Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘राजयोगिनी अहिल्याबाई’ महानाटय़ाचा शुभारंभ
पुणे, १५ मे/प्रतिनिधी

 

इतिहासात अशा व्यक्तिरेखा होऊन गेल्या आहेत की त्यांनी समाजासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यापैकी अहिल्याबाई होळकर या एक प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्य़ांत अहिल्याबाईंनी काम केले असून, ते फार मोठे आहे, असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज व्यक्त केले.
मिरा फिल्म्स आयोजित राजयोगिनी अहिल्याबाई या महानाटय़ाचे उद्घाटन डॉ. सत्यपालसिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी अण्णा डांगे म्हणाले की, युद्धाविना राजकारण करून तीस वर्षे राज्य कारभार सांभाळला त्या अहिल्याबाई फार मोठय़ा होत्या. त्यांनी मध्य प्रदेशसारख्या राज्याच्या राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.
सुमारे दोनशे कलाकारांसोबत उंट, घोडे यांच्या ताफ्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित हे महानाटय़ सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद दास्ताने यांनी केले. या वेळी या महानाटय़ाचे लेखक, गीतकार व दिग्दर्शक किरण शनी, संगीतकार दीपा शनी तसेच प्रकल्प प्रमुख चित्रा अंतरकर, करुणा पाटील, मंजुषा ईधाटे, सुभाष मोहिते, मंदार नामजोशी आदी उपस्थित होते.