Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा’;महाराष्ट्र पुरोगामी प्राथ. शिक्षक समितीची मागणी
बोगस विमा पॉलिसी प्रकरण
नगर, १५ मे/प्रतिनिधी

बोगस विमा पॉलिसी प्रकरणात प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची फसवणूक झाल्याने

 

संचालक मंडळ व बजाज अलाईन्स कंपनीचे नितीन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे केली.
विम्यापोटी सभासदांकडून घेतलेली रक्कम संचालकांकडून वसूल करावी, अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, कार्याध्यक्ष विष्णू बांगर व राज्य उपाध्यक्ष कल्याण राऊत यांनी केली.
पुण्याच्या नितीन पाटील यांना बँकेत बसून विम्याचे दुकान उघडण्यास कोणी परवानगी दिली, याचीही चौकशी करावी. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनीच सभासदांची बाजू घेऊन नितीन पाटील व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती. परंतु संचालक लाचार असल्याने व नेते दलाली घेऊन गप्प बसल्याने ते सभासदांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमावा, असे निवेदनात म्हटले आहे.
या सभासदांची फसवणूक झाली, त्यांनी आपापल्या तालुक्यात गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन समितीने केले.