Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

..ही शर्यत रे अपुली!
जन्माला आल्यापासूनजिंकण्याची ही शर्यत सुरू होते. ती मृत्यू येईपर्यंत संपत नाही. आयुष्यात एक काळ असा येतो, की काही मिळवणे बाकी नाही आणि काही मिळवण्यात स्वारस्य नाही. अशा परिस्थितीतही आपली जिंकण्याची स्पर्धा पूर्णपणे थांबत नाहीच. आपण जगण्याच्या प्रत्येक पातळीवर जिंकण्याची ही धडपड सुरू ठेवतो आणि त्यातच आपली इतिकर्तव्यता आहे, असे आपल्याला वाटत राहते. रस्त्यावरून जाताना शेजारच्या वाहनाने आपल्यापेक्षा पुढे धाव घेतली, म्हणजे ‘ओव्हरटेक’ केले, की आपला अगदी तिळपापड होतो.

‘काय बाबल्या, बघलय आपले लोक कितक्येय अशिक्षित असले तरी किती शाहणे आसत ते.’
‘तात्यानू, काय व्होया ता बोलून घ्या. शेवटी आता एैकान घेवचाच आमच्या नशिबात आसा.’
‘अरे, लोकांनी बघलय केंद्रात स्थिर सरकार व्होया म्हणान कांग्रेसाक निवडून दिल्यानी. लोका शाणी असतत. केंद्रात राष्ट्रीय पक्ष निवडून दिलो बघ.’

दगडी कोळसाविरोधी आंदोलनाचा सुप्त विजय
लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नच मतदार विचारात घेतात, असा एक समज असतो, परंतु रायगड जिल्ह्यात हा समज रायगडच्या मतदारांनी यावेळी पूसून काढल्याचे दिसून येत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात केवळ निवडणुकीपुरते येणारे काँग्रेसचे नेते बॅ. ए. आर. अंतुले यांना पराभूत करून सेना-भाजपा-शेकाप युतीचे अनंत गीते यांना मतदारांनी नव्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार बनविले.