Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

इंडियन पॉलिटिकल लीग

अडवाणी यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह!
सत्ता संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून या निवडणुकीत उतरलेल्या भाजपला हा पराभव अतिशय जिव्हारी लागला असून त्याचे दीर्घकालीन परिणामही या पक्षाला भोगावे लागणार आहेत. ‘पर्यायी सत्ताधारी पक्ष’ या नामाभिधानावरच आता मोठे प्रश्नचिन्ह लागले असून लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकीर्दीवरही असेच संशयाचे सावट या निकालांमुळे आले आहे.

स्थिर, धर्मनिरपेक्ष सरकारसाठी मनमोहन सिंग यांचे राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन
अनपेक्षित आणि निराशाजनक : राजनाथ सिंह

लोकसभा निवडणुकांचे निकाल अनपेक्षित आणि निराशाजनक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी भाजपचा दारुण पराभव मान्य केला. भाजपचा एवढा मोठा पराभव होईल असे वाटले नव्हते, असेही ते म्हणाले. राजनाथ सिंह गाझियाबाद मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

नेहमीच योग्य निर्णय घेणाऱ्या देशवासीयांप्रती सोनियांची कृतज्ञता

नवी दिल्ली, १६ मे/खास प्रतिनिधी

आपले हित कशात आहे याची देशवासियांना पुरेपूर जाणीव आहे. ते नेहमीच योग्य निर्णय घेतात, अशा शब्दात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-युपीएला मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज देशातील मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानपद व मराठाकार्डचा राष्ट्रवादीला फटका
शहरी भागाने काँग्रेसला दिला हात !
संतोष प्रधान
मुंबई, १६ मे

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पक्षाने वापरलेल्या मराठा कार्डबरोबरच शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा राज्यातील जनतेला फारसा भावलेला दिसत नाही. शहरी मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वाधिक जागा मिळवणे शक्य झाले आहे.

ट्वेन्टी-२०चा सामना षटकार मारून जिंकला!
मुख्यमंत्री अशोक चव्हाण
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते. मात्र २०-२० क्रिकेट सामन्याच्या धर्तीवर चौकार-षटकार ठोकून सामना जिंकला अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर आज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या आघाडीचा फायदा झाला तसाच काही ठिकाणी तोटाही झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसेमुळे काँग्रेसचा लाभ
उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबई, १६ मे/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मराठी माणसाला नव्हे काँग्रेसला लाभ झाला, असा थेट आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत अतिरेकी हल्ला झाला, रेल्वेत बॉम्बस्फोट झाले तरीही काँग्रेसला लाभ कसा झाला त्याचा नक्की अभ्यास केला जाईल, असे सांगत ठाकरे यांनी मुंबईतील पराभवावर विधानसभा निवडणुकीत नक्की मात करीन, असा विश्वास व्यक्त केला.

मनसेच्या सुरुंगामुळे युतीची माती!
ठाणे, १६ मे/ प्रतिनिधी

ना कुठली लाट, ना कुठला झंझावात. होता फक्त मनसेचा दणका. त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना लोकांनी निवडून दिले आहे. भाजपची पाटी मात्र कोरीच राहिली. शिवसेनेने महत्त्वाचे ‘ठाणे’ गमावले, पण कल्याणची सुभेदारी टिकवली. काँग्रेसने भिवंडीवरील पकड आणखी पक्की केली, पण पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर पुरस्कृत अपक्षापुढे गुडघे टेकले.

पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच आरपीआयची पाटी कोरी
बंधुराज लोणे
मुंबई, १६ मे

राज्यात प्रमुख शक्ती असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या एकाही गटाला या वेळी खाते खोलता आले नाही. त्यामुळे पंधराव्या लोकसभेत रिपब्लिकन खासदार दिसणार नाही. गेल्या दीड दशकात पहिल्यांदाच असे घडले आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीने विश्वासघात केला, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. गेल्या दीड दशकात कधी रामदास आठवले तर कधी प्रकाश आंबेडकर लोकसभेत होते.

विदर्भात फिफ्टी-फिफ्टी
काँग्रेस-राष्ट्रवादी पाच,सेना-भाजप पाच
नागपूर, १६ मे / प्रतिनिधी/ जिल्हा वार्ताहर

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात एकमेव जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने यावेळी जोरदार मुसंडी मारली असून दहापैकी पाच जागा जिंकल्या आहेत तर गेल्या निवडणुकीत अकरापैकी दहा जागा जिंकणाऱ्या सेना-भाजप युतीवर यंदा फक्त पाच जागांवर समाधान मानण्याची वेळ आली.

‘लाखमोला’च्या मनसे उमेदवारांना मिळणार विधानसभेची उमेदवारी
संदीप आचार्य
मुंबई, १६ मे

मुंबई-ठाण्यात शिवसेना-भाजपला ‘दे धक्का’ देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘लाखमोला’च्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार असून संपूर्ण राज्यात मनसे जवळपास दीडशे जागा लढविणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

अजित पवारांना घरचा आहेर
पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री आणि राज्याचे सर्वात पॉवरफुल मंत्री अजित पवार यांच्या सत्तेला आणि सत्ताकारणाला पुणे जिल्हय़ात ओहोटी लागल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसू लागले आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मिळालेले मताधिक्य, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असूनही मावळ मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला पत्करावी लागलेली हार,...

अंतर्गत बंडाळीचा फटका
आर. आर. पाटील यांची खंत
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात ताकद असतानाही पक्षाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज व्यक्त केली. गेली १० वर्षे काँग्रेसबरोबर आघाडी असतानाही यंदा काँग्रेसचा अपेक्षित फायदा होऊ शकला नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नऊ खासदार निवडून आले होते. नंतर पोटनिवडणुकीत एक जागाजिंकल्याने संख्याबळ १० झाले होते.