Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

विवाहितेला पेटवून दिल्याप्रकरणी पतीसह सासू - सासऱ्याला अटक
सासवड, १९ मे / वार्ताहर

 

माहेरकडून मदत आणण्याचे तसेच चारित्र्याच्या संशयाचे कारणाने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरगुडे (ता. पुरंदर) येथे नवरा, सासू-सासरे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोरावके यांनी सांगितले.
१६ मे रोजी पहाटे पाच वाजता हरगुडे येथे ही घटना घडली. वैशाली कमलाकर ताकवले ही विवाहिता गंभीर भाजली असून सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.
माहेराहून आर्थिक मदत आणावी यासाठी पती कमलाकर धनंजय ताकवले, सासरे धनंजय यशवंत ताकवले व सासू शकुंतला धनंजय ताकवले हे तिला नेहमी त्रास देत होते. पती कमलाकर हा तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता असेही वैशालीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. शारिरीक व मानसिक छळ नेहमी करत असल्याने शनिवारी पहाटे त्यांनी रागाने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यांचे लग्न सात वर्षांपूर्वीच झाले असून त्यांना दोन मुले आहेत. या प्रकरणी सहायक फौजदार देविदास गुंडगे व पोलीस हवालदार सचिन पडय़ाळ पुढील तपास करीत आहेत.