Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे ती फक्त आयपीएलची. लहानांपासून मोठय़ांपर्यंत, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, मुलांनाच नव्हे तर मुलींनाही आयपीएलचे वेड लगले आहे. सुट्टय़ांचा मोसम असल्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींना तर आयपीएल शिवाय काही सुचतच नाही. चार तासांची निर्णायक मॅच असल्यामुळे प्रत्येकजण २०-२० ला प्राधान्य देतो. प्रत्येक बॉलची एक वेगळीच मजा असते. एखादा सिक्सर किंवा एखादी विकेट कशी काय miss

 

करणार? आयपीएलमध्ये असलेल्या आठ टीम्सपैकी कोण बाजी मारणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. गतवर्षीचे विजेते राजस्थान रॉयल्स यावर्षी मागे राहणार का? ट्रॉफी कोण घेऊन जाणार- चेननई सुपर किंग्ज की दिल्ली डेअर डेविल्स? कोलकाता नाईट रायडर्सच्या इज्जतीचा तर फालुदाच झाला आहे! अशा चर्चा सर्व तरुणांमध्ये ऐकू येत आहेत.
यंदा या मॅचेस भारतात न खेळवल्यामुळे लाइव्ह मॅचेस बघण्याच्या आनंदाला बऱ्याचजणांना मुकावे लागले आहे, पण तरीही आयपीएलची लोकप्रियता मात्र किंचितही कमी झालेली नाही. सॉफ्ट ड्रिंक्स व वेफर्ससोबत मॅचचा आस्वाद घेणारे आज घरोघरी दिसतात; पण मित्रांसोबत मॅच बघण्याचा आनंद काही औरच! घरी मॅच बघताना आई-बाबांच्या सूचनांचा भडिमार चालू असतो- ‘जरा व्हॉल्यूम कमी करा, किती तो गोंधळ! काय आता दिवसभर टी. व्ही.पुढेच ठाण मांडून बसणार का? पण घराबाहेर मॅच बघायची ठरवले तर स्वातंत्र्यच स्वातंत्र्य! अनेक मोठमोठय़ा कॅफेजमध्ये ही सोय उपलब्ध आहे. मॅचच्या निमित्ताने तरुण-तरुणींचे घोळके सीसीडीज्सारख्या कॅफेज व स्पोर्टस् बार एक्स्प्रेससारख्या स्पोर्टस् बारमध्ये नजरेस पडतात. अशा वेळी या कॅफेजमध्ये काही स्कीम्स जाहीर केल्या जातात, ज्या तरुणांना अधिकच आकर्षित करतात. JUGHEAD’S असाच एक कॅफे आहे. दहिसर, मालाड व पवई येथील तरुण वारंवार तेथे जातात. विविध पदार्थाचा आस्वाद घेत तरुणांना मॅचचा आनंद लुटता येतो. यांनी अशी स्कीम जाहीर केली आहे की दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत जेवणावर २० टक्क्यांची सूट दिली आहे. दुपारी १२.०० ते सायं. ७.०० या वेळेस 'smily hours' असे संबोधले आहे. या वेळेत एका ड्रिंकवर एक ड्रिंक फ्री अशी योजना आहे. दहिसर येथील खवॅऌएअऊह्णर चे व्यवस्थापक किशोर चव्हाण असे म्हणाले की, ‘या स्कीम्समुळे वीकएन्डस्ना अनेक तरुण इथे गर्दी करतात.’
तर अशा या प्रलोभनांना बळी पडून तरुण वर्ग कॅफेज्कडे अधिकच आकर्षिला जातोय. अशा या आयपीएलच्या नशेत सर्वच धुंद झाले आहेत!
पूनम बुर्डे
सेंट झेवियर्स कॉलेज
poonamburde@yahoo.co.in

