Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

डूम्स डे
एक इशारा पुन: पुन्हा

नील मार्शल लिखित-दिग्दर्शित ‘डूम्स डे’ या चित्रपटाचं हे नावच चित्रपटाचं सगळं अंतरंग उघडं करून ठेवतं. त्याला कारणही ‘आय अ‍ॅम अ लीजंड’, ‘ब्लाइंडनेस’ आणि त्या आधीही याच प्रकारच्या कथासूत्रावर आधारलेल्या चित्रपटांचं पेव हे होय. गंमत अशी की विल स्मिथची भूमिका असलेला फ्रान्सिस लॉरेन्स दिग्दर्शित ‘आय अ‍ॅम अ लीजंड’ १९५४ सालच्या रिचर्ड मॅथेसन या लेखकाच्या विज्ञानकथेवर आधारित आहे, तर ‘ब्लाइंडनेस’ हा जोस सारामागो या कादंबरीकाराच्या पोर्तुगीज कादंबरीवर आधारित आहे आणि फर्नाडो मेरिल्स यानं तो दिग्दर्शित केला आहे. म्हणजे या चित्रपटांचे मूळ स्रोत वेगवेगळे! तरीही कथासूत्र अगदी सारखं! नव्हे तेच!

‘जोडी जमली रे’मध्ये आज सीमा-रमेश देव
चार-पाच दशकांपासून रूपेरी पडद्यावर अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर ‘सर्जा’ ‘वासुदेव बळवंत फडके’ सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती करणारे अभिनेता-अभिनेत्री दाम्पत्य रमेश आणि सीमा देव शनिवारच्या ‘जोडी जमली रे’ रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत.

लहान मुलांच्या भावविश्वात डोकावताना..!
लहान मुले हा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय असतो. त्यांचा निरागसपणा आणि जगातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना वाटणारे कुतूहल ही खरे तर त्या आकर्षणामागची प्रमुख कारणे असतात. मात्र अनेक कलावंतांना त्याही पलीकडे खुणावणारे लहान मुलांचे भावविश्व सर्वाधिक भावते. कारण अणू पासून ते ब्रह्मांडापर्यंतची धाव क्षणात घेण्याची एक तुफान क्षमता त्या भावविश्वात असते. तेच ते भावविश्व कधी प्रचंड कणखर असते तर कधी ते पराकोटीचे हळवेही असते.. एकवेळ मोठय़ा माणसाच्या मनाचा थांग लागेल पण लहान मुलांच्या भावविश्वाचा थांग अनेक तज्ज्ञांनाही लावता आलेला नाही. मानसोपचार तज्ज्ञही हेच सांगतात की, लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणे तसे तुलनेने कठीण असते. मुळात लहान मुले झापडबंद विचार करत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या कल्पनांचा आविष्कार मुक्त स्वरूपातील असतो.. याच मुक्त आणि काहीशा अंदाज नेमका बांधता न येणाऱ्या लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध घेण्याचा एक वेगळा प्रयत्न पुण्यातील तरुण चित्रकार विजय वाडेकर यांनी केला आहे. वाडेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या जहांगीरच्या वरच्या मजल्यावरील हिरजी जहांगीर कलादालनात सुरू आहे.

चित्रकार बनू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कॅम्लिन’चा प्रशिक्षण वर्ग
चित्रकार बनू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कॅम्लिन’ व जोशीज् कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट यांनी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. ‘हॉबी आर्ट ट्रेनिंग कोर्स लेव्हल - १’ या नावाने हा प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. शाळांमधील चित्रकला शिक्षकांनाही या प्रशिक्षण वर्गात सहभागी होता येईल. या वर्गामध्ये विविध रंगसंगती, काच, लाकूड इत्यादी वस्तूंवर करावयाचे चित्रकाम, कपडय़ांवरचे रंगकाम इत्यादी प्रकारचे कौशल्य शिकविले जाणार आहे. त्या आधारे प्रशिक्षणार्थीना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल. या वर्गात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जोशीज् कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिीटय़ूटच्या कोणत्याही शाखेत आपले नाव नोंदवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक २८३६६०११, २८३६०३०२ (विस्तारीत क्रमांक - २१७/२१९) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी