Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

सहकाराला घरघर
महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास गौरवशाली असला तरी, आता मात्र या चळवळीचे नैतिक अध:पतन झाले आहे. या चळवळीला वाचविण्यासाठी निरलस वृत्तीने काम करणे गरजेचे आहे. मात्र अशा सद्वृत्तीने आणि उदात्त हेतूने सहकाराची जपणूक करणारी मंडळी कमी होत चालली आहेत. ही अवस्था पाहता सहकार चळवळ मृत्यूच्या रस्त्याने निघाली आहे. तिचा मृत्यू होऊ नये यासाठी अभ्यासक व तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची नितांत गरज आहे, अशा परखड शब्दात सहकारातील ज्येष्ठ नेते, शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी सहकार चळवळीवर भाष्य केले. या विषयावर बोलताना महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा घेऊन त्यातील गुणदोषावर मार्मिक टिप्पणी केली.

‘स्टील फ्रेम’: पुस्तक ते परिवार..
‘स्टील फ्रेम’ या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाने मराठी साहित्यात वैविध्यपूर्ण भर घातली. प्रशासनिक अधिकाऱ्यांवर या पद्धतीने आजवर कोणीच लिहिले नव्हते. अल्पावधीत या पुस्तकाची नववी आवृत्ती निघाली असून, या आवृत्तीसाठी लेखकाने लिहिलेले हे मनोगत!

इंधन बचतीची ‘छोटीसी बात’
‘पेट्रोलियम कन्झव्‍‌र्हेशन रीसर्च असोसिएशन’तर्फे (पीसीआरए) सांगण्यात आलेली ‘ती’ आकडेवारी धक्कादायक तर होतीच, शिवाय डोळे उघडणारीसुद्धा! राजधानी दिल्लीमध्ये सिग्नलवर उभी असणारी वाहने वर्षांला तब्बल ९९४ कोटी रुपयांचे इंधन जाळतात. विशेष म्हणजे थोडीशी काळजी घेतली आणि सिग्नलला उभी असताना आपली वाहने बंद केली तर यापैकी ७० टक्के इंधनाची बचत करणे शक्य आहे.