सुटी संपायला आली! म्हणजे आता कॉलेजला जावे लागणार! तीच तीच लेक्चर्स, तेच तेच पं्रोफेसर्स, किती तो कंटाळा! आणि त्यात तो पाऊस! ही सुट्टी अशी सुरू राहावी असे अनेकांना वाटत असते. सुट्टी म्हणजे किती मज्जा! मित्रांबरोबर बाहेर जाणे, अख्खा दिवस घरी लोळत पडायचे, असे सर्वाना कधी ना कधी वाटते. पण सेंट झेवियर्सच्या मुलांना सुट्टी संपवून कॉलेजला कधी जातोय, असे वाटायला लागले आहे आणि कारण खूप स्वाभाविक आहे. मल्हार ०९ ची तयारी सुरू झाली आहे.
‘मल्हार’ हा मुंबईतील सवरेत्कृष्ट फेस्टस्मधील एक आहे. त्याची तयारीही जोमानेच व्हायला हवी. मल्हार ऑगस्टमध्ये होतो खरा, पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एक कॉलेज फेस्टिव्हलचे आयोजन करणे आणि तेही केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच ही काही सोप्पी गोष्ट नाही. मल्हार हा सर्वासाठीच एक अविस्मरणीय अनुभव असला पाहिजे. या हेतूनेच मल्हारची तयारी सुरू झालेली आहे. विद्यार्थी तर मार्चपासूनच कामाला लागले होते. organisers, organising committee, valunteers मिळून अशी मल्हारची वर्कफोर्स तयार होते. मल्हारसाठी थीम ठरवणे, इव्हेंटस् ठरवणे, स्पॉनसर्स जमवणे इ. काम हे विद्यार्थी सुट्टीत करतात. जवळ जवळ २० डिपार्टमेंटस् मल्हारसाठी काम करीत असतात. सिक्युरिटी, पीआर, फाइन आर्टस्, ग्राफिक्स, इंडियन परफॉर्मिग आर्टस्, असिस्टंटसारखे डिपार्टमेंट प्रमुख यांचे सुरुवातीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीतच पार पडतं. या वर्षी सेंट झेवियर्स कॉलेजला १४० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या वर्षीचा मल्हार अधिकच दणक्यात झाला पाहिजे! यासाठी यंदा अनेक नवे वेन्चर्स ‘मल्हार-०९’ घेऊन येणार आहे. सेंट झेवियर्सचं नव्हे तर सर्व विद्यार्थी मल्हारची आतुरतेने वाट बघत असतात आणि एवढय़ा मोठय़ा फेस्टिव्हलचे उत्साही भागीदारही असतात!
पूनम बुर्डे
सेंट झेवियर्स कॉलेज
poonamburde@yahoo.co.in

प्रिय मिहीर,
हाय! तू इथून जाऊन आठवडा होऊन गेला तरी अजून असं वाटतं की, तू इथेच आहेस. खरंच तुझी सवय लागून गेली होती. त्यामुळेच तुझं इथे नसणं रिअलाइज झालं, की खूप त्रास होतो. असो. मी इथे मजेत आहे. सुट्टी एकदम मस्त चाललीये. सुट्टीची सगळ्यात छान गोष्ट काय असते माहित्येय? सकाळी उशिरा उठायचं, रोजचे पेपर्स ‘अथपासून इतिपर्यंत’ वाचून काढायचे. काय चैन आहे ना!! म्हणजे आई रागवते जराशी, पण आता तिलाही माझ्या सुट्टीची सवय झालीये. माझी सकाळ अशा पद्धतीने सुरेख उजाडते. नंतर काय रेडिओ आहेच सोबतीला.. आहाहा.. आयुष्य असावं तर असं..!!
त्या दिवशी १६ तारखेला तर मी अख्खा दिवस डोळे टीव्ही स्क्रिनला लावून बसले होते. फॉर दॅट मॅटर एक्झिट पोलच्या दिवशीसुद्धा. सगळ्या चॅनेल्सचे प्रचंड विरोधाभासाचे अंदाज बुचकळ्यात टाकणारे होते आणि या रेटने आपल्याला आठ-दहा पंतप्रधान, आठ-दहा उपपंतप्रधान आणि जवळजवळ दुसरी लोकसभा मिळाली असती. पण हे सगळं खोटं ठरवत यूपीएने आघाडी मिळवली आणि मला खरचं खूप बरं वाटलं.
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा सेन्सिबल पंतप्रधान पुन्हा एकदा आपल्याला मिळणार हे कळल्यावर आनंद झाला आणि मायावती पंतप्रधान झाल्या असत्या तर हा देश सोडून जाण्याचा माझा विचार मी बदलून टाकला. तू तर काय बाबा राजधानीचाच रहिवासी. म्हणजे आम्हा पामरापर्यंत न पोहोचणरा आतल्या गोटातल्या बित्तंबातम्या आपल्याला ठाऊक असणार.. ए सगळं मला सविस्तर कळव बरं का..
विक्रांतबद्दल वाचून खूप वाईट वाटलं यार! काय झालं त्याच्या जॉबचं पुढे?? खरंच काय करतील रे हे लोक आता? केवळ ‘चलती’ आहे म्हणून नीट विचार न करता आंधळेपणाने एखाद्या क्षेत्रात करिअर करायचा धेडगुजरी डिसीजन यांना आता किती महागात पडणार आहे! एकतर वय वाढलेलं, झापडं लावल्यासारखा एकच एक अभ्यास केल्यामुळे इतर कुठल्याही क्षेत्रातील काही ज्ञान नाही. वाचनाची आवड नाही.. स्वत:हून काही नवीन माहिती मिळवायची इच्छा नाही.. मन रमवणारा एकही छंद नाही.. आणि पैशाच्या मस्तीमुळे आलेल्या अ‍ॅरोगन्समुळे साथीला एकही जिवलग मित्र नाही!! आपल्या आधीची अख्खी एक पिढी मल्टिनॅशनल्स आणि डॉलर्सच्या फुग्यावर तरंगत खुशीत होती. हा फुगा कधी ना कधी फुटणारच होता.. पण आता त्याचं भयानक अक्राळविक्राळ स्वरूप यांना जाणवायला लागलंय!! असो.
बाकी काय?? कसा आहेस? इकडील सर्व ठीक!! चल, पत्र पुरे करते. काळजी घे.. मिस यू, Love..
सावनी

