Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मोकळ्या जागा वाहनतळासाठी विकसित करणार
पिंपरी, १५ मे / प्रतिनिधी

 

निगडी जकात नाक्याजवळील तसेच िपपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मोकळ्या जागा वाहनतळासाठी विकसित करण्याचा निर्णय पिपरी पालिकेतील विधी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. या कामासाठी एक कोटी १७ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
विधी समितीचे सभापती कैलास थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत तीन कोटी ६१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव पालिका सभेपुढे मांडण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे आणि सहायक आयुक्त सुधाकर देशमुख यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. रहाटणी येथील सव्‍‌र्हे क्रमांक ४४ मधील आरक्षण क्रमांक ६५५ मध्ये शाळा इमारत बांधण्याकामी एक कोटी ७६ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बोपखेल येथील केसरीनगर ते स्मशानभूमीपर्यंतच्या विकास आराखडय़ानुसार बीबीएम पध्दतीने रस्ता विकसित करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी २५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.