Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

अकोल्यातील प्रेमीयुगुल हत्याकांड
नाकरेचाचणीतून रहस्य उघडकीस येणार
अकोला, १९ मे/प्रतिनिधी

 

अकोल्यातील बहुचर्चित अमित-प्रतीक्षा प्रेमीयुगुल हत्याकांडातल तीन आरोपींच्या नाक रे चाचणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या चाचणीनंतर या प्रकरणातील सत्य उजेडात येणार आहे.
अकोला शहराच्या दाबकी मार्गावर राहणाऱ्या अमित व प्रतीक्षा या अल्पवयीन प्रेमीयुगुलाची १४ जून २००८ रोजी सामूहिक हत्या करण्यात आली होती. दोघांचाही निर्घृण खून करून त्यांचे मृतदेह गायगाव येथे रेल्वेरुळावर फेकून देण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. गायगाव परिसरात अनेक दिवसांपासून सक्रिय असलेल्या पेट्रोल चोरांच्या टोळीतील अनेकांचा या कृत्यात सहभाग असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी अटकेत असलेल्या १३ आरोपींनी पेालिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे अटके त असलेल्या हुसेन खान याने पोलिसांना सांगितले होते. परंतु आरोपींकडून दिशाभूल केली जात असल्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयात याप्रकरणी नार्को चाचणी घेण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ही परवानगी दिली असून हुसेन खान सुजाद खान, शेख जहीर शेख अमीर, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा या तीन आरोपींना नार्को चाचणीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. आरोपींच्या नार्को चाचणीनंतर या प्रकरणातील सत्य उजेडात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय अहवालावरही शंका उपस्थित केली जात आहे. महिला संघटनांच्या नेत्या राजेश्वरी अम्मा यांनी याप्रकरणातील वैद्यकीय अहवालाविरुध्द शासनाक डे तक्रारही केली आहे. नार्को चाचणीनंतर याप्रकरणातील गुंता काही प्रमाणात सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.