Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ कलावंत प्रेमकुमार भोसले यांना रुक्मिणी परिवाराकडून मदत
पंढरपूर, १९ मे/वार्ताहर

 

कलावंत हा समाजाची करमणूक करून सर्वच थरातील लोकांचे जीवनातील दु:ख कमी करण्याचा प्यत्न करतो. अशा कलावंताची कदर त्यांच्या वृद्धपकाळातील दिवसात समाजातील लोकांनी करून आर्थिक मदतीचा हातभार लावावा, असे मत रुक्मिणी परिवाराच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथील शिवशाहीर प्रेमकुमार भोसले हे वृद्धत्वाकडे झुकले असून ते सध्या आजारी असल्याने त्यांना औषधोपचारासाठी रुक्मिणी परिवाराच्या वतीने पाच हजाराची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी कलावंत रविकुमार शेवडे, पत्रकार रामभाऊ सरवदे, राजाभाऊ काळे, मुन्ना शेख, दरेकर, कुंभार हे उपस्थित होते.
शिवशाहीर प्रेमकुमार भोसले यांच्या आवाजाने साऱ्या महाराष्ट्राला मोहिनी घातली होती. पोवाडय़ानी सारे शिवमय करून टाकले होते. तर स्वत: भोसले यांनी प्रबोधनकार नाटकातून रुढी, परंपरा, यावर टीका करून प्रबोधनाचे काम केले. अशा कलावंतास पॅरेलिस (पक्षघात) चा झटका बसला अन् जर्जर होऊन जीवन जगत आहेत.
भोसले हे भक्ती मार्गावर पत्र्याचे शेडमध्ये आपले जीवन व्यतित करत आहेत. अशा आजाराने वृद्ध कलाकारास सामाजिक, राजकीय, सेवाभावी संस्था यांनी मदतीचा हातभार लावणे गरजेचे आहे.
याच हेतूने रुक्मिणी परिवाराचे वतीने सौ. पवार यांनी भोसले योंची भेट घेऊन औषधोपचारासाठी पाच हजारांची मदत केली.भोसले यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यांना भोसले यांना मदत करायची आहे. त्यांनी रुक्मिणी बँक, जुना कराड नाका येथे त्यांच्या क्र. ४९८१ या खात्यावर जमा करावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.