबाबत आम्ही ‘आयसीसी’ ला नोटीस बजाविली असली, तरी चर्चा करण्यास अजूनही तयार आहोत, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.या प्रकरणी कायदेशीर लढाई हा आमच्यापुढील शेवटचा पर्याय आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आपल्या निर्णयाचा नक्कीच पुनर्विचार करेल.

परिपूर्ण तंत्रज्ञानाशिवाय रेफरल पद्धती नको - वेंगसरकर
मुंबई, १४ मे / क्री. प्र.

पूर्णपणे विश्वासार्ह तंत्रज्ञान विकसित होत नाही तोपर्यंत आयसीसीने पंचांच्या निर्णयावरील रेफरल पद्धतीचा अवलंब करू नये, असा इशारा भारताचे माजी कर्णधार वेंगसरकर यांनी दिला आहे. सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यावर अचूक निर्णयांसाठी पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही हे भारत-श्रीलंका मालिकेत या पद्धतीचा वापर करण्यात आला त्या वेळी स्पष्ट झाले होते.

अ‍ॅंडी मरेची टॉमी रॉब्रेडोवर मात
माद्रिद, १४ मे/ पीटीआय

गतविजेत्या अ‍ॅंडी मरे याने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत टॉमी रॉब्रेडोवर मात करीत विजयी वाटचाल कायम राखली. त्याने रॉब्रेडोवर ७-५, ६-१ असा विजय मिळविला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीस आक्रमक खेळ केला. मात्र ११ व्या गेममध्ये मरे याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला तसेच त्याने व्हॉलीजचाही कल्पकतेने उपयोग केला. या गेममध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवित मरे याने ६-५ अशी आघाडी मिळविली. पाठोपाठ स्वत:ची सव्‍‌र्हिस राखून त्याने पहिला सेट घेतला. आत्मविश्वास उंचावलेल्या मरे याने दुसऱ्या सेटमध्ये परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला व दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. हा सेट सहज घेत त्याने सामनाही जिंकला. महिला गटात युक्रेनच्या अ‍ॅलोना बोन्दारेन्को हिने विजयी वाटचाल कायम राखली. तिने अ‍ॅना चेकवेतेझ (रशिया) हिचे आव्हान संपुष्टात आणले. तिने हा सामना ६-०, २-६, ६-३ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये तिने तीन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला आणि अ‍ॅनास फारशी संधी दिली नाही.

मँचेस्टर युनायटेडची विजेतेपदाकडे आगेकूच
विगान (इंग्लंड), १४ मे/पीटीआय

मँचेस्टर युनायटेड संघाने प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाकडे आगेकूच केली. त्यांना जेतेपदासाठी आता फक्त एका गुणाची आवश्यकता आहे. आज त्यांनी विगान संघाला २-१ असे हरविले. चुरशीने झालेल्या या लढतीत मध्यंतराला विगान संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा हा गोल हय़ूगो रोडालेगो याने नोंदविला होता. मात्र उत्तरार्धात मँचेस्टर युनायटेड संघाने आक्रमक खेळ करीत विजयश्री खेचून आणली. मध्यंतरानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या कालरेस तेवेझ व मायकेल कॅरिक यांनी गोल करीत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. या स्पर्धेत १८व्या अजिंक्यपदासाठी मँचेस्टर युनायटेडला आता फक्त एक गुण पाहिजे. त्यांचे आता अर्सेनेलबरोबर दोन सामने व्हायचे आहेत. पहिला सामना शनिवारी ओल्ड ट्रॅफर्डशी होणार आहे, तर दुसरा सामना २४ मे रोजी होईल.

बोथा राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध
दरबान, १४ मे / पीटीआय

ऑफ स्पिनर जोहान बोथाला संशयास्पद शैलीच्या आरोपातून मुक्य करण्यात आल्यानंतर आता त्याला इंडियन प्रीमियर लीगचा गतविजेता राजस्थान रॉयल्स संघाने करारबद्ध केले आहे. बोथाची राजस्थान रॉयल्ससह करारासाठी बोलणी सुरू होती, पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेदरम्यान त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला. मात्र आता आयसीसीने त्याला दोषमुक्त केल्यामुळे राजस्थान रॉयल्समध्ये प्रवेश करण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शॉन टेटऐवजी तो या संघात प्रवेश करीत आहे. बोथाला आयसीसीने नुकतीच ‘क्लिन चीट’ दिली असली तरी त्याला आता ‘दूसरा’ टाकता येणार नाही.

बास्केटबॉल : छत्तीसगडचे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत
मुंबई, १४ मे / क्री. प्र.

राष्ट्रीय युवा बास्केटबॉल (१६ वर्षांखालील) स्पर्धेत छत्तीसगडच्या दोन्ही संघांनी उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. गतविजेत्या उत्तर प्रदेशला छत्तीसगडच्या मुलांनी ६२-३० असे सहज पराभूत केले व उपान्त्य फेरीत धडक मारली तर गतविजेत्या छत्तीसगडच्या मुलींनी उत्तर प्रदेशलाच ७३-६२ असे पराभूत केले. मध्य प्रदेशचा मुलांचा संघ तसेच केरळच्या मुलीही उपान्त्य फेरीत पोहोचल्या आहेत.