Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

भुसावळ बचाव गटनेत्यांची नगरसेवकांना कटू कारवाई टाळण्याची सूचना
वार्ताहर / जळगाव
भुसावळ पालिकेत सत्ताधारी गटावर अविश्वास आणण्याच्या हालचाली वेगात सुरू असताना शहर बचाव गटाच्या नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना कटू प्रसंग टाळावा, असा इशारा दिला आहे. पालिकेत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे तत्कालीन आ. सुरेश जैन यांनी एकत्र येऊन शहर बचाव गट स्थापन करून २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ता मिळवली होती. या गटाने राष्ट्रवादीचे आ. संतोष चौधरी गटाची सत्ता उलथवून टाकली होती.

जैन-खडसेंच्या नियोजनामुळे ‘एटी’ विजयी
जळगाव / वार्ताहर

केवळ ४२ टक्के मतदान झाल्याने जय-पराजयाबद्दल कोणीही ठाम दावा करीत नसताना जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र सुमारे ९७ लाखाचे मताधिक्क्य घेत भाजपच्या ए. टी. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जागा खेचून घेतली. पाटील यांना मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये आघाडी मिळाली असून शिवसेनेचे सुरेश जैन व भाजपचे एकनाथ खडसे यांचे नियोजन महत्वपूर्ण मानले जात असून राष्ट्रवादीतर्फे आता पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

मनसेच्या उमेदवारांमध्ये हेमंत गोडसे यांना सर्वाधिक मते
प्रकाश उबाळे / भगूर

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बारा जागांवर उमेदवार उभे केले असले तरी त्यात नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सर्वाधिक मते घेत पक्षातील इतर उमेदवारांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे.