Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता
‘डीएमआरसी’चे सर्वेक्षण
पुणे, १५ मे / प्रतिनिधी

 

पंधराव्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या मतपेटीतून उद्या (शनिवारी) अनेक मातब्बरांचे भवितव्य ठरणार असल्याने राजकीय पक्षांच्या सत्तास्थापनेचे चित्रही स्पष्ट होणार असले तरी त्यापूर्वी करण्यात आलेल्या निरीक्षणातून केवळ काँग्रेसला सर्वाधिक १७८ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) २२३ जागा मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
डोबा मार्केटिंग रुरल कम्युनिकेशनच्या (डीएमआरसी) वतीने करण्यात आलेल्या राजकीय सर्वेक्षणाद्वारे हे अंदाज या विविध कारणांमुळे आता कुणाचे राजकीय भवितव्य काय असेल हे उद्याच स्पष्ट होणार आहे. डोबाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये काँग्रेसला १७८ जागा मिळतील. त्याच्यासह असलेल्या विविध आघाडीतील घटक पक्षांना ४५ जागांवर समाधान मानावे लागेल. त्यामुळे एकूण संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) २२३ आकडा गाठता येईल. दुसरीकडे भाजपला १२६ जागा मिळून त्यांच्याबरोबरच्या मित्र पक्षांना बत्तीस जागा मिळतील. त्यामुळे या आघाडीला दीडशेचा टप्पा पार करून १५८ जागा प्राप्त होतील. त्यांच्यासह अन्य छोटय़ा पक्षांना १३२ तर अन्य घटकांना तीस जागा मिळतील, असा अंदाजही या सर्वेक्षणाद्वारे वर्तविण्यात आला आहे.
या सर्वेक्षणाद्वारे काँग्रेस सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरणार असून त्यापाठोपाठ भाजप आणि अन्य छोटय़ा पक्षांचा क्रमांक लागतो. २७२ हा जादुई आकडा गाठणे कोणत्याही एका पक्षाला शक्य होणार नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र भाजप किंवा काँग्रेस पक्षाला १३२ जागा मिळविणाऱ्या अन्य प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन सत्तेची मोट बांधावी लागणार आहे. सत्ता स्थापनेसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डाव्या पक्षांना मात्र या सव्‍‌र्हेक्षणात केवळ तीस जागांवर समाधान मानावे लागणार असून त्यांना यात अत्यल्प जागा मिळतील, असा अंदाज बांधला आहे.
काँग्रेसने सोनिया गांधी, राहुल गांधीसह पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या स्टार प्रचारकांद्वारे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली कामे आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलित म्हणून जागा अधिक मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या पद्धतीवर स्तुती करताना त्यांच्यामुळे कोँग्रेसचा पारंपरिक मतदार भाजपकडे वळणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.