Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

निवडणूक विश्लेषण (धुळे मतदारसंघ)
भाजपच्या विजयाचे अनेक अन्वयार्थ

धुळे / वार्ताहर

जिल्हा परिषदेसह शिंदखेडा व धुळे पंचायत समित्यांवर भगवा फडकवून युतीच्या आगामी वाटचालीचे संकेत दिलेल्या भाजप-सेनेने धुळे लोकसभा मतदारसंघही ताब्यात घेतला असला तरी तिकीट न मिळाल्याने काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेली दुफळी, निहालभाई आणि अनिल गोटेंची उमेदवारी या गोष्टीही भाजपच्या विजयास कारणीभूत ठरल्या. या पाश्र्वभूमीवर सर्वशक्ती पणाला लावूनही काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेलांना पराभवाला सामोरे जावे लागले.

नियोजनशून्यतेमुळे बियाणे विक्रीत समर प्रसंग
सुकदेव शिरसाळे / जळगाव

पारोळा येथे राशी-२ या बीटी कापूस बियाणाच्या नियोजनबद्ध विक्रीत गैरप्रकार होत असल्याचा संशयावरून शेतकऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर झालेला लाठीमार, पोलिसांनी हवेत केलेला गोळीबार या पाश्र्वभूमीवर नियोजित बीटी बियाणे विक्रीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून स्थगीत करण्यात आला आहे. यामुळे हा कार्यक्रम नियोजनबध्द नव्हे तर नियोजनशून्य असल्याची टीका होत आहे.

समस्या न सुटल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
वार्ताहर / मालेगाव
शहराला लागून असलेल्या भायगाव परिसरात पाण्यासह रस्ते, वीज यासारख्या विविध समस्या भेडसावत असताना शासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करतानाच भविष्यातही या समस्यांकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकतील, असा इशारा रिपाइंचे तालुका अध्यक्ष भारत म्हसदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आघाडीतील गटतटामुळे अमळनेरमध्ये युतीला आघाडी
अमळनेर / वार्ताहर

कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक निवडणुकीत तालुक्याने गेल्या १५ वर्षांपासून युतीची पाठराखण केली असून नुकतीच झालेली लोकसभा निवडणूकही त्यास अपवाद ठरली नाही. जळगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील यांना तालुक्यातून तब्बल १० हजार ८२६ मतांची आघाडी मिळाली आहे.

शेवगेदारणा रस्तादुरूस्ती कामाचे तीन तेरा
भगूर / वार्ताहर

राजकीय इच्छाशक्तीअभावी नेहमीच उपेक्षित राहिलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीला उशिरा का होईना मुहूर्त लागला असताना ठेकेदाराच्या लहरीपणामुळे शेवगेदारणा येथील दारणा पूल ते कारखाना रस्त्यापर्यंतच्या रस्ता कामाचे तीन तेरा वाजले आहेत. या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य अंबादास पाळदे यांनी दिला आहे.

रिपाइंचा इशारा
काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत धडा शिकविणार
नांदगाव / वार्ताहर

शिर्डी लोकसभा मतदारसंघात रिपाइंचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव झाल्याने संतप्त झालेल्या नांदगाव रिपाइं शाखेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे. आठवले यांचा कपटनितीने अपप्रचार करून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पराभव केला. पराभवास कारणीभूत ठरलेले काँग्रेस नेते बाळासाहेब विखे व त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा येथे आयोजित बैठकीत निषेध करण्यात आला. या गद्दारीचा बदला घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असा निर्धार नाशिक जिल्हा रिपाइंचे उपाध्यक्ष देविदास मोरे, राजाभाऊ पवार, भास्कर निकम, नांदगाव शहर अध्यक्ष बाळासाहेब पवार, शहर उपाध्यक्ष संदीप पवार यांनी केला आहे. बैठकीचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर काकळीज होते. संपूर्ण महाराष्ट्रातील दलित समाजाने काँग्रेसला भरभरून मते दिली व काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांना निवडून आणले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचित्र प्रचार करून आठवले यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला पाडले. हा दलित मतदाराशी गद्दारीचा प्रकार असून आता दलित मतदार शब्दाला न जागणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील, असा संतप्त सूर या बैठकीत उमटला.