Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नगर अर्बन बँकेच्या कोपरगाव शाखेचे उद्घाटन
कोपरगाव, १५ मे/वार्ताहर

नगर अर्बन बँकेच्या येथील शाखेचे आज उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी या शाखेत सव्वा कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याची माहिती संचालक डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

 

या वेळी श्रीसत्यनारायण महापूजा करण्यात आली. संचालक डॉ. पिपाडा, माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा, उपाध्यक्ष सुरेश बाफना या वेळी उपस्थित होते. बँकेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, संजीवनी महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, समताचे अध्यक्ष काका कोयटे, भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गिरमे, विधिज्ञ जयंत जोशी, दीपक माळी, डॉ. अजेय गर्जे, विजय आढाव, बबलू वाणी यांच्यासह विविध संस्था, बँका, पतसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत शाखाधिकारी शिरीष जोशी यांनी केले. आभार एस. पी. कुलकर्णी यांनी मानले.
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव गिरमे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी नगर अर्बन बँकेची शाखा सुरू झाल्याने शहरातील आर्थिक व्यवहारात भरच पडणार आहे.