Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

डाव्यांची आडकाठी दूर झाल्याने उद्योजकांच्या आशा पल्लवित
विदर्भातील प्रकल्पांना चालना मिळण्याची खात्री
नागपूर, १८ मे/प्रतिनिधी
दोन दशकांपूर्वी वाहू लागलेले विकासाचे वारे काही काळासाठी भरकटले होते. मात्र पंधराव्या लोकसभेच्या निकालानंतर केंद्रात स्थिर सरकार येणार हे निश्चित झाल्याने पुन्हा विकासाचे वारे योग्य दिशेने वाहण्याची आशा निर्माण झाली आहे. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेतही नवचैतन्य आले आहे. याची पहिली प्रचिती आजच आली.

कुलसचिव पदासाठी तिघांमध्ये चुरस
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर डोळा असणाऱ्यांची राजकीय गोळाबेरीच सुरू असून मुख्यत्वे तीन उमेदवारांमध्ये कुलसचिवपदासाठी चुरस आहे. त्यात उपकुलसचिव (विकास विभाग) पूरण मेश्राम, गणित विभागातील डॉ. के.सी. देशमुख आणि परीक्षा नियंत्रक डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांचा समावेश आहे. या तिघांपैकी एकाची निवड कुलसचिवपदावर होण्याची दाट शक्यता आहे.

रिपाइं नेत्यांच्या पराभवाचा राग काँग्रेस-राष्ट्रवादीवर
आठवलेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी
रिपाइंचे नेते रामदास आठवले व डॉ.राजेंद्र गवई यांच्यासह प्रकाश आंबेडकर निवडणुकीत पराभूत झाल्याने रिपाइंच्या विविध गटाचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले असून त्यांचा राग काँग्रेस व राष्ट्रवादीवर जास्त असल्याचे रिपाइं नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले, रामदास आठवले व राजेंद्र गवई हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार होते, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या नेत्यांचा विश्वासघात केला आहे.

रेल्वे खाते कुणाकडे?
अधिकाऱ्यांपासून गँगमनपर्यंत सर्वाना उत्सुकता
राजेश्वर ठाकरे
नागपूर, १८ मे

रेल्वेला नफ्यात आणणारे, सर्वसामान्यांना ‘गरीब रथा’ तून वातानुकूलित प्रवास घडवणारे, बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणारे आणि हमालांना ‘गँगमन’ चा दर्जा देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्यानंतर रेल्वे मंत्रालयाची चावी कुणाच्या हाती जाईल याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते गँगमनपर्यंत सर्वाचेच लक्ष लागले आहे. गेल्या पाचवर्षांत तब्बल ९० हजार कोटी रुपयांचा घसघशीत नफा रेल्वेने कमावला आहे.

युती, आघाडीला बसपचा फटका आणि लाभही
चंद्रशेखर बोबडे
नागपूर, १८ मे

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या बहुजन समाज पाटीने या निवडणुकीत मात्र युतीलाही धक्के दिले. दोन जागी बसपामुळे काँग्रेस आघाडीच्या तर दोन जागी युतीच्या विजयात बसपा फॅक्टरने महत्वाची भूमिका बजावली. रामटेक, नागपूर येथे बसपाच्या मतांमध्ये वाढ होऊनही निकाल युतीच्या विरोधात गेले.

बसपचा टक्का वाढला
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली, पण त्यांना अपेक्षित मते न मिळाल्याने नेत्यांच्या आशांवर पाणी फेरले गेले. गेल्या निवडणुकीत विदर्भातील एकराही जागा लढवणाऱ्या बसपला ५ लाख ४९ हजार मते, तर यंदा १० पैकी ९ जागांवर उमेदवार उभे केल्यावर ७ लाख ६० हजार मते मिळाली. अकोल्यात बसपचा उमेदवार नव्हता. बसपला सहा जागांवर तिसऱ्या तर तीन जागांवर चवथ्या स्थानावर राहावे लागले. या पक्षाला सर्वाधिक १७.११ टक्के मते वर्धा मतदारसंघात मिळाली आहेत.

नंदनवन घरकुल परिसरातील उपद्रव वाढला
वाद नासुप्रच्या अभियंत्याकडे
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी
नंदनवन घरकुल परिसरातील गाळेधारक इमारतीवर काही प्लॅटधारकांचा उपद्रव वाढल्यामुळे गाळेधारक देखभाल समितीने टेरेसला कुलूप ठोकल्याबद्दल एक वादंग निर्माण झाला असून समितीने नागपूर सुधार प्रन्यासकडे याविषयी तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी पतंग उडवताना एक मुलगा टेरेसवरून खाली पडला.

ठेवीदारांचा पैसा नातेवाईकांच्या कर्ज खात्यात
प्रमोद अग्रवालची फसवेगिरी
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी
आरोपी प्रमोद अग्रवाल याने चार हजार ठेवीदारांची रक्कम नातेवाईकांच्या नावे कर्ज खात्यात दर्शवल्याची माहिती तपास पथकाला मिळाली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. दरम्यान, न्यायालयाने प्रमोद अग्रवालला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील तक्रार प्रकरणी प्रमोद अग्रवाल याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

माजी राष्ट्रपती डॉ. कलाम गुरुवारी अकोल्यात
अकोला, १८ मे / प्रतिनिधी

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे कलाम २१ मे रोजी अकोल्यात येत आहेत. अकोल्यातील मेहरबानु कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात २१ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांनी १९३३ मध्ये विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना के ली हेाती. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त आयोजित अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन अकोल्यात करण्यात आले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अकोल्यात येणार आहेत. अकोल्यातील नोएल कॉन्व्हेंटच्या पाच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला नासाकडून प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झाले आहे. हा प्रकल्प तयार करणाऱ्या आशुतोष देशमुख, नंदन महल्ले, निशांत घुगे, आकाश पाटील, ऋ षीकेश अंधारे यांची भेटही डॉ. कलाम या दौऱ्यात घेणार आहेत. कार्यक्रमासाठी विदर्भ चेंबरचे अध्यक्ष अशोक डालमिया, अशोक गुप्ता, रमेश कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना मेटॅडोरने चिरडले
एकाचा मृत्यू, चार जखमी
अचलपूर, १८ मे / वातार्हर

रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना मेटॅडोरने चिरडल्याची घटना आज येथे घडली. या दुर्घटनेत एका बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार मुले जबर जखमी झाली.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मेटॅडोरने ५ बालकांना जोरदार धडक दिली. शहरातील बियाबानी चौकात आज सकाळी १० वाजता ही घटना घडली. या अपघातानंतर सुसाट निघालेल्या मेटॅडोरने समोरच्या घराला धडक दिल्यानंतरच मेटॅडोर थांबला. बियाबानी चौकात डॉ. जाहीद यांच्या दवाखान्याजवळ उभा असलेला मेटॅडोर (क्र. एमएच ३० एल १७१५) चालक मजहरखॉ (२६) याने सुरू करताच तो अचानक जोरात धावू लागला. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर खेळत असलेल्या पाच बालकांना मेटॅडोरने धडक दिली. यात औरंगाबाद येथून आत्याकडे पाहुणा म्हणून आलेल्या महंमद इमदाद महंमद जमालोद्दीन (१३) याचा पुढच्या चाकाखाली चिरडला गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इरशाद खा रहीम खा (१२), मोहम्मद काशिफ (१२), मोहम्मद कामरान मोहम्मद अन्वर (१३), फरान खा हमीद खा (९) हे चौघे जखमी झाले. जखमींना प्रथम अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी दोन जबर जखमींना अमरावती रुग्णालयात हलवण्यात आले. चालक मजहरखॉ याला पोलिसांना अटक केली आहे.