मित्रांनो, या वर्षीपासून ११ वीची अ‍ॅडमिशन ‘एका क्लिकची गोष्ट’ असणार आहे. प्रत्यक्ष जाऊन, रांगेत उभं राहून अ‍ॅडमिशन फॉम्र्स मिळविण्याच्या कटकटीतून यंदा शासनाने विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. यंदापासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत मित्रांनो तुमचं काम सोपं झालंय. तुम्हाला करायचंय एवढंच, वेबसाइटवर जायचं, अ‍ॅडमिशन फॉर्म डाऊनलोड करायचा, तुमच्या आवडीनुसार कॉलेजचा कोड भरायचा आणि आपल्या जवळच्या मदत केंद्रामध्ये फॉर्म सबमिट करायचा.
‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MKCL) ही संस्था वेबसाइट तयार करीत असून यासाठीचे सॉफ्टवेअरही तेच विकसित करीत आहेत. ही वेबसाइट बहुधा १ जूनपासून सुरू होणार आहे.
गेल्या वर्षीपर्यंत ‘अ‍ॅडमिशन मॅरेथॉन’साठी विद्यार्थी- पालकांना एकापाठोपाठ एक कॉलेजेसमध्ये लांबच लांब रांगा लावून उन्हातान्हात, पावसापाण्यात उभं राहावं लागत होतं. तसंच प्रत्येक कॉलेजमध्ये वेगळा फॉर्म -ब्रोशर घेण्यासाठी किमान शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत होते. यावेळी मात्र पालकांच्या खिशाला बसणारा हा भरुदड जरा हलका होणार आहे. कारण फॉर्म वेबसाइटवरून विनाशुल्क डाऊनलोड करता येईल. फक्त तो फॉर्म सबमिट करताना त्या मदत केंद्रावर १२५ रूपये फी भरावी लागेल. या वेबसाइटवरच विविध कॉलेजेसची माहिती उपलब्ध असेल. पालक आणि विद्यार्थ्यांना चार-चार कॉलेजेसचे फॉर्म आणि ब्रोशर्स आणताना- भरताना करावी लागणारी धावपळ आणि होणाऱ्या प्रवास खर्चापेक्षा ही रक्कम नक्कीच कमी असणार आहे. तसेच फॉर्मवरील प्रश्न व सूचना इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांनाही हे सोयीचे पडेल.
मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील सर्व कॉलेजेससाठी एकच फॉर्म असल्यामुळे आणि कॉलेजेसना स्वतंत्र कोड नंबर्स दिल्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ कमी होईल तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत
लागल्यास संपूर्ण मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये MKCL तर्फे १००० मदतकेंद्रे तसेच विविध हेल्पलाइन्स सुरू करण्यात
येणार आहेत. त्यामुळे यंदाची ११ वीची प्रवेशप्रक्रिया सोपी आणि पारदर्शक व्हायला नक्कीच मदत होईल.
डमी फॉम्र्स : विद्यार्थ्यांना प्रक्रियेची सवय व्हावी म्हणून १ जूनपासून वेबसाइटवर डमी फॉम्र्स उपलब्ध असतील.
मदत कुठे?? : कुठलीही तांत्रिक अडचण असल्यास शाळा, कॉलेजेस आणि MKCLच्या १००० मदतकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध होईल.
फी किती व कुठे? : १२५ रूपये फी
ज्या मदतकेंद्रात फॉर्म सबमिट कराल तिथे भरावी.
कोडस् आणि कॅटेगरीज : फॉर्म्सवर
स्पोर्टस्, कल्चरल, रिझव्‍‌र्हेशन इ. विविध कॅटेगरीज असतील व त्याना कोड नंबर्स
दिलेले
असतील. विद्यार्थ्यांना योग्य ते कोड नंबर्स भरावे लागतील किंवा योग्य त्या चॉईसपुढे टिक करावे लागेल.
स्पृहा जोशी
spruhaj@gmail.com

