Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९


राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत महाराष्ट्रातील १४ खासदारांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्या भेटीसाठी निघालेले महाराष्ट्रातील खासदार आणि अन्य नेतेमंडळी.

रालोआला लागले ‘लोअर सर्किट’, तरीही विरोधी पक्षनेतेपदी अडवाणी कायमच
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी

पंतप्रधानपदाचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी लालकृष्ण अडवाणीच कायम राहणार आहेत. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ गळतीच्या ‘लोअर सर्किट’मध्ये सापडल्याने आज रालोआची बैठक रद्द करण्यात आली. रालोआतील प्रमुख घटक पक्ष जदयुचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीत पोहोचले नाही.

दुर्लक्षित सपा विरोधात बसणार,
लालूंना अजूनही सत्तेची आशा
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी
केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नव्या युपीए सरकारला एकतर्फी समर्थनाची घोषणा केल्यावरही साधी दखलही घेतली जात नसल्याचे बघून आज समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, लालूप्रसाद यादव यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याची अजूनही आशा आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीला सत्तेतून दूर राखण्यासाठी बहुजन समाज पार्टीकडून काँग्रेस-युपीए सरकारला बिनशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

पंतप्रधानांचे खास दूत श्याम सरण यांचे मत
देशातील स्थिर राजकीय परिस्थिती वैज्ञानिक प्रगतीसाठी पूरक
पुणे, १८ मे / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांनंतर देशात निर्माण झालेली स्थिर राजकीय परिस्थिती वैज्ञानिक प्रगतीसाठी पूरक असल्याचे मत पंतप्रधानांचे खास दूत व ‘हवामानबदला’संबंधी आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाचे प्रमुख डॉ. श्याम सरण यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) आयोजित करण्यात आलेल्या ‘हवामानबदल- सद्यस्थिती व भविष्यातील योजना’ या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी ते पुण्यात आले होते.

उत्तमराव पाटील यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

यवतमाळचे माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलातर्फे करण्यात आली आहे. याकरिता राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशाराही क्रांती दलाचे सरचिटणीस अरविंद राठोड यांनी दिला. भारतीय जनता पक्षातून बाहेर पडल्यावर बंजारा समाजाचे नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘मराठा तितुका मेळवावा’मुळे ओबीसींनी दिला राष्ट्रवादीला फटका
मुंबई, १८ मे/प्रतिनिधी

काँग्रेसच्या राज्यात तब्बल १७ जागा निवडून आल्या असताना आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप करण्याला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी समाजाने धडा शिकवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते खासगीत मान्य करीत आहेत.

विखे, थोरात यांची हकालपट्टी करा- आठवले
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या बाळासाहेब विखे पाटील आणि बाळासाबेह थोरात यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी आज रामदास आठवले यांनी केली. या मागणीसाठी आपण सोनिया गांधी यांची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे मुख्यालय असणाऱ्या टिळक भवनवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. आझाद मैदान येथील मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावरही निदर्शेने करुन रिपाईं कार्यकर्त्यांनी पक्षाचा फलक तोडून टाकला.