Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘गणेश आचार्य नृत्य अकादमी’ जून महिन्यापासून सुरू
पुणे, १५ मे/ प्रतिनिधी

 

पुण्यात कोरेगाव पार्क येथे जून महिन्यापासून गणेश आचार्य नृत्य अकादमी सुरू करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अकादमीची सुरवात येत्या २५ मे पासून होणाऱ्या एक महिन्याच्या कार्यशाळेने होणार असून, या कार्यशाळेत बॉलिवूड मसाला, सालसा, जॅस, चाचाचा, रम्पा आदी नृत्यप्रकार शिकविले जाणार आहेत.
मुंबई, कोलकाता, उदमपूर, सूरत पाठोपाठ पुण्यामध्ये नृत्य अकादमी सुरू करून या अकादमीत पाच वर्षांवरील सर्वाना प्रवेश घेता येईल. तसेच एक, तीन व सहा महिन्यांचे अभ्यासक्रम शिकविले जाणार असून, येथे प्रशिक्षण घेणाऱ्यांना बॉलिवूडमध्ये निश्चितपणे उत्तम संधी आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड, चित्रपट निर्माता राजू कोठारी अकादमीने पुण्यातील संचालक मयंक कोठारी आणि नितीश तलवार उपस्थित होते.
तसेच २५ मे पासून सुरू होणाऱ्या नृत्य कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८२१७१३४५२ किंवा ९८२०५४५६६८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले.