Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

व्यापार - उद्योग

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बंदोबस्तासाठी आता विदेशी कंपनी सरसावली
व्यापार प्रतिनिधी: पावसाच्या दोन-चार सरींनीही मुंबईतील रस्त्यांची दूरवस्था होऊन जाते अशावेळी रस्त्यावरील वाहनाची रहदारी सुरळीत राखणे हे प्रशासनापुढचे सर्वात मोठे आव्हान ठरते. पण आता या समस्येवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी एका विदेशी कंपनीने बा'ाा सरसावल्या आहेत. कॅनडास्थि मॅट्रेक्स या कंपनीने रस्त्यावरील खड्डय़ांना बुजविणारा सर्वात किफायतशीर आणि अद्ययावत तंत्राने सुसज्ज उपाययोजना विकसित केली आहे आणि भारताच्या मुख्य शहरात ही उपाययोजना

 

राबविण्यासाठी ३० लाख डॉलरच्या गुंतवणुकीचा संकल्पही सोडला आहे. देशातील कार्यान्वयनाला मुंबईतून सुरुवात करताना, मॅट्रेक्सने या संबंधाने मुंबई महानगरपालिकेसोबत बोलणीही सुरू केली आहे. पालिकेकडून दरसाल रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बंदोबस्तासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा खर्च केला जात असतो.
मॅट्रेक्सकडून वापरल्या तंत्रानुसार रस्त्यावरील रहदारीत केवळ पाच मिनिटांचा अडसर येईल, असे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक प्रमोद श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. खड्डय़ांचा बंदोबस्त करताना अवजड रोलर किंवा दाब देण्यासाठी यंत्राचा वापरही आवश्यक नसल्याचे त्यांनी सांगितले. गत दोन वर्षांपासून पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मॅट्रेक्सकडून विकसित करण्यात आलेल्या उपाययोजनेचा प्रत्यक्ष नमुना आणि कामगिरीचे प्रात्यक्षिक ठेवले जात असून, मोठ-मोठय़ा कंटेनर्सची वाहतूक करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या रस्त्यांवर या उपाययोजनेचा यशस्वी अंमल सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. मॅट्रेक्सच्या मुंबईतील प्रकल्पाची सध्याची उत्पादन क्षमता प्रतिदिन ३०० टन इतकी असून, गरज पडल्यास ती वाढविलीही जाऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईकरांसाठी एमटीएनएलची ‘थ्रीजी’ सेवा
व्यापार प्रतिनिधी: सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल)ने आपल्या सेल्युलर सेवेअंतर्गत अद्ययावत ‘थ्रीजी’ सेवा मुंबईकरांसाठी सुसज्ज केली आहे. भारतात थ्रीजी सेवेचा प्रारंभ एमटीएनएलनेच केला असून, मोबाइल फोनवर टीव्ही वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण, व्हिडीओ कॉल्स, २ मेगाबाइट प्रति सेकंद इतक्या वेगाने इंटरनेटवरून डेटा डाऊनलोडिंग अशा अत्याधुनिक सेवांचा ग्राहकांना लाभ मिळेल.
एमटीएनएलच्या थ्रीजी सेवेसाठी आवश्यक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांची उभारणी अनुक्रमे अल्काटेल ल्युसेन्ट आणि सरकारी क्षेत्रातील आयटीआय या कंपन्यांकडून पुरविली गेली आहे. प्रारंभी फक्त दक्षिण आणि मध्य मुंबईत ही सेवा सुरू होईल आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंत विस्तार पावेल, अशी माहिती एमटीएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एस. पी. सिन्हा यांनी दिली.
या सेवेत थ्रीजी तंत्रज्ञानाने समर्थ हँडसेट आणि थ्रीजी यू-सिम एमटीएनएलकडून ग्राहकांना पुरविले जाईल. पुढील नऊ महिन्यांत या सेवेचे कार्यान्वयन सुरू होईल, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. टीव्ही आणि व्हिडीओ सेवेसाठी एमटीएनएलने यापूर्वीच अक्ष ऑप्टिफायबर्स लिमिटेड या कंपनीशी सामंजस्याचा करार केला आहे.

