Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

शाळांच्या शुल्कवाढीवरील बंदी राज्यभर लागू
खास प्रतिनिधी

कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, त्याचप्रमाणे सीबीएसई-आयसीएसई, आयबी यांच्यासारख्या इतर मंडळांच्या शाळांमधील शुल्कवाढीवर तातडीने बंदी घालण्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या माध्यमातून या आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना राज्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये भरमसाट शुल्कवाढ केली जात असल्याबद्दल पालकवर्गाकडून ओरड केली जात होती.

वडाळावासीयांचा पादचारी पूल कागदावरच!
दीड दशकाची प्रतिक्षा
प्रतिनिधी

मुंबईतील वाहतुकीचा खोळंबा दूर करण्यासाठी सध्या ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि स्कायवॉक उभारण्यात येत असले तरी नागरिकांच्या गरजांशी त्यांचा काही ताळमेळ असेलच असे नाही. काही ठिकाणी गरज नसताना उभारण्यात येणाऱ्या या पुलांना स्थानिक नागरिकांनाकडून विरोध होत आहे, तर दुसरीकडे वर्षांनुवर्षे मागणी करूनही पूलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अ‍ॅन्टॉप हिल वडाळा (पूर्व), मुंबई पोर्ट ट्रस्ट गेट क्र. ५ जवळ पादचारी उभारण्याच्या मागणीकडे गेली १५ वर्षे कानाडोळा केला जात आहे. केवळ आश्वासने देण्यापलिकडे संबंधित राजकीय नेते आणि अधिकारी काहीच करीत नसल्याने या परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत.

लोकलप्रमाणेच असावे मेट्रोच्या प्रवासीभाडय़ाचे दर
नागरिकांची सूचना
प्रतिनिधी

चारकोप येथील मेट्रो रेल्वेचे प्रस्तावित कारशेड अन्यत्र हलवावे, वांद्रे-अंधेरीदरम्यान मेट्रो भुयारी मार्गाने न्यावी, प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, मेट्रोच्या प्रवासीभाडय़ाचे दर उपनगरी लोकलप्रमाणेच असावे व मासिक-त्रमासिक पासाची सुविधा असावी.. एमएमआरडीएने मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या मार्गाबाबत सूचना व हरकती नोंदवून घेण्यासाठी आयोजित केलेल्या सुनावणीप्रसंगी नागरिकांकडून अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

‘आयफा’त खान पॉवरची अब्सेंटी
प्रतिनिधी

हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमधील मुख्य आकर्षण असते त्यातील स्टार परफॉरमन्सेस. चीनमधील मकाऊ शहरात ११ ते १३ जूनदरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्ड्स (आयफा) पुरस्कार सोहळ्यात शाहरूख आणि सलमान यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे भासत असले तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. मकाऊ शहरात अलिकडेच अमिताभने या पुरस्कार सोहळ्याचे जंगी प्रमोशन केले. शाहरूखने आयफा सोहळ्यात सहभागी व्हावे यासाठी अमिताभने त्यावेळी जाहीर निमंत्रण दिले होते पण या सोहळ्यात सहभागी होण्याची त्याची इच्छा नाही, अशी चर्चा आहे.

कृतार्थ जीवन
डार्विनने आपल्या आयुष्याचा अखेरचा काळ ‘डाऊन हाऊस’मध्ये आपले कार्य अन कुटुंब यांसमवेत मजेत घालविला. डार्विनचा दिनक्रम अत्यंत साचेबद्ध होता.. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डार्विन दिवसातले फक्त काही तासच काम करीत असे.. इतर वेळी तो वाचन, पत्रव्यवहार करी व आपली पत्नी एम्माबरोबर सोंगटय़ा खेळत असे.. पहाटे लवकर उठून बागेत फिरून येई व न्याहारीनंतर सरळ त्याच्या अभ्यासिकेत जात असे.. डार्विनला एकांतात काम करणे आवडे.. येणाऱ्या- जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डार्विनने अभ्यासासाठी ही वेळ अतिशय उत्तम होती. मग तासभर असे विश्रांतीचा.. नंतर पुन्हा दुपापर्यंत काम..

