Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

कौल २००९

काँग्रेसने कमावले अन् भाजपने गमावले!
कौल २००९ - विदर्भ

गेल्या लोकसभा निवडणुकीत पदरी पडलेले अपयश विदर्भात काँग्रेसने दामदुपटीने भरून काढले आहे. गेल्या निवडणुकीत विदर्भात अकरा लोकसभा मतदारसंघ होते. त्यापैकी केवळ नागपूर या एकमेव मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले होते. या निवडणुकीत मतदारसंघ डी-लिमिटेशनमुळे दहा झाले. त्यापैकी तब्बल चार ठिकाणी काँग्रेसने मुसंडी मारली. तर गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी सव्याज काढला.

राष्ट्रवादीला जिव्हारी फटका
कौल २००९ -प. महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील साखरेच्या पट्टय़ात असलेली राष्ट्रवादीची ताकद खिळखिळी झाल्याचे आजच्या लोकसभा निकालांवरून उघड झाले. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोल्हापूर व हातकणंगले या राष्ट्रवादीच्या खात्रीच्या जागा गेल्याने राष्ट्रवादीला प्रचंड धक्का बसला आहे. या दोन्ही बालेकिल्ल्यांतील पराभवाने राष्ट्रवादीला वर्मी घाव बसला आहे. सरळ लढतीत सांगलीची जागा काँग्रेसने राखली असली तरी काँग्रेस बंडखोराने दिलेली लढत नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

भाजपला जॅकपॉट अन् भुजबळांचा वैयक्तिक विजय
कौल २००९ -उत्तर महाराष्ट्र
अभिजीत कुलकर्णी
उत्तर महाराष्ट्रातील निकाल भाजपसाठी ‘जॅकपॉट’ ठरला आहे. सहा पैकी चार जागा जिंकत हा पक्ष अग्रस्थानी राहिला असला तरी सर्वाधिक चर्चा मात्र राष्ट्रवादीने जी एकमेव जागा जिंकली, त्या नाशिकच्या जागेची होत आहे. छगन भुजबळांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरविल्यावर विरोधकांनी केलेल्या विखारी जातीय प्रचारामुळे ही लढत औत्सुक्याचा विषय ठरली होती.

मनसेची लाट. युतीची वाट!
कौल २००९ -मुंबई
रवींद्र पांचाळ
राज ठाकरे यांनी मुंबई - ठाण्यात एकहाती आणलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाटेमुळे शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांच्या नाकातोंडात धक्कादायक पराभवाची धूळ गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठीच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी सातत्याने पुकारलेली आक्रमक आंदोलने मराठी मनाला विशेषत: तरुण वर्गाला भावल्याचे चित्र पुढे आले असून मनसे आणि प्रामुख्याने शिवसेना यांच्या राजकीय संघर्षांत विजयाचा लोण्याचा गोळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या तोंडात अलगद पडला आहे!

मतदारांनी राखला अजब समतोल
कौल २००९ -ठाणे-कोकण
राजीव कुळकर्णी
कोणत्याही पक्षाने अथवा उमेदवाराने मतदारांना गृहीत धरू नये हेच वसई-पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या कोकण किनारपट्टीतील ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या सहा निकांलांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मागील पिढी व नवी पिढी यांच्या संघर्षांत सत्तेचे सुकाणू राजकारणातील नव्या पिढीच्या हाती सोपविण्याकडे असलेला कलही या निकालाने अधोरेखित केला. ठाण्यासह कोकणातील या सहा पैकी तीनच जागांवर राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार दिले होते.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी (पक्षाचीही) प्रतिष्ठा राखली!
कौल-२००९ - मराठवाडा
‘धावफलक गाढव असतो,’ असे प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक सर नेव्हिल कार्ड्स यांनी फार वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील मराठवाडा विभागाच्या निकालाकडे पाहताना त्याची सत्यता पटते. विभागातील एकूण आठ जागांपैकी पाच जागा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीने जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. केवळ आकडय़ांकडे पाहिले, तर युतीने वर्चस्व राखले, असेच दिसते.