फॅशन हा खरंतर अवघ्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय. लिंकिंग रोड, हिल रोड, लोखंडवाला, कुलाबा कॉज-वे ही तर फॅशनची मांदियाळी. सगळ्या मोठय़ा स्टोअर्समध्ये स्प्रिंग-समर कलेक्शन लाँच झालंय, पण खिशाला नसता चाट लावण्यापेक्षा कॉज-वेवरच्या एक्स्पोर्ट शॉप्समध्ये कॉटनचे कपडे आणि शॉर्टस् विकत घेणं तुमच्या-माझ्यासारखे कॉलेज गोअर्स प्रीफर करतात. आपल्याच वयाचे फॅशन डिझाईनिंग करणारे विद्यार्थी मात्र सध्या समर आऊफिट्स डिझाईन करत आहेत.
सोफिया पॉलिटेक्निकमधून नुकतीच पासआऊट झालेली श्वेता नार्वेकर हिने तिच्या डिझाईनर वॉर्डरोबचा दरवाजा खास कॅम्पस मूडसाठी खुला केला. तिने तिचे समर वेअर डिझायनर कपडे आणि त्यांची डिझाईन्स आम्हाला दाखवली आणि त्याचबरोबर आम्हाला तिचे डिझायनर कपडे ट्रायही करून पाहायला दिले. श्वेता नार्वेकर हिने सांगितलेली डिझायनिंगची प्रोसेस आणि दिलेल्या टिप्स खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत छायाचित्रासकट.
प्रोसेस :
१) ज्याचा आऊटफिट बनवायचा आहे, त्याची गरज व आवडनिवड विचारणे.
२) त्या मुलीच्या वर्णाला साजेलसा रंग व ऋतुमानानुसार कपडा ठरवणे.
३) मग जाऊन सप्लायरकडून कापड विकत घेणे आणि त्यानंतर भोईवाडा किंवा तत्सम मार्केटमध्ये जाऊन त्याला साजेसे बीडस्, सिक्वेन्स आणून कापड शोभिवंत बनवणे.
४) मापं घेणे आणि कपडय़ाला साजेसे कट्स ठरवून डिझाईन रेखांकित करणे.
५) मास्टरकडून काळजीपूर्वक कट्स शिवून घेणे.
समरवेअर टिप्स :-
१) चिकनचा टय़ुनिक विथ हलकं सिक्वेन्स वर्क आणि लेगिंग्स हा सध्याच्या ऋतूमानाला उत्तम.
२) पेस्टल कलरमधला ब्लॉक प्रिंटिंग केलेला शॉर्ट टॉप विथ डीप स्लीव्हलेस स्टाईल डेनिमवर शोभून दिसेल.
३) पार्टी वेअर- एखादा फ्लॉरल ड्रेस आणि त्याबरोबर फुलाच्या नक्षीची इअरिंग्स किंवा भरपूर साऱ्या लाकडी बांगडय़ा.
४) कॅज्युअल वेअर- चेक्सची शॉर्टस् , त्यावर प्लेन व्हाईट टी-शर्ट आणि याला अ‍ॅक्सेसराईज करण्यासाठी टो-रिंग्स व फ्लिपफ्लॉप्स.
५) अलिबाबा पँटस् आणि बीड्स.
मार्केटस् :-
१) कपडे- लोखंडवाला, कॉज-वे, विलेपार्ले रेल्वे स्थानक (प)
२) बॅग्स- केम्पस् कॉर्नर, वॉर्डन रोडवरील दुकान
३) चपला- लिकींग रोड (दुकाने आणि रस्त्यावरील बाकडे)
४) लूज बीड्स- भोईवाडा (भुलेश्वर)
५) बॉटम्स, शॉटस्- कॉजवेवरची एक्सपोर्ट शॉप्स
६) बांगडय़ा, कानातले- कुलाबा कॉज-वे
प्राजक्ता कुवळेकर
सेंट झेवियर्स कॉलेज
praku15@yahoo.co.in

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. ‘आप में हैं वह बात?’ तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू
नका.अनिरुद्ध पाटणकर,
सेंट झेवियर्स कॉलेज