निविदेच्या घोळात अद्याप पाठय़पुस्तकांचा पत्ता नाही
प्रतिनिधी

शाळांचे निकाल जाहीर झाले की, नवीन पाठय़पुस्तके घेण्यासाठी पालक व मुलांची धावपळ सुरू होते. यंदा अर्धा मे महिना संपत आला तरी, शालेय पुस्तके बाजारात न आल्याने पालक हैराण झाले आहेत. पाठय़पुस्तक महामंडळाकडून देण्यात येणारी पुस्तके तयार असून, ही पुस्तके मुख्य वितरकाकडून छोटे वितरक घेत असतात. मात्र मुख्य वितरकासाठी निविदा काढण्याचा हट्ट शिक्षण खात्याने धरल्याने दुकानदारांकडे पुस्तके पोहचू शकलेली नाहीत.

घोडेबाजार
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने नवा ठराव (६३९७) मंजूर करून घेण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीची वाट न पाहता तातडीने या ठरावाची अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले आहे. रखडलेला म्हाडाचा पुनर्विकास लवकर व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर म्हाडा प्राधिकरणाने दाखविलेला उत्साह (की चालूगिरी) वाखणण्यासारखा आहे. परंतु हा उत्साह का दाखविण्यात आला याचा जेव्हा खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा काही मुठभर विकासकांच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव एका खासगी वास्तुरचनाकाराच्या गोरेगाव येथील कार्यालयात तयार करून तो जसाच्या तसा अंमलात आणण्यात आला ही गांभीर्याची बाब आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

बहुरंगी आणि सर्जनशील
‘‘ए क्रिएटिव्ह मॅन इज मोटिव्हेटेड बाय द डिझायर टु अचिव्ह; नॉट बाय द डिझायर टु बीट अदर्स:’’ आयन रॅण्ड या लेखिकेने सर्जनशील माणसाचे वर्णन करताना हे वैशिष्टय़ सांगितले आहे. जो खऱ्या अर्थाने सर्जनशील असतो त्याच्या कामामागची प्रेरणा कोणती असते? तर काही ना काही उच्च ध्येय गाठण्याची. आपल्या स्पर्धकाला पिछाडीला टाकण्यात धन्यता मानणे इतकी संकुचित प्रेरणा त्याच्या ठायी नसते. ज्येष्ठ सतारवादक, रचनाकार आणि गायक शंकर अभ्यंकर यांच्या प्रदीर्घ संगीत यात्रेचे सारसर्वस्व याच पंक्तींमधून चपखलपणे व्यक्त होते असे म्हटले तर ते सर्वार्थाने उचित ठरेल. अभ्यंकर १९मे रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल.

निष्ठावंत स्वातंत्र्यसैनिक
अण्णा वायकुळ

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णा वायकुळ एक कृतार्थ जीवन जगले. १८ मे २००९ हा त्यांचा पहिला मासिक स्मृतिदिन. यानिमित्ताने एका निकटवर्तीयने त्यांना शब्दातून वाहिलेली आदरांजली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पु. ल. तथा अण्णा वायकुळ यांचे एक महिन्यापूर्वी (१८ एप्रिल ०९) वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. अण्णा वायकुळांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळीत तन-मन-धनाने झोकून दिलेला आणि समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केलेला एक निष्ठावंत, सदाचारी, परोपकारी कार्यकर्ता पडद्याआड गेला.

मंगळवारच्या म्हाडा लॉटरीबाबत उत्सुकता शिगेला!
प्रतिनिधी

साऱ्या देशाचे लक्ष शनिवारी लागणाऱ्या निवडणूक निकालांकडे लागलेले असले तरी मध्यमवर्गीय मुंबईकरांना त्यापेक्षाही जास्त उत्सुकता पुढील आठवडय़ात मंगळवारी लागणाऱ्या एका निकालाबद्दल वाटत आहे. कारण निवडणूक निकालापाठोपाठ आचारसंहिता संपताच १९ मे रोजी लाखो मुंबईकरांनी घराच्या स्वप्नासाठी ‘म्हाडा’कडे केलेल्या अर्जातून काही हजार भाग्यवानांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे.