Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

जमात-उद-दावाच्या नेत्यांच्या स्थानबद्धतेबाबत पंजाब सरकारला कारणे देण्याचे आदेश
लाहोर, १५ मे / पी. टी. आय.

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर जमात- उद - दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याच्या व त्याच्या सहकाऱ्यासह त्याला स्थानबद्द करण्यात आले त्याचे कारण त्यांनी त्या दोघांना त्यावेळी सांगितले होते की नव्हते त्याची माहिती सांगण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २१ मे पूर्वी द्यावी, असे आदेश लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने दिले.
सईद व त्याचा सहकारी निवृत्त कर्नल नाझीर अहमद यांनी आपल्या स्थानबद्धतेला आव्हान दिले आहे. त्या संदर्भातील सुनावणीच्यावेळी पंजाब प्रांताच्या सरकारने पुढील सुनावणी २१ मे रोजी आहे, तेव्हा जबाब द्यावा, असे सांगण्यात आले. सईद यांचे वकील ए. के. डोगर यांनी शासनाकडे या दोघांना अटक करण्यासाठी कोणतीही कायदेशीर बाजू नसल्याचे सांगून लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विचार मंडळाने अन्य दोघा जमात उद दवाच्या नेत्यांना मुक्त केल्याचे सांगितले. मात्र त्याच पाश्र्वभूमीवर या दोघांना स्थानबद्ध कले असल्याचे निदर्शनास आणले.
जमात -उद-दावा ही स्वतंत्र संघटना असून तिचा लष्कर- ए- तय्यबाशी कोणताही संबंध नाही, असा दावा करून या संघटनेवर केवळ बंदी आणावी असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सांगितले आहे. त्या संघटनेच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यास सांगितले नाही, याकडे डोगर यांनी लक्ष वेधले. सईद व अमीर यांना १२ डिसेंबरपासून स्थानबद्ध केले आहे, त्या कलमानुसार सदर व्यक्तींना ९० दिवसांपुरतेच स्थानबद्धतेत ठेवता येते, असेही ते म्हणाले.