शेअर बाजारातील मराठी टक्क्याचा वाटाडय़ा
व्यापार प्रतिनिधी: शेअर बाजारातील मराठी टक्क्याचा वावर उत्तरोत्तर वाढत असून, याचा प्रत्यय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याने दिला आहे. २००८ साली पुणे शहर बीएसई उलाढालीत देशातील सर्व शहरात सातव्या क्रमांकावर होते, तर येथील ग्राहकांच्या संख्येत दरमहा २० टक्के वाढ होत आहे, तर उलाढालीत ५० टक्के वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर मराठीजनांना शेअर बाजारातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देण्यासाठी ‘मराठीशेअर डॉट कॉम’ (www.marathishare.com) नावाच्या मराठीतील वेबसाइटचा अलीकडेच प्रारंभ करण्यात आला.
या वेबसाइटद्वारे शेअर बाजाराच्या तांत्रिक विश्लेषणाबरोबरच गुंतवणूकयोग्य समभाग सुचविले जातात. गुंतवणुकयोग्य समभाग सुचविले जातात. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे वर्षांनुवर्षे अनेक समभागांचे ओझे बाळगावे लागते, असे समभाग विकून टाकावेत की राखून ठेवावेत याचे विनामूल्य मार्गदर्शन ‘मराठीशेअर डॉट कॉम’द्वारे केले जाते. त्याचबरोबर साइटवरील ‘गुंतवणूक धोरण’ या सदराखाली व्यक्तिसापेक्ष जोखमेनुरूप गुंतवणुकीची दिशा कशी असावी याचेही मार्गदर्शन मिळते. मेटागेन फायनान्स या कंपनीने ही वेबसाइट प्रवर्तित केली आहे. शेअर बाजाराचे स्वरूप अधिकाधिक अद्ययावत होत असताना, पारदर्शिता आणि सहजसाध्यता या बाबींकडे लक्ष देऊन बाजाराला अधिकाधिक सार्वत्रिक रूप प्रदान करण्याचा हेतू यामागे आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजची पुण्यात ‘अ‍ॅक्टिव्ह ट्रेडर’ सेवा
व्यापार प्रतिनिधी: आयसीआयसीआय सिक्युरिटीज कंपनीने पुणे शहरात आजपासून ‘अ‍ॅक्टिव्ह ट्रेडर’ सेवा सुरू केली. अ‍ॅक्टिव्ह ट्रेडर सव्‍‌र्हिस (एटीएस) हे अ‍ॅक्टिव्ह ट्रेडरसाठी एक ‘ऑफलाईन-ट्रेडिंग’ दालन आहे जे गुंतवणूकदारांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांच्या सहाय्याने खास संशोधन व व्यक्तिगत सेवा पुरवते. ही माहिती आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि. च्या इक्विटी विभागाचे प्रमुख व वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल गुलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, पुणे शहर हे उच्चशिक्षित ग्राहकांचे शहर आहे. येथे ही सेवा सुरू करून आयसीआयसीआय सिक्युरिटीज शेअरबाजारातील पद्धतशीर व शिस्तबद्ध सहभागाचे महत्त्व अधोरेखित करू इच्छिते. २००८ साली पुणे शहर बीएसई उलाढालीत देशातील सर्व शहरात सातव्या क्रमांकावर होते, असेही त्यांनी सांगितले.
या एटीएस सेवेमध्ये पोझिशनल कॉल, टेक्निकल पिक्स, मोमेंटम पिक्स, रोलओव्हर मॉनिटर, ओपन इंटरेस्ट इनसाइड, स्पेशल सिच्युएशन आर्ब्रिटाज, पेअर कॉल्स या सारखी उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत. एटीएस सेवा कोचीन, इंदूर, लुधियाणा, राजकोट आणि सुरत यांसारख्या अनेक शहरात सुरू करण्यात आली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एटीएस सेवेचा विकास होत आहे. दर महिन्यास वरील शहरातील ग्राहकांच्या संख्येत २० टक्के वाढ होत आहे. तर दरमहा उलाढालीत ५० टक्के वाढ होत आहे. गेल्या तिमाहीत या सेवेत सर्वाधिक ग्राहक जोडले गेले होते.

एलआयसी म्युच्युअल फंडाचे पुण्यात विभागीय कार्यालय
व्यापार प्रतिनिधी: एलआयसी म्युच्युअल फंडाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशोभन सरकार यांच्या हस्ते आज येथे झाले. याप्रसंगी एलआयसी म्युच्युअल फंडाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रवि चौधरी, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुणे विभाग-१ चे वरिष्ठ मंडळ प्रबंधक पार्थ समल, विभाग-२चे वरिष्ठ मंडळ प्रबंधक डी. एम. आपटे, एलआयसी म्युच्युअल फंडच्या नाशिक विभागाचे विभागीय अधिकारी शेखर बुवा व महामंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते. फंडाच्या मागील वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना सुशोभन सरकार यांनी मागील आर्थिक वर्षांत एलआयसी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ६४.२९ टक्के वाढून २३ हजार ९२ कोटी रुपये इतकी झाली आहे, असे सांगितले. व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता या निकषावर आधारित क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंडाने १२व्या स्थानावरून ७व्या स्थानावर झेप घेतली आहे. याच निकषावर आधारित पहिल्या १५ म्युच्युअल फंडांचा विचार करता वाढीचा हा वेग सर्वात जास्त आहे. पुण्याचा विचार करता पुणे व्यवसाय केंद्रांतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता मागील आर्थिक वर्षांत २१२ टक्क्यांनी वाढली.

आयएनजी वैश्य बँकेचा २० टक्के लाभांश
व्यापार प्रतिनिधी: आयएनजी वैश्य बँकेने २००८-०९ या आर्थिक वर्षांसाठी आपल्या समभागधारकांना २० टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांतील बँकेचा करोत्तर नक्त नफा हा २० टक्क्यांनी वाढून १८८.८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत तो १५६.९ कोटी रुपये होता. करपूर्व नफा २५१.५ कोटी रुपयांवरून १७ टक्क्यांनी वाढून तो २९४.७ कोटी रुपये एवढा झाला. उलाढालीतील नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) हा या वर्षांत गतवर्षीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढला असून ३०७.५ कोटी रुपयांवरून ४२४.८ कोटी रुपयांवर गेला आहे. निव्वळ व्याजापोटी उत्पन्न (एनआयआय) ४८ टक्क्यांनी वाढून ते २१३ कोटी रुपयांवरून वाढून ३१४.५ कोटी रुपये झाले आहे. इतर उत्पन्न ३७ टक्क्यांनी वाढून ते गतवर्षीच्या १८४ कोटी रुपयांवरून यावेळी २५१.५ कोटी रुपये झाले आहे.

कोविडीनकडून भारतात हेल्थकेअर उत्पादनांची विस्तृत श्रेणी
व्यापार प्रतिनिधी : हेल्थकेअर प्रोडक्टस्ची जगातील आघाडीची कंपनी कोविडीन या कंपनीने भारतीय हेल्थकेअर प्रोडक्टस्च्या बाजारपेठेत प्रवेश केल्याचे जाहीर केले असून कंपनीने त्यांचे मुख्यालय गुरगाव येथे स्थापन केले आहे. संपूर्ण भारतीय उपखंडात कंपनीने आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली असून प्रदेशातील हेल्थकेअर सप्लायर्सबरोबर कंपनीने कोलॅबरेशन करार केले आहेत. पूर्वी टायको हेल्थकेअर म्हणून ओळखली जाणारी कोविडीन कंपनी आज मेडिकल डीव्हाईस, मेडिकल इमेजिंग, मेडिकल सप्लाइज आणि फार्मास्युटिकल मार्केटमधील अनेक सवरेत्कृष्ट ब्रॅण्डची जगातील एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. संशोधन आणि विकासावर (आर. अ‍ॅण्ड डी.) लक्ष केंद्रित केलेल्या कोविडीनने जगभरातील बाजारपेठांमध्ये उच्च गुणवत्तेची आणि परवडणारी उत्पादनं उपलब्ध केल्यामुळे तिची चांगली ओळख निर्माण झाली आहे. कंपनीने लावलेल्या अनेक शोधांमध्ये कमीत कमी रक्तस्राव करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी इलेक्ट्रोसर्जरीसाठीची अत्याधुनिक सर्जिकल टुल्सचा समावेश आहे.

