Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

चोरटय़ांनी धाक दाखवून लुटले
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

 

दुचाकीवरून आलेल्या तीन चोरटय़ांनी दोन नागरिकांना साडेसात हजार रुपयांना लुबाडले. विमाननगर परिसरात रविवारी रात्री सव्वाअकरा ते पावणेबारा या वेळेत या घटना घडल्या. येरवडय़ातील रामवाडी येथेही चाकूचा धाक दाखवून तिघा चोरटय़ांनी पादचाऱ्याला तीन हजारांना लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली.
साकोरेनगर येथील रस्त्यावरून चाललेले अतुल रत्नाकर सेत्रे (वय २९, रा. गुरुवार पेठ) यांच्या मोटारसायकलला स्कूटर आडवी घालून मोबाईल व रोख रकमेसह साडेपाच हजाराचा ऐवज तीन अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेला. सेत्रे यांनी याबाबत विमाननगर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिघा अज्ञात चोरटय़ांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.विमाननगर येथे सीसीडी चौकातून सायकलवरून चाललेले मोहम्मद उबेद आलम (वय ३८, रा. संजयपार्क, विमाननगर) यांच्या सायकलसमोर स्कूटर आडवी घालून मोबाईल व रोकड असा एकूण दोन हजाराचा ऐवज तिघा अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेला. आलम यांच्या फिर्यादीवरून विमाननगर पोलिसांनी तिघा अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. मोरे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
चाकूचा धाक दाखवून पादचाऱ्याकडील मोबाईल व रोकड असा एकूण सव्वातीन हजाराचा ऐवज चोरून नेणाऱ्या तिघाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रामवाडी येथे जकातनाक्याजवळ रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली.नितीन दिनकर शेलार (वय ४०, रा. गंगापूरम सोसायटी, विमाननगर) यांनी याबाबत येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विकास ज्ञानेश्वर सपकाळ (वय १९), युनुस नबीलाल शेख (वय १९) आणि सादीक अब्दुल मजिद शेख (वय २२, तिघे रा. कलवड वस्ती, लोहगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बी.डी. ढेरे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
सव्वादोन लाखाची घरफोडी
घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ४५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख २७ हजार ७३५ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला.