Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

इंडियन एक्स्प्रेसचे वृत्त संपादक वसंत राव यांना निरोप
नागपूर, १९ मे / प्रतिनिधी

 

इंडियन एक्स्प्रेसच्या नागपूर आवृत्तीचे वृत्तसंपादक वसंत राव हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना निरोप देण्यात आला.
निरोप समारंभाला ‘लोकसत्ता’चे संपादक प्रवीण बर्दापूरकर, इंडियन एक्स्प्रेसच्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक विवेक देशपांडे, इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ताच्या नागपूर शाखेचे उपमहाव्यवस्थापक बी.के. ख्वाजा, लोकसत्ताचे वृत्तसंपादक चंद्रकांत ढाकुलकर आणि इंडियन एक्स्प्रेसचे वरिष्ठ उपसंपादक विवेक पुराडभट उपस्थित होते.
वसंत राव गेल्या २८ व र्षांपासून इंडियन एक्स्प्रेसमध्ये कार्यरत होते. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राव यांनी एक्स्प्रेस समूहातील कार्यकाळ अतिशय विशेष असल्याचे सांगितले. संपूर्ण कार्यकाळात अतिशय चांगल्या सहकाऱ्यांसोबत काम करायला मिळाले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी प्रवीण बर्दापूरकर आणि विवेक देशपांडे यांनी राव यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन लोकसत्ताचे वितरण विभाग प्रमुख वीरेंद्र रानडे यांनी केले. यावेळी मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख रमेश चरडे यांच्यासह संपादकीय, वितरण, जाहिरात आदी विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.