केएफसीचे ‘बॉक्स ब्रेकिंग मील’
व्यापार प्रतिनिधी: केन्टुकी फ्राइड चिकन अर्थात केएफसीने ‘बॉक्स मास्टर’ ऑफर जाहीर केली आहे. केएफसीचं जगप्रसिद्ध हॉट अँड क्रिस्पी चिकन यात असून, त्याच्या जोडीला हॅशब्रोन, टोमॅटो, मिरच्या आणि चीज याचा समावेश आहे. या साऱ्याला कुरकुरीत भाजलेल्या टॉर्टिलाचं आवरण असणार आहे. या बॉक्समास्टरची किंमत १०५ ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे.

बीएसएनएलचा वोक्खार्ट हॉस्पिटलबरोबर करार
व्यापार प्रतिनिधी: वोक्खार्ट हॉस्पिटल्स या भारतातील आघाडीच्या सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या हॉस्पिटल ग्रुपचा नुकताच बीएसएनएलसह सामंजस्य करार झाला असून, त्याचा फायदा तेथील कामगारांना मिळणार आहे. या कराराने कामगारांना अद्ययावत आरोग्य सुविधांचा लाभ वोक्खार्ट हॉस्पिटल्सद्वारे मिळणार आहे. या सुविधेसाठी बीएसएनएलच्या कामगारांनी आपल्या एच आर डिपार्टमेण्टशी अथवा वोक्खार्ट हॉस्पिटल्सशी संपर्क साधता येईल.

मॅक्डोनाल्ड्समध्ये आता डिजिटल खेळणी
व्यापार प्रतिनिधी: लहानग्यांचा सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मॅक्डोनाल्ड्स या रेस्टॉरन्ट्स शृंखलेने आपल्या ‘हॅप्पी मिल’ या लोकप्रिय योजनेत आता ‘मॅकडिजि’ खेळण्यांचा समावेश केला आहे. मुलांचे आवडीचे निरनिराळे खेळ डिजिटल स्वरूपात सादर करणारी ही खेळणी आहेत. मॅक्डोनाल्ड्सने ही सहा हँड हेल्ड डिजिटल खेळणी खास वनवून घेतली आहेत. टेनिस, स्विमिंग, बेसबॉल, बास्केटबॉल, सॉकर आणि पोल व्हॉल्ट अशा सहा खेळांचा यात समावेश आहे.

‘जीटीटी’चे पुण्यात ग्लोबल एज्युसेंटर
व्यापार प्रतिनिधी: ग्लोबल टॅलेंट ट्रॅक लिमिटेड या संस्थेने भारतातील पहिले ग्लोबल एज्युसेंटर सुरू केले आहे. हे नवीन केंद्र स्थापन करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ही माहिती जीटीटी च्या सीईओ डॉ. उमा गणेश यांनी दिली. त्या म्हणाल्या की, पुढील १२ महिन्यांच्या कालावधीत सुरू होणाऱ्या भारत, चीन आणि एशियातील इतर ५० केंद्रांपैकी पुण्यातील केंद्र पहिले केंद्र आहे. आम्ही उच्च शिक्षणात बदल घडवण्यासाठी आणि एक लाख विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहोत.