Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

चला, ‘मास्तरमामा’च्या गावाला जाऊया..
काही वर्षांपूर्वी एमटीव्हीवर विंचू चावला हे हीट रिमिक्स गाणे देणाऱ्या संगीतकार श्रीरंग आरस यांनी बच्चेकंपनीला प्राथमिक शिक्षणाचे धडे एका संगणकीय सीडीद्वारे मिळवून देणारी ‘मास्तरमामा’ ही डीव्हीडी नुकतीच बाजारात आणली आहे. सध्या बाळगोपाळांच्या सुट्टय़ांचा हंगाम सुरू झाला आहे. एस्सेल वर्ल्ड, कोकणात हुंदडायला जाणे, आंबे, करवंद आणि जांभळे खाणे, सांस्कृतिक शिबिरात भाग घेणे असे कार्यक्रम सुट्टीमध्ये होत असले तरी मुलांचे मनोरंजन तर व्हावे, पण त्यांना आपला निसर्ग, राष्ट्रगीत, इंग्रजी अक्षरमाला, मराठी अक्षरमाला यांची ओळख सुध्दा व्हावी या हेतूने त्यांनी ही डीव्हीडी विकसित केली आहे.

वाट विनोदाची, चाल हसण्याची
मधल्या काळात मराठी सिनेमाने अनेक वर्षे विनोदी चित्रपटांचा यशस्वी फॉम्र्यूला वापरला. सुरुवातीला दादा कोंडके आणि नंतरच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ या जोडगोळीने अनेक वर्षे विनोदी चित्रपट गाजवले. पण हीच विनोदाची वाट चॅनल्सची स्पर्धा वाढल्यानंतर छोटय़ा पडद्यावर आली. हिंदी चॅनल्सवर तर विनोद सांगून हसवण्याची स्पर्धा सुरू झाली. विनोदवीरांचा भाव वधारला.