Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मोबाईल शॉपी फोडून एक लाखाची चोरी
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

 

चिंचवड बिजलीनगर येथील गुरुद्वाराजवळील एका मोबाईल सव्‍‌र्हिसिंग सेंटरचे कुलूप तोडून चोरटय़ांनी एक लाख रुपयांचे मोबाईल संच व लॅपटॉप चोरून नेले.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत पारसमल रांका (वय २७, रा. पारस प्लाझा, गुरुद्वाराजवळ, चिंचवड) असे तक्रारदार दुकानदाराचे नाव आहे. रांका यांचे नुरालिया कॉम्प्लेक्स येथे मोबाईल सव्‍‌र्हिसिंगचे दुकान आहे.
हे दुकान १३ तारखेला रात्री साडेदहा वाजता बंद करण्यात आले. १४ तारखेला त्याचा मित्र दिलीप याने त्यांना फोनद्वारे कळविले की, तुझ्या दुकानाचे कुलूप लावलेले नाही. यावरून पाहणी केली असता दुकानात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये ९३ हजार रुपयांचे दोन लॅपटॉप व आठ हजार रुपयांचे तीन मोबाईल संच असा एकूण एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा माल चोरून नेला. अधिक तपास फौजदार विश्वास जातक करीत आहेत.
सराफ दुकानात हात साफ करणाऱ्यास अटक
थेरगाव सोळा नंबर येथे पराग ज्वेलर्स दुकानात हात साफ करू पाहाणाऱ्या चोरटय़ास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सर्व माल जप्त करण्यात आला आहे. मनोजकुमार मांगीलाल काबरा (वय २४, रा. पुणे, मूळ रा. मुडगाव, कांकरोड, पो. राजगंगर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सुभाष सदानंद कोठारी (वय ३५, रा. पराग ज्वेलर्स, १६ नंबर, थेरगाव) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. काबरा याने गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोठारी यांच्या दुकानातील दागिन्यांच्या ट्रेमधून सोन्याची चोरी केली. त्याच्याकडून सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा माल जप्त केला. अधिक तपास हवालदार पालांडे करीत आहेत.